पुढील दहा दिवस अत्यंत महत्वाचे कोव्हिड टास्क फोर्समधील डॉक्टरांचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-आज मितीला राज्याच्या अनेक भागांत कोरोना रूग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढत आहे. मुंबई आणि उपनगरांतही तीच परिस्थिती आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करायचे की नाही याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांवर सोडला आहे. अमरावतीत सात दिवसांचा लॉकडाऊन घोषीत केला आहे. एकंदर या सर्व परिस्थितीत कोव्हिड टास्क फोर्समधील डॉ.राहुल पंडित यांनी मात्र चिंता … Read more

‘त्या’चर्चेमुळे हॉटेल व्यावसायिक चिंतेत!

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-कोरोना संसर्ग तसेच लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका हॉटेल क्षेत्राला बसला असून, आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या चर्चेमुळे या क्षेत्रात परत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत अंशत: टाळेंबदी केली आहे. पुणे, नागपूर आणि औरंगाबाद यासारख्या काही शहरांमध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंटवर वेळेचे निर्बंध आल्याने आता पुन्हा एकदा व्यवसायाला झळ … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कांद्याचा रिव्हर्स गिअर,वाचा आजचे दर…

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-लॉकडाऊन नंतर राज्यासह देशभरातील सर्वच कांदा मार्केटमध्ये कांद्याचे दर प्रचंड वेगाने वाढून ते ८ हजारांच्यावर गेले होते. त्यानंतर हेच दर ४ ते पाच हजारांवर स्थिरावले होते. परंतु सध्या कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गुरूवारी येथील नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीत एक नंबर कांद्याला अवघा २७०० … Read more

शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परिक्षा फी योजनेकरीता अर्ज भरण्याबाबत आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-जिल्हयातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशीत मागासवर्गीय (अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग) विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरीता दिनांक 3 डिसेंबर 2020 पासून mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ सुरु करण्यात आलेले आहे. तथापी सदर संकेतस्थळावर गेल्यावर्षीच्या तुलनेत अनुसूचित जाती प्रवर्गाचे केवळ 53 टक्के तर … Read more

अहमदनगरकरांसाठी चिंताजनक बातमी : आज झाले कोरोना रुग्णाचे द्विशतक !

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १६८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७३ हजार १११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २७८ ने वाढ … Read more

विडी उद्योग बंद करण्याच्या हेतूने जाचक बंधने घातले जात असल्याच्या निषेधार्थ विडी कारखाने व कामगारांचा संप

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-केंद्र सरकारने 2003 च्या कोटप्पा कायद्यात दुरुस्ती करुन विडी उद्योग बंद करण्याच्या हेतूने घातलेले बंधन व जाचक कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी लालबावटा विडी कामगार युनियन (आयटक), महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशन, इंटक विडी कामगार संघटना व महाराष्ट्र विडी उद्योग संघाच्या वतीने गुरुवारी (दि.25 फेब्रुवारी) रोजी एकदिवसीय विडी कारखाने बंद ठेऊन … Read more

‘ही’ संस्था शेतकऱ्यांची कामधेनू : माजी मंत्री कर्डिले

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-सहकारी संस्थांच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचा वाटा मोठा आहे. प्रशासकीय कामकाज करीत असतांना संस्थेच्या प्रगतीकडे कर्मचारी लक्ष देत असतात. खा. दादापाटील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासामध्ये कर्मचाऱ्यांचा वाटा मोठा आहे. कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न आम्ही नेहमीच सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असतो. आपल्या बाजार समितीचा राज्यामध्ये नावलौकिक आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेहमीच अग्रेसर राहून प्रश्­न … Read more

पुणे-नगर शटल रेल्वेसेवा सुरु होण्यासाठी माजी खासदार दिलीप गांधी यांनी घेतली रेल्वे मंत्री गोयल यांची भेट

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा व महत्त्वाचा प्रश्‍न असलेला पुणे-नगर शटल रेल्वेसेवा सुरु होण्यासाठी माजी खासदार दिलीप गांधी यांनी रेल्वे मंत्री ना. पियुष गोयल यांची भेट घेऊन सदर रेल्वे सेवा एप्रिल पासून कार्यान्वीत करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. या संदर्भात खासदार गांधी यांनी रेल्वे क्रांती आंदोलनाचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांना कळविले. … Read more

कोरोनाच्या संकटकाळात जहागीरदार यांनी दिलेले योगदान माणुसकीचे प्रतिक -आ.संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-कोरोना काळात मृत पावलेल्या कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीसाठी माणुसकीच्या भावनेने केलेल्या कार्याची दखल घेत विश्‍व मानवअधिकार परिषदच्या वतीने साहेबान जहागीरदार यांना कोरोना वॉरीयर व बेस्ट सोशल वर्कर पुरस्काराने गौरविण्यात आले. जहागीरदार यांच्या कार्याने भारावलेले विश्‍व मानवअधिकार परिषदचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हाजी सय्यद लाईक यांनी नगरला येऊन आमदार संग्राम जगताप यांच्या … Read more

