अहमदनगरमध्ये चंदनाच्या झाडाची चोरी!

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-सध्या चोरटे कधी व कोणती वस्तू चोरून नेतील याबाबत काही सांगता येणार नाही.कारण अलीकडे चोरांनी गाय, बैल, शेळी यासह जी वस्तू हातात सापडेल ती पळवण्याच्या घटना घडल्या आहेत. असाच प्रकार बालिका आश्रम रोडवरील एका पेट्रोल पंपावर घडला आहे. या ठिकाणी असलेले चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी कापून नेले आहे. याबाबत सविस्तर … Read more

ती’माझी देखील इच्छा होती; परंतु त्यांनी निवडणूक लावली माजी मंत्री कार्डिले यांचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत चार जागांसाठी शनिवारी मतदान सुरु आहे. माजी मंत्री शिवाजी कार्डिले यांची जागा बिनविरोध होऊ न शकल्याने त्यांना निवडणुकीला सामोरे जाव लागत आहे. नगर तालुका विविध कार्यकारी सेवा संस्था गटात शिवाजी कर्डिले आणि सत्यभामाबाई बेरड यांच्यात लढत होत आहे. यापार्श्वभूमीवर कार्डिले यांनी बिनविरोध न झाल्याने नाराजी … Read more

नगरकरानो वेळीच व्हा सावधान ! सेक्सटॉर्शन च्या माध्यमातून पैसे उकळण्याचा नवीन प्रकार समोर …

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-  आता सायबर टोळ्यांनी सेक्सटॉर्शन च्या माध्यमातून पैसे उकळण्याचा नवीन प्रकार सुरू केला आहे. मागील काही दिवसात नगर जिल्ह्यात अनेक जण या नवीन प्रकाराचे बळी ठरले आहेत. गेल्या दोन महिन्यात नगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तब्बल तीस जणांनी संपर्क करून त्यांच्या सोबत घडलेला हा प्रकार सांगितला आहे तर त्यापैकी वीस … Read more

पुन्हा दुकाने सुरु केली तर जेसीबी लावून पाडू

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- नगर तालुक्यातील सारोळा कासार-घोसपुरी रस्त्यावर घोसपुरी गावाच्या शिवारात खानावळीच्या नावाखाली अवैध दारूविक्रीची दोन दुकाने थाटलेली आहेत. या अवैध दारूविक्री दुकानांविरोधात घोसपुरी (ता. नगर) येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत ही दुकाने बंद पाडली. तसेच पुन्हा ही दुकाने सुरू झाल्यास ग्रामस्थ थेट कायदा हातात घेऊन दुकाने जेसीबी लावून पाडतील, असा इशाराही … Read more

काळ्या बाजारात चालवलेला तांदूळ पकडला!

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात घेवून जाणाऱ्या दोघांना नगर तालुका पोलिसांनी मालट्रकसह ताब्यात घेतले आहे. गोविंद विद्यासागर वाघमारे, राहुल भगवान घोरपडे (दोघे रा.कलांडी ता निलगा जि. लातूर )अशी त्यांची नावे आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील अरणगाव बायपास येथे रात्रीच्यावेळी रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात घेवून जात असताना गोविंद … Read more

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. दरम्यान राज्यासह देशभरात कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याचे आकडेवारीतून स्पष्ठ होत आहे. यामुळे सर्वत्र प्रशासन सतर्क झाले आहे. नुकतेच जिल्ह्यातील वाढत्या कोरोना आकडेवारीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक … Read more

खुशखबर ! सावेडी नाट्यगृहासाठी एवढे कोटी झाले मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-सावेडीतील नाट्यगृहाचे काम गेल्या काही वर्षांपासून मंद गतीने सुरू आहे. नाट्यगृहासाठी येणारा खर्च आणि प्रत्यक्ष निधी यात मोठी तफावत असल्याने काम वेगाने होत नव्हते. आ. जगताप यांनी निधी मिळविण्यासाठी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान आमदार संग्राम जगताप यांच्या मागणीला यश आले आहे. सावेडीतील नाट्यगृहासाठी जवळपास नऊ कोटी रूपयांच्या … Read more

