शहरात चैन स्नॅचिंगच्या घटना सुरूच; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- शहरासह जिल्ह्यांमध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडत असून, या गुन्ह्यांतील टोळ्या पकडून त्यांच्याकडून चोरीला गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पोलिसांची गस्त सुरू असताना चेन स्नॅचिंगच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. नुकतेच शहरातील समर्थ नगर परिसरातील डी पॉल शाळा लगतच्या रहिवासी मोनाली धाडगे या गृहिणी सकाळी ११ वाजण्याच्या … Read more

महाविकास आघाडीने जिल्हा बँकेत भाजपाला पराभवाची धूळ चारली

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्हा सहकारी बॅकेच्या चार जागांची मतमोजणी रविवारी झाली. सर्वांचे लक्ष लागलेल्या नगर तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघ या जागेवर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले निवडून आले. या शिवाय पारनेर व कर्जत विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून अनुक्रमे उदय शेळके, अंबादास पिसाळ निवडून आले आहेत. तर बिगरशेती संस्था मतदारसंघात प्रशांत गायकवाड … Read more

‘या’ गावात अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-नगर तालुक्यातील निंबळक येथे अनोख्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली. गावातील प्रत्येक घरोघरी शिवाजी महाराजांचे शिल्प भेट देण्यात आले. प्रारंभी गावातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दत्तू उर्फ राजू रोकडे … Read more

गंगा उद्यान परिसरात अत्याचाराची घटना, त्या पोलीस निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-कोतवाली पोलीस स्टेशनचा तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ याच्याविरोधात पुन्हा एकदा महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. आधीच्या गुन्ह्यातील पीडित महिलेनेच शनिवारी रात्री तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये वाघ याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता शहरातील सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे व त्याच दिवशी रात्री साडेदहा वाजता मिस्किनमळा … Read more

निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दत्ता पानसरे यांनी केली भविष्यवाणी ! म्हणाले आता भावी आमदार

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील बिगरशेती मतदारसंघाची निवडणूक खूपच चुरशीने लढली गेली. सुमारे साडे तेराशे मतदार या मतदारसंघात होते.त्यांना आपल्याकडे ओढण्याची चढाओढ होती. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. रविवारी सकाळी मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीतच गायकवाड यांनी आघाडी घेतल्यानंतर त्यांचा विजय निश्चित झाला होता.त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी जिल्हा बँकेच्या परिसरात … Read more

जिल्हा बँक निवडणूक Live Updates : कर्डीले, शेळके, पिसाळ,गायकवाड झाले विजयी !

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक उदय गुलाबराब शेळके यांनी १०५ पैकी मते ९९ घेत प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांचा धुव्वा उडविला. नगरमध्ये शिवाजी कर्डीले यांनी ९४ मते घेऊन तर, कर्जतमध्ये अंबादास पिसाळ १ मतांनी विजयी झाले आहेत.व पारनेर चे प्रशांत गायकवाड यांनी पानसरे यांचा पराभव केला … Read more

लुटमारीच्या घटना सुरूच; नगर-औरंगाबाद मार्गावर ट्रकचालकास लुटले

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- शहरात गुन्हेगारी वाढू लागली आहे, दरदिवशी लुटमारीच्या घटना घडत असून यामुळे नागरिकांसह वाहनधारकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच अहमदनगर-औरंगाबाद मार्गावर नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात ट्रकचालकास लुटण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत ट्रकचालक शहाबुद्दीन गुलामवारीस मोहम्मद (वय २१, रा. गौरीगंज, उत्तर प्रदेश) यांनी नेवासा पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. … Read more

कांद्याचा भाव वधारला; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात चढ उतार होत आहे. दरम्यान काही दिवसांपासून कांद्याचे भाव पुन्हा वाढू लागले असून तीन महिन्यानंतर आता पुन्हा कांदा पाच हजार रूपयांपर्यंत गेला आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये एक समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच नगर बाजार समितीत शनिवारी झालेल्या कांदा लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला साडेचार ते … Read more

गुटखा अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; चौघांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी शहरातील विविध टपर्‍यावर धाड टाकुन 23 हजार रुपयाचा गुटखा व सुगंधी तंबाखु जप्त केली आहे. अधिक सविस्तर माहिती अशी कि, पाथर्डीचा मावा रोज मुंबई व कल्याण येथे खाजगी बसमधुन जातो. शिवाय तालुक्याच्या विविध भागातही मावा पुरविण्याचे काम येथील काही युवक करीत आहेत. … Read more

