राष्ट्रवादीच्या पाठपुराव्याला यश भिंगारला जोडणार्‍या रस्त्यांच्या दुरुस्तीची केली होती मागणी

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- भिंगार येथील अंडर एमईएस छावणी परिषदेचे ब्रिगेडियर यांच्या माध्यमाने कॅन्टोन्मेंट हद्दीतील भुईकोट किल्ला समोरील डिएसपी चौकाकडे जाणार्‍या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असून, त्याचे डांबरीकरण सुरु आहे. भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीला यश आले असून, या कामाची भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी पहाणी केली. यावेळी रमेश वराडे, दिपक बडदे, … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी  : आठ दिवस कांदा मार्केट राहणार बंद  

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- मार्च एंड असल्यामुळे पुढील सलग आठ दिवस बँकाचे कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे बाजारात पैशांची चणचण भासणार असल्याने पुढील आठ दिवसांसाठी नेप्ती उपबाजार समितीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने कळवण्यात आले आहे. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी न आनण्याचे आवाहन करण्यात आले आहे. … Read more

अत्यंत धक्कादायक बातमी : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, वर्षातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-  महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अहमदनगर जिल्ह्यात तर आज या वर्षातली सर्वात मोठी रुग्ण वाढ झाली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचं पुन्हा अधोरेखीत झालं आहे. वारंवार आवाहन करुन देखील लोकांमध्ये निष्काळजीपणा कायम … Read more

आठवडे बाजारातून पैसे पाळवणाऱ्या चोरट्यांना नागरिकांनी बेदम चोपले!

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- जिल्ह्यात रोज चोरी लुटमारीच्या घटना घडत आहेत. मात्र पैशांची चोरी करून पळत सुटलेल्या दोघा चोरट्यांची नागरीकांनी पकडून येथेच्छ धुलाई केल्याची घटना तालुक्यातील साकूर येथील आठवडे बाजारात घडली. साकूर येथील रामभाऊ खेमनर हे बँकेतून पैसे काढून घरी जात होते. आठवडे बाजारातून जात असताना अचानक तिघा चोरट्यांनी त्यांच्या कडील पैसे हिसकावून … Read more

कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- राज्यासह जिल्ह्यात वेगाने फोफावत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रत्येकाने आता मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. जर असे आढळून न आल्यास म्हणजेच या नियमांचे उल्लंघन एखाद्या आस्थापनामध्ये होत असेल, तर ती आस्थापना 7 दिवस बंद करण्यात येणार आहे. तसे अधिकार तालुकास्तरावर तहसीलदार यांना … Read more

यात्रा उत्सव रद्द करुन युवकांनी केले रक्तदान

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कापूरवाडी (ता. नगर) गावातील यात्रा उत्सव रद्द करुन, काळात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने गावातील संघर्ष युवा प्रतिष्ठान व अर्पण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे ओमकार भगत, आकाश पासलकर, युवराज कराळे, प्रदीप बोरकर, ऋषिकेश झांजे, सागर शेळके, लहानु देवकर, वैभव तोडमल, नवनाथ कराळे, … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ गावात पुन्हा कोरोनाचा शिरकाव,परिसरामध्ये भितीचे वातावरण !

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-आश्वी बु परिसरामध्ये पुन्हा कोरोनाने शिरकाव करण्यास सुरवात केली आहे. काल निमगावजाळी प्राथमिक आरोग्य केंद्रामधील तपासणी अतंर्गत दिवसभरात जवळपास ९ रूग्ण सापडले आहे. यामुळे परिसरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव पुन्हा सुरू झाला आहे. नागरीक, व्यापारी कोरोनाचे कुठलेही नियम पाळत नसल्याचा प्रत्यय येथील आठवडे … Read more

चालकाचा प्रमाणिकपणा : दुकानात विसरलेली 70 हजार रोख रक्कम असलेली पैश्याची पिशवी केली परत

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-तारकपूर बस स्टॅण्ड समोर मेडिकल दुकानात विसरलेली पैश्याची पिशवी मेडिकलचे संचालक आनंद तेजमल धोका यांनी प्रमाणिकपणा दाखवित डॉ. कथुरिया यांच्या हस्ते वैभव शेळके यांना परत केली. वैभव शेळके कर्जतहून उपचारासाठी तारकपूर बस स्थानक समोर डॉ. कथुरिया यांच्याकडे सकाळी आले होते. औषध घेण्यासाठी ते आनंद मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्समध्ये आले. मात्र … Read more

