सहकारी बॅँकनंतर आता सहकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुका होणार

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या होत्या. त्यापाठोपाठ जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकीचे वातावरण शांत होते तोच आता जिल्ह्यातील सहकारी सेवा सोसायट्यांचा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. जिल्ह्यात 2020 मध्ये मुदत संपलेल्या सहकारी संस्थांची संख्या 1 हजार 900 पेक्षा अधिक आहे. या सर्व सहकारी संस्थांची निवडणूक येणार्‍या वर्षभरात … Read more

‘त्या’ कार्यालय चालकांना दणका

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- देशभरासह राज्यात परत एकादा कोरोनाने डोके वर काढले आहे. रोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र शहरातील अनेक मंगल कार्यालये गर्दीने ओसंडून वाहत आहेत. आता प्रशासनाने नव्या नियमावलीचा बडगा उगारला गेला आहे. कारण लग्न समारंभाची धूम सुरू असून त्याला अटकाव करण्याची जबाबदारी ही मंगल … Read more

जिल्हा बँक निवडणूक ! फोडाफोडीचे राजकारण परंपरा यावेळी देखील कायम

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कर्जत तालुक्यामधून आ. राधाकृष्ण विखे गटाचे अंबादास पिसाळ ३७ मते मिळाली. तर विरोधी महाविकास आघाडीच्या उमेदवार साळुंके 36 मते मिळाली. यात एक मताने साळुंके यांचा पराभव झाला. यावरून तालुक्यातील जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतांच्या फोडाफोडीचे राजकारण परंपरा यावेळी देखील कायम राहिली. दरम्यान जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदानाच्या … Read more

डेंटल कॉलेजच्या प्राध्यापकाला एकाने बेदम चोपले

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-पत्नीच्या बढतीच्या कारणावरून वडगाव गुप्ता येथील डेंटल कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले डॉ. दिनेश विजय राजपूत यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच मारहाण करणाऱ्या व्यक्तीने प्राध्यापक राजपूत यांच्या कारची तोडफोड देखील केली आहे. दरम्यान धक्कादायकबाब म्हणजे हा सर्व प्रकार कॉलेजच्या पार्किंगमध्ये घडला होता. दरम्यान या प्रकरणी डॉ. दिनेश विजय राजपूत यांनी … Read more

पीएम किसान योजनेत नगर जिल्ह्यास राष्ट्रीय पुरस्कार! बुधवारी दिल्ली येथे होणार गौरव

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल नगर जिल्ह्यास भौतिक तपासणी या संवर्गात प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात बुधवारी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. नवी दिल्लीतील ऐ.पी.शिंदे सभागृहात पुरस्कार वितरण समारोह संपन्न होणार आहे. जिल्ह्याचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी … Read more

‘त्यांना’ धडा शिकविण्यासाठी हा खेळ केला; मात्र यात आमच्या सारख्या सर्वसामान्याचा बळी गेला!

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी बरोबर असलेल्या काही लोकांमुळे आमचा पराभव झाला. आ रोहित पवार यांना निशाणा करण्यासाठी तसेच त्यांना धडा शिकविण्यासाठी त्याच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी आमच्या खांद्यावर बंदूक हा खेळ केला आहे. मात्र त्यांच्या या जिरवाजिरवीत आमच्या सारख्या सर्वसामान्याचा बळी गेला आहे. या पराभवाचे   आ.रोहित पवार यांच्यासह सर्वांनाच … Read more

बेशिस्तांवर कारवाईसाठी एसपी व जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कोरोना नियमावली जारी केली आहे. त्यात लग्न सोहळ्यासाठी केवळ 50 वर्‍हाडींनाच परवानगी आहे. मात्र, या नियमांचे पालन होत नसल्याने आज सोमवारी कलेक्टर राजेंद्र भोसले हे एसपी मनोज पाटील यांना सोबत घेऊन तपासणीसाठी रस्त्यावर उतरले. या पथकाने सिटी, ताज आणि आशिर्वाद लॉन्स या ठिकाणी रेड … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात 15 मार्चपर्यंत ‘ह्या’ वेळेत संचारबंदी !

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे एक भाग म्हणून नगर जिल्ह्यात १५ मार्चपर्यत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींना फिरण्यावर निर्बध घालण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे एक भाग म्हणुन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास प्रतिबंध व्हावा म्हणुन,  … Read more

शिवजयंतीला कोरोना योध्दांचा सन्मान टॅलेंट ऑफ अहमदनगर पुरस्कारांचे वितरण

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-छत्रपती शिवरायांनी शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. शिवाजी महाराज अतिशय धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्व गुण संपन्न होते. सर्वसामान्य रयतेवर अन्याय होऊ नये, त्यांचे हक्क अबाधित रहावे, म्हणून त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांच्या कार्यातून व विचारातून आजच्या युवकांनी प्रेरणा घेण्याचे आवाहन आमदार संग्राम … Read more

निंबळकला घरोघरी शिवाजी महाराजांचे शिल्प भेट देऊन जयंती साजरी

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-निंबळक (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती घरोघरी शिवाजी महाराजांचे शिल्प भेट देऊन साजरी करण्यात आली. प्रारंभी गावातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दत्तू उर्फ राजू रोकडे यांनी स्व. भिमा गोविंद … Read more

आमदार रोहित पवार यांना निशाणा करण्यासाठी आमचा बळी !

