आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली महत्वपूर्ण मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-राज्य शासनाच्या मिनी लॉकडाउनच्या निर्णयामुळे नागरिक व व्यापार्‍यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय.

या निर्णयास सर्वांचा विरोध असल्यामुळे शासनाने या नियमात शिथिलता आणून व्यापारी बाजारपेठा सुरू करण्याचे आदेश द्यावेत,

अशी मागणी आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान या निवेदनात म्हटले आहे की, सद्यस्थितीत टाळेबंदीच्या नियमावलीमुळे मोठ्याप्रमाणात सर्वसामान्य नागरिक व व्यापार्‍यांमध्ये शासनाविषयी रोषाची भावना निर्माण झाली आहे.

कारण या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार आहे. या निर्णयामुळे प्रथमतः थेट सगळ्यांची आर्थिक कोंडी होणार आहे.

व्यापारी बाजारपेठा बंद राहिल्याने व्यापार्‍यासह त्या दुकानात काम करणारे कामगार बेरोजगार झाले आहेत.

त्यामुळे टाळेबंदीच्या नियमावलीस व्यापार्‍यांसह सगळ्यांचा विरोध आहे. व्यापारी बाजारपेठा सुरू करताना कोवीड-19 चा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने उचित उपाययोजना करण्याबाबत सुचित करावे.

जेणेकरून सर्वसामान्य नागरिक, कामगार, व्यापारी यांची आर्थिक कोंडी होणार नाही. कारण आताची आर्थिक कोंडी ही सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी नाही.

त्यामुळे शासनाने टाळेबंदीच्या निर्णयामध्ये शिथिलता करून व्यापारी बाजारपेठा सुरू होण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा असेही निवेदनात म्हटले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्वि