जिल्‍हा संकटात असताना पालकमंत्रीसुध्‍दा पाहुण्‍यासारखे येतात. जिल्‍ह्यातीलतीन मंत्री करतात काय?

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- कोव्‍हीड रुग्‍णांच्‍या जिल्‍ह्यातील वाढत्‍या संख्‍येला आणि मृत्‍यूला केवळ प्रशासनाचा हलगर्जीपणाच कारणीभूत असून, जिल्‍हा संकटात असताना पालकमंत्रीसुध्‍दा पाहुण्‍यासारखे येतात. जिल्‍ह्यातील तीन मंत्री करतात काय? असा सवाल भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. नगरमध्‍ये काल एकाच दिवशी मोठ्या संख्‍येने झालेल्‍या अंत्‍यविधीच्‍या दुर्दैवी घटनेवर भाष्‍य करताना आ.विखे पाटील म्‍हणाले … Read more

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या पद्धतीने अंत्यविधीचे काम अहमदनगरमध्ये सुरू !

अहमदनगरमध्ये काेरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच मृतदेहांची अवहेलना झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- महापालिकेकडे एकच शववाहिनी असल्याने गुरुवारी रात्री शववाहिकेत सहा मृतदेह एकावर एक ठेवून अमरधाममध्ये नेण्यात आले. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या पद्धतीने अंत्यविधीचे काम अहमदनगरमध्ये सुरू आहे. विद्युतदाहिनीची व्यवस्था आणि ओटेही अपुरे पडत असल्याने जमिनीवरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार … Read more

शहरातील ‘त्या’ खासगी रुग्णालयावर तात्काळ कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-थकीत बिलासाठी महापालिकेच्या मयत महिला कर्मचारी तृृृप्ती राकेश चव्हाण यांचा मृृत्यू अहवाल (डेथ सर्टिफिकेट) देण्यास शहरातील एका नामांकित खासगी रुग्णालयाने नकार दिल्याने मयताचे कुटुंबीय हतबल झाले आहे. मयत रुग्णाच्या नातेवाईकांची अडवणूक करणार्‍या शहरातील साई एशियन हाॅस्पिटलविरुध्द कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी केली आहे. … Read more

ठराविक वेळेत सर्व दुकानं उघडण्याची अनुमती द्यावी

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-नगर – अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद असल्याने दुकानदार, कारागिरांच्या रोजगारावर गदा आल्याने करोनाशी लढतांना प्रपंच कसा चालवायचा याची चिंता या सर्वसामान्यांना भेडसावत असुन, यातील अनेक जण रस्त्यावर येऊन चिंतन करीत, चर्चेत असल्याचे निदर्शनात येते. त्यामुळे मिनि लॉकडाऊन मधुन दुकानदारांना दुकानं उघडण्याची सवलत द्यावी, अशी मागणी नगरसेवक … Read more

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला खाजगी रुग्णालयांनी दाखविला “ठेंगा”

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-राज्यात कोरोनाची पुन्हा लाट उसळली आहे. याचाच प्रवाह जिल्ह्यात देखील वाहू लागला आहे. यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती भयावह झाली आहे. यातच पुन्हा एकदा खासगी रुग्णालयांचे दुकाने जोरात सुरु झाली आहे. मागील कोरोनाच्या लाटेत रुग्णालयांनी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिले वसूल केली. त्याच गोष्टींची पुनरावृत्ती यंदाच्या कोरोना लाटेत देखील … Read more

जिल्ह्यात सुरु आहे रेमडिसेवीर इंजेक्शनचा गोरखधंदा

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या संकटात अनेक गोरगरीब रुग्ण मिळेल त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. काही हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर इमानदारीत डॉक्टर उपचार करत आहेत तर काही हॉस्पिटलमध्ये गोरख धंदा सुरू आहे, अनेक रुग्ण मृत्यूच्या उंबरठ्यावर आहेत अशाच वेळी रेमडिसेवीर हे इंजेक्शन एक जीवन वाचविणार औषधं म्हणून कामाला येत आहे. परंतु त्याचा काळाबाजार सुरु असल्याचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ, चोवीस तासांत वाढले तब्बल एवढे रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १३१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९६ हजार ४९४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २२३३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११६३७ … Read more

मिनी लॉकडाऊन त्वरीत रद्द करावे अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरेल

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-  सतेत असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी विरोधी पक्षाचे व सर्व सामान्य नागरिकांची दिशाभूल करुन शनिवार व रविवार पुरते कडक निर्बंध लावण्याचे सांगुन लगेचच कडक निर्बंधाच्या नावाखाली कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा भयंकर, अमानुष मिनी लॉकडाऊन लावुन सामान्य नागरिक व व्यापारी वर्गावर अन्याय केलेला असुन हे न शोभणारे कृत्य आहे. याचा … Read more

घर बांधकामाच्या परवानगीसाठी सरपंचाची अडकाठी पैश्याची मागणी केली जात असल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-  वारूळवाडी (ता. नगर) ग्रामपंचायत हद्दीत घेतलेल्या जागेवर घराचे बांधकाम करण्याच्या परवानगीसाठी सरपंच अडवणूक करीत असल्याचा आरोप करुन जागा मालक असलेल्या महिलेस बांधकामास परवानगी देण्याच्या मागणीचे निवेदन जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने पंचायत समितीचे उपसभापती डॉ. दिलीप पवार व माजी सभापती रामदास भोर यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगरकरांसाठी अंगावर काटा आणणारा आकडा,वाढलेत तब्बल…