शहरातील विकासकामेच बनू लागली सर्वसामान्यांसाठी अडथळ्याची कारणे

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  शहरात अनेक विकासकामांचा शुभारंभ झाला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दुररूस्तींची कामे सुरु आहे तर अनेक ठिकाणी भूमिगत गटारे करण्यासाठी मनपाकडून खोदकाम सुरु आहे. मात्र आता मनपाच्या याच काही कामांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेने शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत गटारीचे काम हाती घेतले आहे. रस्ते … Read more

प्रवाश्यांनी प्रवासादरम्यानच वाहकाला अज्ञातस्थळी नेऊन लुटले

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- एका पाच जणांच्या टोळक्याने प्रवासाचा बहाणा करून चक्क वाहनचालकाला लुटल्याची घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात पाच प्रवाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दत्तात्रय खंडू हापसे वय ३२ रा. टाकळीमिया राहुरी हे प्रवासी वाहन चालवितात. एके दिवशी ते राहुरी येथून … Read more

भाजीपाला फळे विकण्यास मज्जाव; संतप्त विक्रेत्यांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- सध्या नगरपंचायत अंतर्गत शहरात भव्य कॉम्प्लेक्स चे काम प्रगतीपथावर आहे त्यामुळे भाजी मंडई मध्ये फळे विक्रेत्यांना जागा उपलब्ध नाही म्हणून सदरील ठिकाणी हातगाडी लावून फळे विक्री करत आहेत. मात्र शहरातील नगर पंचायत परिसरात भाजीपाला व फळ विक्रेत्यांमुळे परिसरात वाहतुकीस अडथळा निर्माण होतं असल्याने पोलीस निरीक्षक विजय करे यांनी सकाळी … Read more

पोटच्या गोळ्याचे अपहरण करून फरार झालेल्या बापाला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  स्वतः च्या मुलाचे अपहरण करून गेल्या चार महिन्यापासून फरार असलेला आरोपी पिता यास नगर शहरातील तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले आहे. दादा आसाराम घोडके रा. पारोडी ता. आष्टी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून लहान मुलगा पृथ्वीराज दादा घोडके या मुलाची सुटका करण्यात आली आहे. याबाबाबत अधिक माहिती … Read more

खुशखबर ! ‘या’ दिवशीपासून ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. यामुळे आता सर्वसामान्य जनतेला कोरोनाची लस मिळणार आहे. येत्या सोमवारपासून 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सरपंचपद रिक्‍त राहिलेल्या ग्रामपंचायतींची ‘या’ दिवशी सोडत !

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या होत्या. अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीवर सरपंच व उपसरपंचाची निवड करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यातील 35 ग्रामपंचायतींची सरपंचपदे अद्यापही रिक्‍त राहिली आहे. त्यासाठी येत्या 25 व 26 रोजी आरक्षण सोडत काढणार असल्याची माहिती महसूल उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुका … Read more

राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याच्या आरोपाखाली दाखल याचिका न्यायालयाने रद्द केली

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-पिंपळगाव माळवी येथील श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांच्याविरुद्ध राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याच्या आरोपाखाली याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका औरंगाबाद खंडपीठाने रद्द केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील श्रीराम विद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त (ऑगस्ट 2014) राष्ट्रध्वजाची रांगोळी काढण्यात आली होती. ध्वजवंदनानंतर विद्यार्थी आणि … Read more

महापालिका नवे आयुक्त हजर झालेच नाहीत

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार निवृत्त झाल्यानंतर मागील दीड महिन्यापासून मनपा पूर्णवेळ आयुक्तांच्या प्रतीक्षेत होती. मोठ्या प्रतीक्षेनंतर आयुक्तपदी शंकर गोरे यांची नियुक्ती करण्यात आली. ते मंगळवारी हजर होणार होते, परंतु काही कारणांमुळेे ते हजर झाले नाहीत. तत्कालीन आयुक्त मायकलवार ३१ डिसेंबरला निवृत्त झाले होते. त्यांच्या पदाचा अतिरिक्त भार जिल्हाधिकारी राजेंद्र … Read more

कर्मचाऱ्यांकडून फायनान्स कंपनीची तब्बल ३३ लाखांची फसवणूक !

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-अधिकाराचा गैरपवापर करून फायनान्स कंपनीच्या दोन व्यवस्थापकांनी कंपनीलाच बनावट कागदत्रांद्वारे पात्र नसलेल्या व्यक्तीच्या नावे ३३ लाखांचे एक व दुसरे ६५ हजार रुपयांचे कर्ज मंजूर करत गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. नंतर संबंधित व्यक्तीने कुठलाही हप्ता न भरल्याने कंपनीने विचारपूस केली असता सादर कागदपत्रांवर दिलेला पत्ता तिसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे … Read more