Car Resale : अनेकजण चार ते पाच वर्षे कार (Car) वापरतात. त्यानंतर ते जुनी कार विकून नवीन कार घेण्याची तयारी करतात. कार विक्रीबाबत माहिती नसल्यामुळे, अनेकजणांना कमी किमतीत कार विकावी लागते.

परिणामी त्यांना कार विकताना (Car sale) चांगलाच फटका बसतो. जर तुम्ही काही टिप्स (Car sale tips) फॉलो केल्या तर तुम्हाला तुमच्या कारचे (Car Resale Tips) जास्त पैसे मिळतील.

कारची कागदपत्रे तयार करा

अनेक वेळा निष्काळजीपणामुळे लोक वाहनांची कागदपत्रे अपडेट (Update vehicle documents) ठेवत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही कार विकण्याची तयारी करत असाल तर सर्वप्रथम तुमच्या वाहनाचे कागदपत्रे अपडेट ठेवा. यामध्ये कार विमा (Car insurance), प्रदूषण प्रमाणपत्र (Pollution Certificate), आरसी सारखी कागदपत्रे अपडेट करून घ्या. कार कर्जावर असल्यास, RC मधून HP काढा.

डेंट पेंट करा 

 

वाहन चालवताना ट्रॅफिकमध्ये किरकोळ खोळंबा होतो. अशा परिस्थितीत कार विकण्यापूर्वी कारमध्ये काही किरकोळ दोष असल्यास तो दुरुस्त करून घ्या.

कार स्वच्छ करा

जेव्हा तुम्ही जुनी कार विकत असाल, तेव्हा ती देखील स्वच्छ करा. अस्वच्छ कार कोणालाही दाखवू नका. कोणाला गाडी दाखवणार असाल तर गाडी पॉलिश करून स्वच्छ करून घ्या.

कारसाठी योग्य मूल्य मिळवा

कार विकण्यापूर्वी, कारची योग्य किंमत मिळवा. यासाठी एखाद्या चांगल्या डीलरकडे जा किंवा एखाद्या कंपनीच्या शोरूममध्ये जाऊन कारची योग्य किंमत मिळवू शकता. असे केल्याने तुम्हाला कारच्या नेमक्या किंमतीबद्दल देखील माहिती मिळेल आणि नंतर विक्री करताना तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही.

सोशल प्लॅटफॉर्मवर नोंदणी करा

आजच्या काळात, अनेक वेबसाइट्स आणि मोबाइल अॅप्सवर (Social platforms) कार सहजपणे खरेदी आणि विकल्या जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही या पर्यायांचाही विचार करू शकता.