ही बातमी वाचाच ! कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात …

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.महसूल, पोलिस, पालिका, आरोग्य व पंचायत समिती अशा सर्व यंत्रणा संयुक्तपणे कार्यरत झाल्या आहेत. नागरिकांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे. लग्नसोहळे, दशक्रियासाठी शासनाने निर्धारित केलेल्या संख्येपेक्षा जास्त उपस्थिती तपासणीदरम्यान आढळली, तर तत्काळ गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक रणजीत डेरे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १७४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७२ हजार ९४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७६ ने वाढ … Read more

मनपाची आर्थिक ऐपत नसल्याने खड्डे बुजविण्यासाठी डांबराचा वापर

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-सिमेंट रोडवर डांबराचा थर टाकून रस्ता करण्याचं अजब काम नगरमध्ये सुरू आहे. पावसाळ्यात सिमेंटवरचं डांबर वाहून जाईल. त्याला जबाबदार कोण? संबंधित कामाची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना नगरसेवक योगीराज गाडे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. शहरातील दिल्लीगेट ते नेप्ती चौक हा सिमेंटचा रस्ता असून तो ठिकठिकाणी … Read more

पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण करण्याची मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-राज्यात सध्या औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा गाजत असतानाच आणखी एका शहराच्या नामांतराची मागणी करण्यात आली आहे. नगर जिल्ह्याला ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ असे नामांतर करावे, अशी मागणी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिले आहे. मध्यंतरी शिवसेनेनेही अहमदनगरचे नाव बदलण्याची … Read more

दिव्यांगी लांडेला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पश्चिम विभागीय मैदानी स्पर्धा

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-अहमदनगर येथील दिव्यांगी कृष्णा लांडे या खेळाडूने राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले . पश्चिम विभागीय राष्ट्रीय मैदानी स्पर्धा कोटा स्टेडियम रायपूर ,छतिसगड येथे दि .२४ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत सुरू आहेत. ट्रॅक रेसर्स स्पोर्टस फाऊंडेशनची खेळाडू दिव्यांगी कृष्णा लांडे ही महाराष्ट्राकडून १४ वर्ष वयोगटात ६० मीटर … Read more

कौतुकास्पद : अहमदनगर जिल्ह्यास पहिला क्रमांक,दिल्लीत पुरस्कार प्रदान !

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :- प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल नगर जिल्ह्यास भौतिक तपासणी या संवर्गात प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावर अहमदनगर जिल्ह्याचा दिल्ली येथील कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय कृषीमंत्री श्री.तोमर व केंद्रीय राज्य मंत्री चौधरी, … Read more

महावितरणचा हॉटेलमालकाला ‘शॉक’ : 7 लाखांची वीजचोरी केल्याचा गुन्हा दाखल!

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021 :- हॉटेलच्या मालकाने वीजमिटरमध्ये हेराफेरी करून वीजचोरी केली. मात्र महवितरणच्या पथकाने हेराफेरी पकडली असून त्या हॉटेलमालकावर तब्बल ६ लाख ९० हजारांची वीज चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना नगर तालुक्यातील खोसपुरी शिवारातील ‘हॉटेल तंदुरी चाय लीलीयम पार्क’मध्ये घडली.  या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संदीप जरे आणि भारत … Read more

….म्हणून माजी महापौर म्हणाले नगरकरांनो काळजी घ्या

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा आलेख उंचावत असल्याने महानगरपालिकेने बंद केलेले कोविड केअर सेंटर सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. यापार्श्वभूमीवर नगरकरांनी सावधनता बाळगून करोना प्रतिबंध नियमावलींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केले आहे. दरम्यान जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे. दरदिवशी वाढती … Read more

निवडणूक रणधुमाळी ! मनपा स्थायी समितीची सभापती निवडणूक तारीख जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. ग्रामपंचायत निवडणूक पार पडली तोच जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूका पार पडल्या. दरम्यान आता नगर मनपाच्या स्थायी समितीची सभापती निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभापती निवडणुक येत्या 4 मार्च रोजी होणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 4 … Read more

मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान अतुलनीय – किरण काळे

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- देशाचे पहिले शिक्षणमंत्री, थोर स्वातंत्र्यसेनानी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष स्व. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान हे अतुलनीय आहे, असे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. … Read more

कर्मचाऱ्यांसह ५० पेक्षा जास्त उपस्थिती असल्यास होणार दंड

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-देशात कोविडची दुसरी लाट सुरु झाल्याचे बोलले जात असून, त्याचा सर्वाधिक फटका राज्याला बसला आहे. गेल्या सहा दिवसांपासून राज्यातील रुग्णवाढ वेगात वाढत असून, राज्य शासनाने नव्याने काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार सार्वजनिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना पूर्णत: मनाई करण्यात आली असून अंत्यविधी व लग्न सोहळ्यांच्या उपस्थितीवरही मर्यादा आणल्या आहेत. … Read more

शाळेत घुसून शिक्षकास मारहाण नगर तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक डी.जी. महारनवर व कोरके यांना गावातील विकास खाकाळ यांनी मारहाण करुन धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. तरी शिक्षकांना मारहाण करणाऱ्या संबंधित आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई अशी मागणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद … Read more

कोरोना फोफावतोय ! बंद केलेली कोरोना केंद्र मनपा पुन्हा सुरु करणार

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा फैलावत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत काहीशी वाढ होत आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसून येत होता. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असताना नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना फैलावत आहे. आजच्या … Read more

आमदार राजळे जिल्हा बँकेत उपाध्यक्ष होणार?

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये १७ उमेदवार बिनविरोध झाले तर चार उमेदवारांसाठी निवडणूक झाली. जिल्ह्याच्या राजकीय दृष्टिकोनातून जिल्हा सहकारी बँकेला मोठे महत्त्व असून, या बँकेच्या उपाध्यक्षपदी पाथर्डी शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय पटलावर सुरू झाली आहे. जिल्हा सहकारी बँकेमध्ये … Read more

निरंकारी मंडळातर्फे बाबा हरदेव सिंहजी जन्मदिवस वृक्षारोपणाने साजरा

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या 67 व्या जन्मदिनी संत निरंकारी मिशनतर्फे दि.21 ते 23 फेब्रुवारी 2021 दरम्यान देश-विदेशात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियान राबविण्यात आले. यावेळी प्रत्येक निरंकारी परिवाराने जास्तीत जास्त रोपे लावून त्याचे तीन वर्षांपर्यंत संगोपन व संरक्षण करावे, हा अभियानाचा उद्देश असून, बाबा हरदेव सिंहजी महाराजांचे हरितक्रांतीचे स्वप्न … Read more

अहमदनगरच्या उड्डाणपूलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या!

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-शहरातील यश पॅलेस ते डीएसपी चौक दरम्यान प्रस्तावित उड्डाणपूल उभारणीच्या कामास सुरुवात झाली असून, या पुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव देण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पुणे, नाशिक, औरंगाबाद शहराच्या … Read more

आज वाढले इतके रुग्ण ! कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियम पाळा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे जिल्हावासियांना आवाहन…

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर राज्याच्या काही भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हा पातळीवरही संसर्ग रोखण्यासाठी आता पुन्हा वेगाने पावले उचलली असून जिल्हावासीयांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना चेहर्‍यावर मास्क वापरावा, शारिरीक अंतर पाळावे आणि सॅनिटायझरचा वापर करावा. रात्री … Read more

शिवाजीराव कर्डिले यांचा सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी नेहमीच पुढाकार

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांची मोठ्या मताधिक्याने निवड झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व प्राचार्यां च्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बाणेश्‍वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य बाळासाहेब वाकचौरे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शिक्षक नेते प्राचार्य चंद्रकांत चौगुले, शिवाजीराव केदार, संपत … Read more