अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात सर्वात मोठा रेकॉर्ड ! एकाच दिवसांत 3 हजार…..

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. जिल्ह्यात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचा रेकोर्ड ब्रेक असा आकडा वाढला आहे, चोवीस तासांत नगर जिल्ह्यात तब्बल 3097 रुग्ण वाढले आहेत. गेल्या … Read more

अवकाळी पावसाने वातावरणातील उकाडा नाहीसा होवून ‘गारवा’ !

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-नगर शहर, उपनगर तसेच तालुक्याच्या काही ठिकाणच्या ग्रामीण भागात बुधवारी (दि. १४) सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. १० ते १५ मिनिटे अवकाळी पाऊस पडल्याने सखल भागात बऱ्यापैकी पाणी साचले होते. अवकाळी पावसाने वातावरणातील उकाडा नाहीसा होवून गारवा निर्माण झाला होता. बुधवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. प्रचंड उकाडा निर्माण झाला. दुपारी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स वाचा जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आणि त्यांची सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात आज ११२० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६ हजार २२१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २४०५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

महामानवांच्या प्रेरणेने जातीय विषमता नष्ट करण्याचा निर्धार

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारकात महात्मा फुले यांना जातीसंहिता मुक्तीनायक तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महासत्यबोधी अशी मानवंदना देण्यात आली. तर या महामानवांच्या प्रेरणेने जातीय विषमता नष्ट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा महाविस्फोट ! चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती अत्यंत भयंकर बनत चालली असून कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.  गेल्या चोवीस तासांत नगर जिल्ह्यात तब्बल 2405 रुग्ण वाढले आहेत, कालही तब्बल 2,654 रुग्ण वाढले होते.  आजही अडीच हाजाराजवळ काेराेना संसर्गाचे रुग्ण आढळले आहेत.जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 2 हजार 405 … Read more

जिल्हयातील विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेड्स बाबत आता अद्यावत माहिती मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-  जिल्हयातील विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता 24 x 7 कंट्रोल रूम (नियंत्रण कक्ष) कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या निर्देशानुसार हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक 0241-2345460 असा आहे. या कंट्रोल … Read more

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- नगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध होत नसलेल्‍या आरोग्‍य सुविधांसह बेडचे गांभिर्य लक्षात घेवून शिर्डी येथे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केंद्रीय रेल्‍वेमंत्री पियुष गोयल यांच्‍याकडे केली आहे. या संदर्भात आ.विखे पाटील यांनी गोयल यांना विलगीकरण बोगीची … Read more

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनानिमित्त शहर काँग्रेसच्या वतीने अभिवादन

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती गेटसमोरील पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विशेष निमंत्रित तथा विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, अल्पसंख्यांक … Read more

अहमदनगर मध्ये मृत कोव्हिड रुग्णांच्या नावावर रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करून १८ हजाराला विक्री !

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-राज्यात करोनावर गुणकारी असलेल्या रेमडेसिवीर औषधांसाठी रुग्णांचे नातेवाईकांचे बेहाल होत असताना दुसरीकडे कोविड सेंटरमधूनच रेमडेसिवीरची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काेराेना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यभरात तुटवडा जाणवत असल्याने माेठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केडगाव येथील खाजगी कोव्हिड सेंटरमध्ये काम … Read more

कोरोनामुळे मनपाच्या दोन कर्मचार्‍यांचा मृत्यू, आयुक्तांनी घेतला ‘हा’ निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-महापालिकेच्या दोन कर्मचार्‍यांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, मनपाच्या आणखी काही अधिकारी व कर्मचार्‍यांना करोनाबाधा झाल्याने मनपात सध्या अस्वस्थ वातावरण आहे. शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिकांना मूलभूत सेवा-सुविधा पुरविण्यासाठी कार्यरत असलेले महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी सध्या मोठ्या प्रमाणावर करोनाबाधीत होऊ लागले आहेत. त्यामुळे आयुक्त गोरे यांनी यावर प्रतिबंधात्मक … Read more

अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत !

