अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातही वाढतोय कोरोना ! जाणून घ्या आजची आकडेवारी …

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- काही दिवसांपासून राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.दरम्यान आज अहमदनगर जिल्ह्यातही तब्बल १७१ रुग्ण वाढले आहेत याची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे आजवर झालेल्या कोरोना टेस्ट : ३,९८,७०९ एकूण रूग्ण संख्या: ७४०५० बरे झालेली रुग्ण संख्या: ७२०६९ उपचार सुरू असलेले रूग्ण: ८६० मृत्यू :११२१ राज्यात महिन्याभरातील सर्वाधिक रुग्णवाढ … Read more

उड्डाणपुलाच्या कामामुळे शहरात होतेय वाहतुक कोंडी

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-नगर शहरामध्ये सक्कर चौक ते जीपीओ चौकादरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरु असून या कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान शहरात सुरु होत असलेल्या उड्डाणपुलामुळे शहरातील वाहतुकीचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. परंतू, सध्या याच उड्डाणपुलाचे सुरु असलेले काम नगरकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पुलाच्या कामामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरून जाण्या येण्यास अडचण निर्माण … Read more

तंबाखूमुक्त शाळा अभियानाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा -जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-शैक्षणिक संस्था आणि त्यांचे परिसर तंबाखूमुक्त व्हावेत, यासाठी तंबाखूमुक्त शाळा अभियानाची सर्व संबधित यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, आवश्यक तेथे आर्थिक दंड आकारावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी आज दिले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तंबाखूमुक्तीसाठीच्या विविध … Read more

महापालिकेच्या ‘त्या’ भ्रष्ट लाचखोर अधिकाऱ्याकडे सापडली गडगंज संपत्ती

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर महानगरपालिकेचा आरोग्य अधिकारी नरसिंह पैठणकर यांना अडीच लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रंगेहात पकडले. दरम्यान महापालिकेचा लाचखोर आरोग्य अधिकारी पैठणकर याच्याकडे काल दिवसभरात सुमारे 55 लाख रुपयांच्या मालमत्ता असल्याचे उघड झाले. त्याच्याकडे आणखी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ठेकेदाराकडून अडीच लाख रुपयांची लाच घेताना घनकचरा … Read more

खून प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी मुंबईतून केली अटक

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-रमेश काळे खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने थेट मुंबईतून अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रमेश ऊर्फ रमाकांत खबरचंद काळे याला मेलेली बकरी देतो असे सांगत मोमीन गल्ली परिसरातील काटवनात नेण्यात आले.21 फेब्रुवारी 2017 रोजी विषारी औषध पाजून त्याला मारहाण केली. त्यात … Read more

जिल्हा बँक: चार जागांसाठी शनिवारी मतदान

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूकप प्रक्रीया सुरु आहे. बँकेच्या २१ पैकी १७ जागा बिनविरोध झाल्याने उर्वरीत चार जागांसाठी शनिवार दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. जिल्हयात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक याप्रमाणे चौदा मतदान केंद्रातील १७ बुथवर मतदान प्रक्रियेचे काटेकोर नियोजन … Read more

भरदुपारी कारची काच फोडून व्यापाऱ्याचे अडीच लाख पळवले

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-येथील एका कांदा व्यापाऱ्याने बँकेतून काढलेली अडीच लाखांची रक्कम एका रेक्झीनच्या पिशवीत ठेवली. व ती पिशवी कारमध्ये ठेवून कार पार्कींगध्ये लावलेली असताना अज्ञात भामट्याने त्यांच्या कारची काच फोडून आत ठेवलेली अडीच लाखांची रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, शहरातील कांदा व्यापारी गणेश लक्ष्मणराव ताठे यांनी त्यांच्या … Read more

या पोलिस अधिकाऱ्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मिळवून दिला १२० कोटींचा मोबदला

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-पिके खरेदी करून त्यांचा मोबदला न देणाऱ्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना  जवळपास १२० कोटी रुपये मोबदला मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांचा स्नेहबंध फौंडेशन च्या वतीने पदक सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिघावकर यांनी पोलीस दलात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तसेच शेतकऱ्यांना न्याय … Read more

अहमदनगर रेल्वे स्थानकावर रेल्वे रोकोचा प्रयत्न पोलीसानी प्रवेशद्वारातच अडवले आंदोलकांना

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- दिल्लीच्या सीमेवर अडीच महिन्यांहून अधिक कालावधीपासून आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांची दखल न घेता त्यांचे आंदोलन हुकुमशाहीने दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा निषेध नोंदवून अ.भा.किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने अहमदनगर रेल्वे स्थानक येथे रेल्वे रोकोचा प्रयत्न करण्यात आला. शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी देशभर रेल्वे रोकोची हाक दिली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस मुंबईतून अटक !

