दिव्यांगांसाठी अनामप्रेमने केलेले कार्य देशात पथदर्शी. -डॉ.नीलम गोऱ्हे

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-दिव्यांगांसाठी अनामप्रेमने सुरू केलेले नोकरी आणि रोजगार प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षा केंद्र, अंध आणि मुक बधीर शाळा, शेती आणि दुग्ध प्रकल्प यातून आजवर सुमारे 20 हजारांवर दिव्यांगाना नवजीवन, सरकारी नोकऱ्या आणि प्रतिष्ठा मिळाली. दिव्यांगाना सोबत घेऊन केवळ लोकाश्रय आणि श्रमसाधनेतून साकारलेले अनामप्रेम संस्थेचे कार्य देशातील दिव्यांग विकास कार्याच्या इतिहासातील एक … Read more

प्रा.डॉ.चंद्रकांत कडू पाटील यांना गुणवंत अध्यापक पुरस्कार प्राप्त

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इंन्स्ट्रयुमेंन्टेशन अॅण्ड कंट्रोल इंजि विभागाचे विभाग प्रमुख व तीसगांव प्रवरा येथील स्व.बबनराव कडू पाटील यांचे चिरंजीव प्रा.डॉ.चंद्रकांत कडू पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाच्या वतीने दिला जाणारा गुणवंत अध्यापक पुरस्कार नुकताच प्राप्त झाला. पुणे विदयापीठात झालेल्या कार्यक्रमात सावित्रीबाई … Read more

मोबाईल शॉपीवर चोरट्यांचा डल्ला; 33 लाखांचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-नगर जिल्ह्यात दरोड्खोरी, चोरी, घरफोडीचे घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यातच वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांबरोबरच व्यापारी देखील भयभीत झाले आहे. नुकतेच चोरट्यांनी शहरातील टिळक रोडवरील मोबाईल शॉपीचे शटर उचकटून विविध कंपन्याचे मोबाईल, रोख … Read more

जिल्हाधिकारी म्हणाले…लॉकडाऊनसारखा कठोर निर्णयही घ्यावा लागेल

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट चांगला सुधारला आहे. आता लसीकरण देखील सुरु करण्यात आले असल्याने नागरिक देखील बेभान होऊन नियमांची पायमल्ली करताना दिसत आहे. मात्र राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावताना दिसत आहे. करोना अद्याप गेलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरा, अन्यथा पोलीस दंड करणार आहेत. जर नागरिकांनी नियम पाळले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज १४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७१ हजार ९३९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.३७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ११४ ने वाढ झाल्याने … Read more

शहरात होणार्या उड्डाण पुलास ‘स्व.अनिल राठोड’ यांचे नाव देण्यात यावे !

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-शिवसेना नेते स्व अनिल राठोड यांचे नाव नगर शहरात होणार्‍या उड्डाणपुलास देण्याचा ठराव आगामी महासभेत घेवून तो मंजूर करावा अशी मागणी शिवसेना नगरसेवकांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती शिवसेना नेते संभाजी कदम यांनी दिली. श्री कदम पुढे म्हणाले की, स्व.अनिल राठोड यांनी नगर शहराचे 25 वर्षे आमदार … Read more

पूजा चव्हाण प्रकरणावर रोहित पवार म्हणाले त्या मुलीला…

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- राज्यात सध्या पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बीड जिल्ह्य़ातील परळी वैजनाथ येथील पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात भाजपाने थेट शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं असून राजीनाम्याची मागणी केली जात आहे. पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी … Read more

वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरीसाठी शहरात रविवारी कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- शहरातील सर्जेपुरा छबु पैलवान तालिम येथे अहमदनगर शहर कुस्ती तालीम सेवा संघाच्या वतीने रविवार दि.21 फेब्रुवारी रोजी 64 वी वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2020-21 स्पर्धेसाठी शहर निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी शहरातील कुस्तीगिरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन … Read more

भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशच्या शहराध्यक्षपदी संदीप हजारे यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश या सामाजिक संघटनेच्या शहराध्यक्षपदी संदीप खंडू हजारे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांच्या हस्ते मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हजारे यांनी नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव हजारे, नगर तालुकाध्यक्ष युवराज हजारे, हरेश्‍वर साळवे, सचिन ठुबे, श्रीरंग … Read more

ब्रेकिंग : पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला जोडे मारत कार्यकर्त्यांनी घातला पेट्रोल पंपाला चपलांचा हार !