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बरोबर असलेल्या काही लोकांमुळे पराभव झाला आहे. आमदार रोहित पवार यांना निशाणा करण्यासाठी आमचा बळी देण्यात आला असून याचे आत्मपरीक्षण सर्वानाच करावे लागणार आहे. असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके व मिनाक्षीताई साळुंके यांनी व्यक्त केले आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणूकित कर्जतमधून साळुंके व … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढतोय कोरोना ! चोवीस तासांत आढळले ‘इतके’ रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-:- जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा पायउतार होण्यास सुरुवात झाली होती. रुग्णदर घटत असल्याने प्रशासन देखील काही काळ निर्धास्त झाले होते.  मात्र या आनंदावर विरजण पडू लागले असल्याचे चित्र सध्या नगर जिल्ह्यात तयार झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी पुन्हा वाढत आहे. तसेच कोरोनाचा धोका वाढू लागल्याने प्रशासन देखील पुन्हा अलर्ट … Read more

‘मी हाडाचा पैलवान असल्यानेच विरोधकांचे राजकीय डाव उधळून लावले’

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-मी हाडाचा पैलवान असल्याने मला  कुस्तीच्या खेळातील अनेक डावपेच माहित आहेत. त्यामुळे राजकीय पटलावर विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या डावात मी सापडणारा नाही. राजकीय डावपेचात माझा पुर्ता हातखंडा असल्याने विरोधकांचे स्वप्न धुळीस मिळवण्याचे काम केले आहे, अशा शब्दात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालानंतर विरोधकांना सूचक … Read more

महागाईच्या काळात जगण्यासाठी पगारवाढ द्यावी अवतार मेहेरबाबा कामगार युनियनची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-अवतार मेहेरबाबा ट्रस्ट कामगारांचे वेतन वाढीचे प्रकरण सहाय्यक कामगार आयुक्तांपुढे सुरु असून, 23 फेब्रुवारी रोजी शेवटची सुनावणी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवजयंती दिनी लाल बावटा संलग्न अवतार महेरबाबा कर्मचारी युनियनची अरणागाव (ता. नगर) येथे बैठक पार पडली. वाढती महागाई, कोरोना महामारीमुळे ओढवलेले आर्थिक संकटामुळे कामगारांचे अत्यल्प पगार असल्याने दरमहा चार … Read more

नोटाबंदी व जीएसटीनंतर महागाईच्या भडक्यात जनता होरपळत आहे

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-बहुजन समाज पार्टी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कार्यरत आहे. सत्ताधारी भाजपने फक्त नागरिकांना आश्‍वासन देऊन दिवसा स्वप्न दाखविले. सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सुटण्यास अवघड झाले असताना, नोटाबंदी व जीएसटीनंतर महागाईच्या भडक्यात जनता होरपळून निघत आहे. सत्ताधारी महागाई रोखण्यात अपयशी ठरत असताना सर्वसामान्यांना जगणे देखील अवघड झाले असल्याची भावना बसपाचे राष्ट्रीय महासचिव खासदार … Read more

अंगावर कार घालून प्रोफेसरला जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-पत्नीच्या बढतीच्या कारणावरून बेसबॉलच्या बॅटने डोक्यावर डाव्यापायावर जबर मारहाण करून प्रोफेसरला आत तूला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देवून अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना वडगाव गुप्ता येथील डेंटल कॉलेजच्या पार्किंगमध्ये घडली. याप्रकरणी डॉ.दिनेश विजय राजपूत यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी अतुल प्रविण पाटीदार याच्याविरोधात गुन्हा दाखल … Read more

शिवाजी महाराजांचा विसर पडल्यामुळेच स्वतंत्र्योत्तर काळात भ्रष्टाचार, अत्याचार, अनागोंदी माजली

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने नव्या पिढीत राजमाता जिजाऊंच्या शिकवणीप्रमाणे शिवाजी महाराजांसारखे संस्कार घडविण्यासाठी जिजाऊ शिव जाणिव जागरण कार्यक्रम जारी करण्यात आला. तर भूमीगुंठा योजनेतंर्गत स्मॉल इंडस्ट्री फ्रॉम होम योजनेचा प्रस्ताव हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकित मांडण्यात आला. प्रारंभी दिवंगत न्यायमुर्ती … Read more

डॉनबॉस्को विद्यालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-  बेकायदेशीर सहल काढणार्‍या व तीन व्यक्तींच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या डॉन बॉस्को विद्यालयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालया समोर घंटानाद आंदोलन केले. या आंदोलनात पालक सोन्याबापु भाकरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश अल्हाट, संदीप ठोंबे, बाळासाहेब पाटोळे, प्रा.पंकज लोखंडे, मोहन ठोंबे आदी सहभागी झाले होते. … Read more