अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा कोरोना तिन हजार पार !

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :-  गेल्या चोविस तासांत तिन हजार पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती भयंकर रुप घेत असुन गेल्या तिन दिवसांपासून सातत्याने तिन हजार पेक्षा जास्त रुग्ण काढलेले आहेत. जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 3 हजार 280 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळले असून, ते … Read more

या गावात आज पासून ७ दिवस जनता कर्फ्यू!

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-नगर तालुक्यातील जेऊर येथे गेल्या महिन्यापासून कोरोनाने धुमाकूळ घातला असून रुग्णांची वाढती संख्या पाहता जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. जेऊर गावामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. आजमितिला येथे सुमारे ७० पेशंट विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आजतागायत जेऊर परिसरात सुमारे दोनशे रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असून सात … Read more

स्वस्तात खाद्यतेलाचे आमिष पडले महागात! खाद्य तेलाऎवजी मिळाला मार; अन लुटले

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-स्वस्तात गोडेतेलाचे आमिष  एका जणास चांगलेच महागात पडले आहे. स्वस्तात खाद्यतेलाचे डबे देण्याचे आमीष दाखवून निर्जनस्थळी बोलावून ६ जणांच्या टोळीने एकास तब्बल ७६ हजार रुपयांना लुटल्याची घटना नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारात घडली. याप्रकरणी हर्षल शिवशंकर चौधरी यांनी नगर तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर … Read more

अहमदनगर शहरातील ह्या ठिकाणी 24 तासात मिळणार कोरोना चाचणी अहवाल

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-कोरोना काळात मागील एक वर्षापासून जय आनंद फाउंडेशन विविध माध्यमातून समाजसेवेचे कार्य करत आहे. त्यांच्या या कार्याला मनापासून सलाम केला पाहिजे. कोरोनाचे संकट काळात नागरिकांची लवकरात लवकर कमी पैश्यात तपासणी व्हावी, या उद्देशाने सर्वसामान्यांची गरज ओळखून सुरू करण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. नगर … Read more

संचारबंदीच्या कालावधीत शाळा, महाविद्यालय, शिक्षक व कर्मचार्‍यांमध्ये संभ्रमावस्था

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने पंधरा दिवसाची संचारबंदी लागू केली असून, या कालावधीत शाळा, महाविद्यालयांची कार्यालय सुरु ठेवणे, शिक्षकांची उपस्थिती याबद्दल स्पष्ट आदेश निर्गमीत करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शिक्षण उपसंचालक व राज्यातील माध्यमिक … Read more

प्रशासनाने अधिक संवेदनशील होऊन आरोग्य यंत्रणा सक्षम करावी

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात सध्याची कोरोनाची अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झालेली असून रेमडेसिविर इंजेक्शन वेळेवर उपलब्ध होत नाहीत, व्हेन्टीलेटर उपलब्ध नाहीत, यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील नोबल हॉस्पिटल,सुरभी हॉस्पिटल,मेक्सकेअर हॉस्पिटल , साईदीप हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी सदर परिस्थिती संदर्भात भेट घेतली त्यानुसार जिल्हाधिकारी व निवासी जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडून सविस्तर माहिती घेऊन ताबडतोब मा.ना.हसन मुश्रीफ पालकमंत्री,राजेश … Read more

पालकमंत्री यांना नगर जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे बक्षिस जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-कोरोनाने जिल्ह्याची परिस्थिती गंभीर झाली असताना, पालकमंत्री तोंड दाखविण्यास तयार नसल्याचे आरोप करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे बक्षिस जाहीर करण्यात आले. तर मुंबई, कोल्हापूरला जाणार्‍या एसटी बस, लक्झरी आणि शहरातील प्रवासी वाहनांना पालकमंत्री यांना जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २०५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १० हजार १५९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३०५६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :- राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शनिवार, दिनांक 17 एप्रिल रोजी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवारी सकाळी 8.15 वाजता जुहू विमानतळ येथून खाजगी विमानाने शिर्डीकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता शिर्डी विमानतळ येथे आगमन व तेथून शासकीय मोटारीने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : नगरकरांवरील सकंट कायम ! गेल्या 24 तासांत पुन्हा वाढले इतके रुग्ण…

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण परिस्थिती धक्कादायक रित्या वाढतच असुन रुग्णसंख्येमुळे प्रचंड घबराट पसरली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 3056 रुग्ण वाढले आहेत. कालही तिन हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढले होते. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोविस तासांतील कोरोना रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb अहमदनगर … Read more