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-  पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आज युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे पाटील यांच्या सूचनेवरून जिल्हा युवक काँग्रेस, शहर युवक काँग्रेस आणि नगर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने झोपडी कॅन्टीन येथील दीपक पेट्रोल पंपावर विश्वासघात आंदोलन करण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले,महसूल मंत्री ना.बाळासाहेब … Read more

अहमदनगर मनपातील ‘हा’ अधिकारी अडीच लाख रुपये घेताना रंगेहात पकडला !

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख व उपआरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर याना अडीच लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. एसीबीच्या नशिकच्या पथकाकडून कारवाई सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नशिकच्या पथकाकडून आज सकाळी सावेडी कचरा डेपो येथे ही कारवाई करण्यात आली. ठेकेदाराच्या बिलातील त्रुटी दूर करून … Read more

सिव्हिल हॉस्पिटलमधील बंद सुविधा पुन्हा सुरु करा; आमदार जगतापांनी केली मागणी

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- जिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार केले जात असल्याने इतर सेवा बंद करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी मंगळवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांची भेट घेऊन इतर सेवा तत्काळ सुरू करण्याची मागणी जगताप यांनी केली आहे. गेल्या वर्षभरापासून … Read more

रुग्णांची गैरसोय पाहता आरोग्य केंद्रसाठी नव्याने 45 ऍम्ब्युलन्स येणार

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत जिल्ह्यात 96 प्राथमिक आरोग्य केंद्र असून या अंतर्गत 555 उपकेंद्रांचा समावेश आहे. यातील 45 ठिकाणी रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांचे हाल होत होते. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने या ठिकाणी नव्याने रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेच्या 45 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नव्याने 45 रुग्ण वाहिका खरेदी करण्यात … Read more

शिवसेनेनं खुले केलेलं बाजार समितीचे ‘ते’ गेट पुन्हा बंद

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- नगर बाजार समितीचे काही दिवसांपूर्वी उघडलेले गेट पुन्हा शहर वाहतूक शाखेने बंद केले असून कुठलीही परवानगी नसताना कुलूप तोडून गेट उघडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. हे गेट बंद ठेवण्यात यावे, असे पत्र शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी जिल्हा उपनिबंधक तसेच बाजार समिती प्रशासनाला दिले आहे. दरम्यान … Read more

शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतच अवैध धंद्यांचा सुळसुळाट

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांना उधाण आले असून, या परिसरात दारू, मटका, जुगार अड्डे सर्रास सुरू आहेत. त्या अवैध धंद्यांवर कारवाई केली जात नाही. पोलीसांकडे तक्रार करणार्यांचेही नांव उघड होत असल्याने नागरिक पुढे येण्यास घाबरत आहे. या अवैध धंद्यांचा त्रास स्थानिक नागरिकांना होत असून, या अवैध धंद्यांवर कारवाई … Read more

वाहतूक शाखेने मार्केट यार्डचे ‘ते’ गेट परत केले बंद!

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-नुकतेच काही दिवसापूर्वी उघडलेले बाजार समितीच्या मुख्य प्रवेशव्दाराचे एका बाजूचे गेट शहर वाहतूक शाखेने मंगळवारी दुपारी पुन्हा बंद केले. विनापरवानगी कुलूप तोडून गेट उघडणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करणार असून हे गेट बंद ठेवावे. असे पत्रच शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी जिल्हा उपनिबंधक तसेच बाजार समितीच्या प्रशासनाला दिले आहे. … Read more

शहरातील वाहतूक कोंडी बनतेय पोलिसांसाठी डोकेदुखी

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर शहरांतर्गत सध्या नागरिकांना नागरी समस्या बरोबरच आता मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. शहरांतर्गत बहुतांश रस्ते नादुरुस्त आहेत. भूमिगत ड्रेनेज योजना, अमृत पाणी योजना व केबल नेटवर्कसाठी खोदून ठेवलेले रस्ते अजूनही दुरुस्त झालेले नाहीत. परिणामी, या रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. … Read more

पुन्हा राज्यात वाढतोय कोरोना अहमदनगर मध्ये कशी आहे परिस्थिती ? वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ३०२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७१ हजार ७९४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५७ ने वाढ झाल्याने … Read more