जागतिक सूर्य नमस्कार दिन साजरा दोनशेपेक्षा जास्त योग साधकांनी घातले सुर्यनमस्कार

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-रथसप्तमीनिमित्त सावेडी येथील आनंद योग केंद्राच्या वतीने जागतिक सूर्य नमस्कार दिन साजरा करण्यात आला. सावेडी येथील शुभ मंगल कार्यालयात पहाटे सहा वाजल्यापासून योग साधकांनी सूर्य नमस्कार घालण्यास सुरुवात केली. या उपक्रमास परिसरातील नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. आरोग्य निरोगी व सदृढ राहून जीवन आनंदी होण्यासाठी आनंद योग केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना निशुल्क … Read more

शिवजयंतीचे जनक महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर रोषणाई करुन कृतज्ञता सोहळा साजरा

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- शिवजयंतीचे जनक असलेले क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माळीवाडा येथील पुतळ्यासमोर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला दिव्यांची रोषणाई करुन कृतज्ञता सोहळा पार पडला. छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन दिव्यांची रोषणाई करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष … Read more

परजिल्ह्यातून अपहरण केलेल्या मुलाची नगर येथून सुटका

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-अमरावती शहर येथून अपहरण केलेल्या ४ वर्षाच्या मुलाची अहमदनगर येथून सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. दरम्यान पोलिसांनी या अपहरणकर्त्याला जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, 17 फेब्रुवारी रोजी मोनीका लुणिया, (रा. अमरावती) ह्यांचा नातू नयन, वय- ४ वर्षे यांस फिरायला … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज १४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७२ हजार २१४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.३८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०५ ने वाढ झाल्याने … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही समाजाला दिशादर्शक : किरण काळे

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांचे विचार आजही समाजाला एकविसाव्या शतकात देखील तेवढेच दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. शिवजयंती निमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच पक्षाच्या सर्व फ्रंटलच्या वतीने शिवाजी महाराजांच्या एसटी स्टँड येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काँग्रेस पदाधिकारी, … Read more

बळीराजावर आस्मानी संकट ! जिल्ह्यात अनेक ठिकाणी सरी कोसळल्या

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-नगर जिल्ह्याच्या विविध भागात काल मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळला. या पावसामुळे काढणीस आलेला गहू, हरभरा, कांदा तसेच द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात 18 तारखेला पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. या जिल्ह्यासाठी यलो अलर्टही घोषित करण्यात आले होते. रात्रीच्या सुमारास … Read more

प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करा अन लॉकडाउन टाळा! जिल्हाधिकाऱ्यांनी केले हे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील बाधितांची संख्या कमी झाल्याने नागरिकात मास्क न लावणे, गर्दी करणे अशी ढिलाई आढळून येत आहे. कोरोना पूर्णतः नष्ट झालेला नाही. व्हॅक्सीनेशन आले असले तरी गाफील राहणे उपयोगाचे नाही.राज्यातील काही भागात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. तरी, लॉकडाऊन टाळायचे असेल तर जिह्यातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करावे, असे … Read more

भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवजयंती साजरी

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, युवकचे शहर उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, भिंगार कॅन्टोमेंटचे माजी उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे, नाथाजी राऊत, विशाल बेलपवार, अर्जुन बेरड, दिलीप ठोकळ, संपत बेरड, … Read more

‘त्या’ शेतकऱ्यांना दिलासा : नुकसान भरपाई म्हणून मिळणार एवढी रक्कम

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-मागील वर्षी म्हणजे  फेब्रुवारी २०२०  या कालावधीत राज्यात मोठ्या प्रमाणात गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता. या कालावधीत नगर जिल्ह्यात २७०९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होती. बाधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे यामुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील वर्षी म्हणजे  फेब्रुवारी २०२०  … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्हा प्रशासन अलर्ट जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले ‘हे’ आदेश

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-आज एकीकडे आपण विविध उपाय करत कोरोनावर नियंत्रण मिळवले असतानाच दुसरीकडे मात्र राज्यातील अनेक  भागात करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.‌नगर जिल्ह्यातही रूग्णसंख्या वाढु लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.  कोविड केअर सेंटरसह सर्व वैद्यकीय सुविधा … Read more

जिल्ह्यात ३० हजाराहून अधिकांना देण्यात आली कोरोना लस

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर युद्धपातळीवर काम सुरु आहे. जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव देखील हळूहळू कमी होऊ लागला आहे. तसेच जिल्ह्याचा रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला असून 97 टक्क्यांच्या जवळपास पोहचला आहे. दरम्यान जिल्ह्यातील २४ केंद्रांवर गुरुवार अखेरपर्यंत ३० हजार ७९८ जणांना कोरोना … Read more