व्हेंटिलेटर तर नाहीच, ऑक्सिजन बेड मिळणेही अशक्य! जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :- साहेब काही तरी करा पण आम्हाला बेड उपलब्ध करून घ्या. तुमच्या ज्या काही अटी असतील त्या सर्व आम्हाला मान्य आहेत. आज नगर येथील अनेक हॉस्पिटलमध्ये असे विनंती करणारे कोरोना बाधित रुग्णाचे नातेवाईक दिसत आहेत. एकूणच जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली असून, जिल्ह्यातील गंभीर कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर मिळणे तर जवळपास दुरपास्त … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना लस आता संपली…

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-नगर शहर व जिल्ह्यात पुन्हा कोरोनावरील कोविशील्ड लसीचा तुटवडा निर्माण झाला असून, गुरुवारी नगर शहर व जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांसह जिल्हा शासकीय रुग्णालय ,तालुका उपजिल्हा रुग्णालये व आरोग्य केंद्रातील लस संपल्याने अनेकांना लस न घेतात परतावे लागली आहे. दरम्यान कोविशिल्ड लस संपली असली तरी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचे १२ हजार ५०० डोस … Read more

अहमदनगर जिल्ह्यात शिवभोजन थाळी गरिबांसाठी वरदान !

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-गरिबांच्या जेवणाची सोय म्हणून शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरुवात केली आहे. संचारबंदीच्या नियमांमुळे लोक तिथपर्यंत पोहचू शकतील का, अशी शंका व्यक्त केली जात असतानाच नगरमध्ये मात्र याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून शिवभोजन थाळी गरिबांसाठी वरदान ठरली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने गरीबांना स्वस्तात जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी दहा रुपयांत थाळी देण्याची … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंती संयुक्तपणे रक्तदानाने साजरी

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-भिंगार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसुर्य महात्मा फुले यांची जयंती संयुक्तपणे रक्तदानाने साजरी करण्यात आली. जयंती उत्सवाच्या वतीने सर्व खर्चांना फाटा देत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी जिल्हा रुग्णालय रक्तपिढीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी युवकांनी उत्सफुर्तपणे … Read more

महामानवांच्या प्रेरणेने जातीय विषमता नष्ट करण्याचा निर्धार

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :- पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारकात महात्मा फुले यांना जातीसंहिता मुक्तीनायक तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महासत्यबोधी अशी मानवंदना देण्यात आली. तर या महामानवांच्या प्रेरणेने जातीय विषमता नष्ट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, … Read more

महापौर म्हणतात शहरातील नागरिकांनी घाबरू नये !

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :- कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादूर्भाव मोठया प्रमाणात वाढत असल्‍यामुळे नगर जिल्ह्यात मोठया प्रमाणात रूग्‍णसंख्‍या वाढत आहे. नगर शहर हे मुख्‍यालयाचे ठिकाण असल्‍यामुळे जिल्ह्यासह बीड जिल्ह्यातील अतिसंवेदनशिल कोरोना रूग्‍ण उपचार घेण्‍यासाठी  नगर शहरामध्‍ये येत असतात. दुर्दैवाने काहींचा मृत्‍यू होतो. मात्र ‘त्या’ कोरोना रूग्‍णावर नगर शहरामध्‍ये अंत्‍यविधी होत असल्‍यामुळे शहरातील नागरिकांमध्‍ये भितीचे … Read more

विडी कामगारांना काम द्या, नाहीतर आर्थिक मदत द्या

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :- राज्यात 1 मे पर्यंत संचारबंदी घोषित करून पंधरा दिवसाच्या लॉकडाउन काळात विडी कामगारांना आर्थिक मदत द्यावी, अन्यथा विडी कामगारांचा रोजगार सुरु ठेवण्यासाठी विडी कारखान्यांना घरखेप सुरु ठेवण्याची मागणी लालबावटा विडी कामगार युनियन आयटक व विडी कामगार युनियन इंटकच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच प्रश्‍न बिकट … Read more

महानगरपालिकेच्या दहा शाळांना मोफत सॅनीटायझर स्टँड वाटप

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :- सध्याच्या बिकट परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच जन विविध उपाय योजना करून ,जागृती करून आपली जबाबदारी पार पाडत आहे. अशा परिस्थितीत समाजिक भान जोपासणाऱ्या रोटरी प्रियदर्शिनीच्या वॉशिंग स्टेशन प्रकल्प प्रमुख डॉ. प्राची पाटील यांच्या सहकार्याने महानगरपालिकाच्या दहा शाळांना मोफत सॅनीटायझर स्टँड वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. रोटरी प्रियदर्शिनीच्या अध्यक्षा … Read more