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-मंगळवारी दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे नगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दुपारी दोनच्या सुमारास वादळासह पावसाला सुरूवात झाल्यामुळे दुपारी सव्वातीन वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे बंद पडलेला पाणी उपसा पुन्हा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे सावेडी उपनगरासह स्टेशन रोड, मुकुंदनगर, सिद्धार्थ नगर, लाल टाकी, दिल्लीगेट, नालेगाव, तोफखाना, चितळेरोड, आनंदी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावात जोरदार गारपीट !

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या अवकाळी पावसाने तुफान गारांसह धो-धो पाऊस कोसळला यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अगोदरच करोणाचा कहर करोणा त्यात आस्मानी संकटाची बळीराजावर अवकळा पसरली आहे नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरला आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात मंगळवारी … Read more

कोरोनाबधितांना गुढीपाडव्यानिमित्त पूरणपोळीच जेवण

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-राज्यात कोरोना आजाराने धुमाकुळ घातला आहे. दिवसागणिक वाढती रूग्णासंख्येमुळे नागरीक भयभीत झालेले आहे. अनेकांच्या कुटूंबातील काही सदस्य कोविड सेंटरमध्ये तर काही विलगीकरण कक्षात आहे. या परिस्थितीचा परिणाम आजच्या नववर्षारंभदिनी गुढीपाडवा या सणावर दिसुन आला. अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक श्री विवेक कोल्हे यांनी आज कोपरगाव येथील कोविड सेंटरला भेट देउन … Read more

राज्यातील सर्वात मोठी बातमी : पुढचे पंधरा दिवस राज्यात १४४ कलम लागू ! वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे LIVE !

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :- राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आहे. व राज्यात पुढील १५  दिवसांसाठी कडक निर्बंध आणण्यात आले आहेत.  राज्यात कोरोनाचा कहर वाढल्याने उद्यापासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उद्यापासून रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. 15 दिवस ही संचारबंदी … Read more

मनपा महापौर व आयुक्तांनी नागरिकांना केले ‘हे’ आवाहन!

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता रूग्णांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे. ४५ वर्षा वरील नागरिक देखील लस घेण्यासाठी मनपाच्या आरोग्य केंद्रावर गर्दी करित आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा, वारंवार सॅनिटायझरने हात धुवावे, सामाजिक अंतराचे पालन करावे. रूग्णांची संख्या वाढल्यामुळे रूग्णांना आवश्यक असणारा रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली. इंजेक्शनच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड मिळेना !

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :- अहमदनगर  जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असून हास्पीटलमध्ये बेड न मिळाल्याने श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव परिसरातील 30 वर्षीय तरूणाचा नगरमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. व्हिडीओ क्लीप व्हायरल :- उपचार सुरू असताना ऑक्सीजनचा पुरवठा खंडित झाल्याने अन्य दोन करोना रूग्णांना जीव गमवावा लागल्याची खळबळजनक घटना घडली. याबाबत व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मीडियावर … Read more

कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या कोरोनाची अहमदनगर , राज्य व देशातील आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 2654 रुग्ण वाढले आहेत कालही 1998 रुग्ण वाढले होते.  अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –  नगर शहरात 476 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरापाठाेपाठ कोपरगाव, संगमनेर, राहता आणि श्रीरामपूर येथे रुग्ण संख्याही 200 च्या पुढे गेली आहे. त्याखालाेखाल कर्जत राहुरी, अकोले, … Read more

रेडमिसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करून पेशंटच्या जीवाशी खेळणारयांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :- रेडमिसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करून पेशंटच्या जीवाशी खेळणारयांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी व अहमदनगर म्हधील ड्रग माफियांनवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद समवेत कैलास सोनवणे, नईम शेख, मोईज शेख, नाजीम सय्यद, आसिफ शेख आदी उपस्थित होते. भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटल येथे पोलिसांनी … Read more