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :- एप्रिल महिना अहमदनगरकरांसाठी अंगावर काटा आणणारा ठरला असून, याचे कारण म्‍हणजे गेल्‍या महिनाभरात जिल्ह्यात झालेला कोरोनाचा फैलाव आहे. या महिन्‍यात आढलेल्‍या एकूण कोरोनाबाधितांची संख्याही सर्वाधिक ठरली.जिल्ह्यात सातत्याने मोठ्या संख्येने रुग्ण वाढ होते आहे. सरासरी दीड ते दोन हजार कोरोनाबाधित रोज आढळले आहेत. आज तब्बल 2233 रुग्ण अहमदनगर जिल्ह्यात वाढले आहेत … Read more

मृत्यूनंतरही रुग्णांची सुटका नाहीच… स्मशानभूमीतही अंत्यविधीसाठी वेटिंग

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-काही दिवसांपासून शहरातील करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, बळींची संख्याही वेगाने वाढत आहे. त्यामुळे, शहरातील स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीसाठी ‘वेटिंग’ करावे लागत आहे. नेप्ती नाकाजवळील स्मशानभूमीमध्ये अनेक पार्थिव अंत्यसंस्कारांसाठी आणण्यात येत असल्याने तेथील यंत्रणा व जागांच्या मर्यादामुळे अंत्यसंस्कारांसाठी थांबून राहावे लागत आहे. असे भयाण चित्र सध्या दिसून येत आहे. कोरोनाबाधितांवर येथील अमरधाममध्ये अंत्यविधी … Read more

आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली महत्वपूर्ण मागणी

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-राज्य शासनाच्या मिनी लॉकडाउनच्या निर्णयामुळे नागरिक व व्यापार्‍यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय. या निर्णयास सर्वांचा विरोध असल्यामुळे शासनाने या नियमात शिथिलता आणून व्यापारी बाजारपेठा सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान या निवेदनात … Read more

स्वाभिमानी मराठा महिला प्रदेशाध्यक्षपदी सौ.अर्चना धुळे-रोहोकले

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-नगर – स्वाभिमानी मराठा महासंघाची प्रदेश कार्यकारिणीची नुकतीच संस्थापक अध्यक्ष डॉ.कृषिराज टकले यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक संपन्न झाली. याप्रसंगी नाशिक विभागीय कार्याध्यक्ष रावसाहेब पाटील कावरे, प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे, नाशिक विभाग अध्यक्ष दिपक शेळके, युवक प्रदेशाध्यक्ष कैलास रिधें, जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे आदि उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन संघटनेचे कामकाज … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १६८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९५ हजार १७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.८१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १६५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०७३८ इतकी … Read more

मनसेच्या त्या निवदेनची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली ताबडतोब दखल

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या काळात खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची सुरु असलेली लुटमार बाबत मनसेने नुकतंच जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन दिले होते, व या प्रकरणी आपण लक्ष द्यावे अशी मागणी केली होती. मनसेच्या या निवेदनाची अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तात्काळ दखल घेतली आहे.या निवेदनावर जिल्ह्याधिकारी राजेंद्र भोसले यांनी तातडीने आपली प्रतिक्रिया दिली. जिल्हाधिकारी व … Read more

जिल्ह्यातील ‘या’ सरकारी कार्यालयात प्रवेशासाठी कोरोनाचाचणी बंधनकारक

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा वेगाने फैलाव झाला आहे. यातच जिल्ह्यातील असे एकही ठिकाण शिल्लक राहिलेले नाही, जिथे कोरोनाबाधितांची नोंद झाली नाही आहे. खासगी कार्यालयसह आता सरकारी कार्यालयांमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळे मोठी दक्षता घेतली जात आहे. यामुळे नगर शहरातील एका महत्वपूर्ण सरकारी कार्यालयामध्ये प्रवेश करण्यापूर्वी कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आले … Read more

प्रादुर्भाव वाढताच लसीकरणासाठी नागरिकांची धावपळ झाली सुरु

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येनें कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. दरदिवशी वाढती आकडेवारी प्रशासनासह नागरिकांसाठी धडकी भरवणारी आहे. यामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. यातच वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिक आता लसीकरणासाठी गर्दी करू लागले आहे. केंद्र सरकार लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सल्ला देत आहे, पण लस पुरवठा करताना … Read more

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सुविधांचे नियोजन करा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रिटमेंट यावर भर द्या

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक संख्येने कोरोना चाचण्या करण्याची गरज असून त्यादृष्टीने नियोजन करा. तसेच बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या लवकरात लवकर चाचण्या होणे आणि त्यांच्यावर उपचार सुरु करणे अतिशय महत्वाचे आहे. याशिवाय, कोरोना रुग्णांवर उपचारासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन बेडस् आणि व्हेंटिलेटर यांची सुविधा अत्यावश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने या बाबींकडे … Read more