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- भिंगारमधील मोमीन गल्ली मध्ये चार वर्षांपूर्वी झालेल्या हत्याकांड मधील आरोपीला आखेर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि दि. २१ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी ७. ०० वा. सुमारास जावेद शेख, रा. मोमीन गल्ली, भिंगार याने रमेश उर्फ रमाकांत खबरचंद काळे, वय- ३५ … Read more

बिग ब्रेकिंग : सुजय विखे करणार जिल्ह्याच्या राजकारणातील गौप्यस्फोट…

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्हा बँकेच्या 17 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित चार जागांसाठी शनिवारी मतदान होत आहे. व रविवारी 21 तारखेला निकाल लागेल. निकालानंतर खा. विखे हे गौप्यस्फोट करणार आहेत. खा. डॉ. सुजय विखे हे रविवारी मतदानानंतर गौप्यस्फोट करणार असून आपली भूमिका त्यादिवशी पत्रकारांसमोर स्पष्ट करणार आहोत असे त्यांनी अहमदनगर शहरात … Read more

अहमदनगरचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत ! मनपाने केले ‘हे’ आवाहन ….

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-  शहर पाणीपुरवठा योजनेवरील मुळानगर पंपींग स्टेशन येथील ७२५ अश्वशक्तीचा पंप नादुरुस्त झालेला होता. सदरचा पंप मंगळवार दि.१६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता दुरुस्त करुन दोन दिवसापासून विस्कळीत झालेला शहराचा पाणीपुरवठा पुर्व पदावर आणण्याचे प्रयत्न सुरु असताना दि.१७ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजता पुन्हा मुळानगर पंपींग स्टेशन येथील ७२५ अश्वशक्तीचा … Read more

नागेबाबा मल्टिस्टेटच्या कर्जदारास न्यायालयाने सुनावली १८ महिन्यांची शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-नगर येथील श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट को ऑप. संस्थेचे कर्जदार राम अनिल ठुबे (रा. नेवासा फाटा ता. नेवासा) यांनी संस्थेस कर्जबाकी पोटी दिलेला धनादेश वटना नाही म्हणून कर्जदार राम ठुबे यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी.आर. दंडे यांनी १८ महिन्यांची कैदेची शिक्षा सुनावली आहे. तसेच नुकसान भरपाईपोटी १० लाख रुपये रक्कम … Read more

चोरटयांनी दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला करत लाखोंचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात कायदा – सुव्यवस्थेच्या बोजवारा उडाला आहे. दरदिवशी होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. नुकतेच नगर तालुक्यातील हिंगणगाव शिवारात पती-पत्नीवर चाकूने हल्ला करून दिवसा चोरी केल्याची घटना घडली. चोरटयांनी जीवघेणा हल्ला करत 5 लाख 42 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी पोलीस सेवेतून … Read more

जिल्हा बँकेच्या चार जागांसाठी १४ मतदान केंद्रांवर मतदान

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत २१ जागांपैकी १९ जागा बिनविरोध झाल्या. चार जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. दरम्यान ज्या चार जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्या चार जागांसाठी १४ मतदान केंद्रांवर शनिवारी (दि. १९) मतदान होत आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ यावेळेत मतदान होणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील कर्जत, पारनेर, … Read more

11 मार्चपासून शिर्डीसाठी विशेष रेल्वे धावणार

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुविधांसाठी विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 11 मार्चपासून दादर (टी)- शिर्डी- दादर (टी) व शिर्डी- दादर या विशेष एक्सप्रेस धावणार आहेत. सदर गाडीचे कोचेस आरक्षित असल्याची माहिती मध्य रेल्वे विभागाने दिली आहे. असे असणार रेल्वेचे विशेष गाड्यांचे वेळापत्रक दादर- शिर्डी एक्सप्रेस 11 मार्चपासून दादर … Read more

या आमदाराचा ‘सिव्हिल’ला सुपर स्पेशालिटी बनविण्याचा मानस!

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून एक आरोग्य मंदिर उभे करायचे आहे. या माध्यमातून एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार. कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये अभिमानाची एक बाब म्हणजे आरोग्य सेवेमध्ये सरकारी यंत्रणा सर्वात आधी पुढे आली, यात जिल्हा रुग्णालयाचे काम कौतुकास्पद आहे. असे मत आमदार संग्राम जगताप … Read more

पाणी प्रश्‍नी निंबळकच्या शिष्टमंडळाने घेतली उद्योग मंत्री अदिती तटकरे यांची भेट

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-शहरा जवळ व एमआयडीसीलगत असलेल्या निंबळक (ता. नगर) गावाची लोकसंख्या विचारात घेता गावाचा पाणी प्रश्‍न गंभीर बनला आहे. गावाला एमआयडीसी कडून होणार्‍या दररोजच्या पाणीपुरवठ्यात वाढ होण्याच्या मागणीसाठी गावाच्या शिष्टमंडळाने आमदार निलेश लंके यांच्यासह उद्योग मंत्री ना. अदिती तटकरे यांची मुंबई मंत्रालयात भेट घेऊन, गावाच्या पाणी प्रश्‍नावर चर्चा केली. उद्योग मंत्री … Read more