नगर-कल्याण रोडवर अपघातात एकाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-नगर-कल्याण रोडवरील धोत्रे शिवारात एका भरधाव वेगातील कारने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात १ जण ठार झाला आहे. गोरख रावसाहेब डोईफोडे (वय २८) असे अपघातात मृत पावलेल्या इसमाचे नाव आहे. रेवणनाथ रावसाहेब डोईफोडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पारनेर पोलिस ठाण्यात २२ मार्च रोजी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८१ हजार ४३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५९९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४१२१ इतकी … Read more

अवकाळी पावसाचा फटका : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-गेल्या तीन दिवसापासून कमी अधिक प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील पढेगाव भागातील शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. सध्या भागातील गहू, हरभरा काढण्याचे काम सुरू असून हजारो क्षेत्रावर कांदा पिक शेतात उभे आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गव्हाचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबरोबरच मका, घास, ऊस आदी पिकांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला … Read more

माजीमंत्री कर्डीले म्हणाले….राज्य सरकारला शेतकर्‍यांचे काही देणे-घेणे नाही

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-राज्यात सध्या वीजबिलाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपत आहे. वीजबिल माफीसाठी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. मात्र वीजबिले माफ होणार नाही अशी ठाम भूमिका सरकारने घेतली आहे. यातच माजीमंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी या प्रश्नावरून सरकारवर टीका केली आहे. यावेळी बोलताना कर्डीले म्हणाले कि, वीजपुरवठा व रोहित्र बंद करण्याचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम आजही वाढलेत ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक कायम असल्याचे आजही समोर आले आहे आजही काेराेनाबाधितांचा आकडा 600 च्या जवळ पाेहाेचला आहे.  गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात आज 599 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. त्यात नगर शहरात 186 रुग्णांचा समावेश आहे.  अहमदनगर शहर 186, राहाता 72, संगमनेर 29, श्रीरामपूर 83, नेवासे 22, नगर तालुका … Read more

पुन्हा गुन्हा घडल्यास थेट कारवाई ?

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-  नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये टू प्लस मधील सर्व आरोपींची प्रत्यक्ष पाहणी करून पुन्हा गुन्हे केल्यास कारवाई केली जाईल . अशी तंबी नगर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी राजेंद्र सानप यांनी दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात टू प्लस अंतर्गत गुन्हेगारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नगर तालुका … Read more

कापड बाजार, मोची गल्लीतील रस्त्यावरील अतिक्रमणे काढा

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:-कापड बाजारातील अनाधिकृत अतिक्रमणे काढावीत तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाज कंटकांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जय जिव्हेश्वर प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षक, मनपा आयुक्त यांना संयुक्तरित्या दिले. कापड बाजारातील घासगल्ली, शहाजी रोड, नवीपेठ, महात्मा गांधी रोड, मोची गल्ली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरच पथविक्रेत्यांनी बेकायदेशीर आणि अनधिकृतपणे अतिक्रमणे केलेली आहेत. या … Read more

भिंती रंगवून नगरकर देतायत स्वच्छतेचा संदेश

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- स्वच्छ भारत अभियाना निमित्त नगर शहर हे फाईव्ह स्टार मानांकन मिळविण्यासाठी सज्ज झाले असून मनपाच्या वतीने विविध ठिकाणी भिंती रंगवून स्वच्छतेचे संदेश देण्याचे काम केले आहे. या माध्यमातून नागरिकांनामध्ये जनजागृती होण्यास मदत होईल. मनपाचे घनकचरा विभागातील कर्मचारी ठिकठिकाणी स्वच्छता मोहिम राबवित आहे. याचबरोबर नगरकरही या स्वच्छता मोहिमेमध्ये मोठया संख्येने उतरले … Read more

शहरातील त्या टोळीवर पोलिसांनी केली मोक्काची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- नगर शहरातील भिस्तबाग चौकातील नयन राजेंद्र तांदळेसह त्याच्या टोळीवर पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे. एलसीबीचे पीआय अनिल कटके यांनी ही माहिती दिली. याबाबत अधिक माहिती अशी कि, 25 डिसेंबर 2020 रोजी या टोळीने संघटितपणे गुन्हा केल्याचे समोर आल्यानंतर या टोळीविरोधात मोक्काचा प्रस्ताव तयार करून तो नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात … Read more

चोवीस तासांत वाढले ६९२ रुग्ण, वाचा अहमदनगर जिल्ह्यातील सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज ६११ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८० हजार ९८० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६९२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३९७८ इतकी … Read more