माजी आमदार कर्डीले म्हणाले…माझी हलगर्जीपणा व दुर्लेक्षामुळे माझा पराभव झाला

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-जिल्हा सहकारी बँकेच्या चार जागांसाठी आज मतदान झाले होते. यावेळी माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी मतदानाच्या दिवशी मतदारांचे आभार मानत काही खळबळजनक खुलासे केले आहे. जिल्हा बँकेची निवडणूक प्रसंगी माजी आमदार शिवाजीराव कर्डीले हे बोलत होते. ते म्हणाले कि, बँक निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीचा प्रस्ताव मी ठेवला होता. ही बँक … Read more

भुईकोट किल्ल्याची दुरावस्था पाहता छत्रपती संभाजी राजे नगरला येणार

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-नगरचा इतिहास जपला पाहिजे. ऐतिहासीक वास्तूचे जतन झाले पाहिजे यासाठी जयंत येलूलकर हे कायमच दक्ष असतात. नगरमधील भूईकोट किल्ल्याची दुरावस्था झाली असून बुरूज केव्हाही कोसळेल, हे चित्र येलूलकर यांनीच जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. मात्र त्यावर पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे येलुलकर यांनी पुण्यात खासदार छत्रपती संभाजीराजे यांची भेट … Read more

आक्रमक ग्रामस्थांनी दारू विक्री पाडली बंद

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-नगर तालुक्यातील खोसपुरी येथे खानावळीच्या नावाखाली गावच्या परिसरात सुरु असलेल्या अवैध दारू विक्री दुकानांविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत ही दुकाने बंद पाडली. पुन्हा दुकाने सुरु झाल्यास ग्रामस्थ थेट कायदा हातात घेवून ही दुकाने जेसीबी लावून पाडली जातील. असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नगर तालुक्यातील सारोळा … Read more

सरकारी बाबुला दिला चोप… न्यायालयाने आरोपीला दिली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडला आहेत. आता जिल्ह्यात पुन्हा एकदा अशाच एका घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. एका ग्रामसेवकाला मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस एक वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. जिल्हा न्यायाधीश पी.एन. राव यांनी शनिवारी या खटल्याचा निकाल दिला. दरम्यान याबाबत … Read more

नागरिकांनो लक्ष द्या; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा पायउतार होण्यास सुरुवात झाली होती. रुग्णदर घटत असल्याने प्रशासन देखील काही काळ निर्धास्त झाले होते. मात्र या आनंदावर विरजण पडू लागले असल्याचे चित्र सध्या नगर जिल्ह्यात तयार झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी पुन्हा वाढत आहे. तसेच कोरोनाचा धोका वाढू लागल्याने प्रशासन देखील पुन्हा अलर्ट मोडवर … Read more

ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-भरधाव वेगातील ट्रकची मोटारसायकलला धडक बसून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना नगर तालुक्यातील जखणगाव शिवारात घडली. नवनाथ रामभाऊ काळे (वय ४० रा.निमगाव घाणा) यांचा मृत्यू झाला. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, नगर तालुक्यातील जखणगाव शिवारात भरधाव वेगात आलेल्या ट्रक … Read more

मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-मराठी पत्रकार परिषदच्या वतीने दर्पणकार तथा मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, विजयसिंह होलम, अनिल हिवाळे, विठ्ठल शिंदे, विजय मुळे, … Read more

जिल्हा बँक निवडणूक : १०५ पैकी तब्बल ९३ मतदार आमदार नीलेश लंकेनी आणले आणि….

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-जिल्हा सहकारी बँकेच्या सेवा संस्था मतदार संघात १०५ पैकी तब्बल ९३ मतदार आमदार नीलेश लंके तसेच माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुपारी मतदानाला आल्याने उमेदवार उदय शेळके यांचा एकतर्फी विजय निश्‍चित झाला आहे. बिगरशेती मतदार संघातही प्रशांत गायकवाड यांना एकूण मतदानापैकी ९५ टक्के मतदारांनी कौल दिल्याचे चित्र आहे. … Read more

पत्ता विचारला अन मंगळसूत्र तोडून पळाला!

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-पत्ता विचारण्याचा बहाणा करत एका अनोळखी इसमाने महिलेच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तोडून पळून गेला. ही घटना सावेडी परिसरातील शिलाविहार रोडवर घडली आहे. याबाबत भाग्यश्री अरुण भणगे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाग्यश्री भणगे या शिलाविहार रोडवरील अमेय अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये त्यांच्या … Read more