आर्थिक व मानसिक त्रास देणार्‍या त्या संघटनेवर कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-  कोरोनाच्या संकटातून सावरणार्‍या शहरातील पथ विक्रेत्यांना आर्थिक व मानसिक त्रास देणार्‍या हिंदूराष्ट्र सेनेवर कारवाई व्हावी व महापालिकेकडून शहरातील कापड बाजार, मोची गल्ली व घास गल्ली या मुख्य बाजारपेठेत पथ विक्रेता अधिनियमाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीचे निवेदन कापड बाजार, मोची गल्ली व घास गल्ली पथ विक्रेते संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी तथा आयुक्त … Read more

दर्जेदार रस्त्यासाठी मनपा मटेरियल व डांबराचे टेस्टिंग घेणार

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-शहरातील डांबरी रस्ते वर्ष, दोन वर्षात उखडण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच एकाच पावसात रस्ता वाहून गेल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते खड्डेमय होत आहेत. रस्त्यांबाबत मनपा प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी दाखल झालेल्या आहेत. रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी रस्त्याचे मटेरियल व डांबराचे नमुने घेऊन त्याचा दर्जा तपासणीसाठी मनपाकडून ॲस्ट्रॅक्ट … Read more

रिटायर्ड पोलिस कर्मचाऱ्याचीच सोन्याची चेन चोरण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात चोऱ्या, लुटमारी आदी घटनांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. सामान्य जनतेबरोबरच चोरटयांनी चक्क पोलिसांना देखील लुटण्याचा प्रकार नुकताच घडला आहे. शहरातील माळीवाडा बसस्थानकात बसमध्ये चढत असताना सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचीच सोन्याची चेन चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी राहुल बाबूराव भालेराव (वय ३०, रा.नारळा … Read more

उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी निर्माण; नियोजनाचा अभाव

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-शहरातील अशोका हॉटेल झेंडीगेट ते सक्कर चौक दरम्यान सुरु असलेल्या उड्डाणपुलाचे काम चालु असून अशोका हॉटेल चौक ते स्टेट बँक चौकात पिलर स्टील फिटींगचे काम झाले असून काँक्रीट भरण्यास सुरवात होणार आहे. या कामामुळे येथील वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आला असला तरी, वाहतूक कोंडी होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भिंगारकडे जाणारी … Read more

महाविद्यालयसमोर झालेल्या अपघातात एकजण जखमी; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-शहरातील पत्रकार चौकातील पेमराज सारडा महाविद्यालयासमोर एका भरधाव वेगातील वाहनाने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने अपघात झाला. दरम्यान या अपघातात राजू हरिभाऊ घोरपडे हे जखमी झाले आहेत. घोरपडे हे सारस्वत महाविद्यालय (पाईपलाईन रोड) येथे आचारी म्हणून काम करतात. ते मोटारसायकलवरुन जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात ते … Read more

…तर कारवाईसाठी तयार रहा! ‘या’ आमदारांचा मनपा अधिकारी ठेकेदारांना इशारा

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- शहरामध्ये फेज २ व अमृत भुयारी गटार योजनेच्या कामामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. तसेच काही रस्त्यांच्या पॅचिंगच्या कामास सुरुवात झाली आहे. या रस्त्याच्या रुंदीकरण भागात डांबरीकरण करण्यात येणार आहे. विविध विकास कामातून शहराचे रुप बदलायचे आहे. यासाठी अधिकारी, ठेकेदार यांनी … Read more

सुसंस्कारीत समाज निर्मितीसाठी वाचन आवश्यक -प्रशांत गडाख

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-मराठी भाषा संवर्धन पंधरवडा व हुतात्मा दिनाचे औचित्य साधून शिवतेज मित्र मंडळ, महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, अहमदनगर जिल्हा शाखा यांच्या वतीने यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या गाव तेथे वाचनालय या उपक्रमाकरीता पुस्तकांची भेट देण्यात आली. डॉ.दिपक शिकारपुर लिखित आयटी करियर 2020 या पुस्तकांचा संच यशवंत … Read more

जिल्ह्यात चार लाखाहून अधिकांना पोलिओचे लसीकरण

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-राज्यस्तरावरुन अहमदनगर जिल्हयाकरीता 6 लाख 10 हजार पोलिओ लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी जिल्ह्यामध्ये एकूण 4 लाख 40 हजार 287 बालकांना पोलिओ लसीचे डोस पाजण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रविवारी शून्य ते 5 वर्षे वयोगटातील ग्रामीण भागात 3 लाख 56 हजार 827 (94.56 टक्के), शहरी भागात 13 हजार 474 … Read more

युनायटेड सिटी हॉस्पीटलमधून उत्तम आरोग्यसेवा मिळेल -उपमुख्यमंत्री अजित पवार

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-शहरातील विविध जाती-धर्माच्या तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांची टीम एकत्र आली आहे. त्यामुळे युनायटेड सिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलच्या माध्यमातून नगरकरांना अत्यंत चांगल्या दर्जाची उत्तम आरोग्यसेवा मिळेल, असा विश्‍वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. युनायटेड सिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. … Read more

आजपासून ‘हा’ सरकारी उपक्रम पूर्ववत!

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-कोरोना संसर्गाच्या काळात स्थगित करण्यात आलेला लोकशाही दिन आजपासून पूर्ववत सुरु झाला. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा हा उपक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी यावेळी लोकशाही दिनात आलेल्या तक्रारदारांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला … Read more

धर्माच्या नावावर राजकारण करुन, संघ प्रणाली देशावर लादली जात आहे

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-शेतकरी, घरकुल वंचित व युवकांचे प्रश्‍न न सोडवता त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार्‍या केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारचा निषेध नोंदवत पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे टंगळ-मंगळ मोदी, कारभार अनागोंदी राज्याची घोषणा करण्यात आली. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, अंबिका नागूल, शाहीर कान्हू … Read more

शहरात चोरट्यांच्या भीतीने नागरिक धास्तावले

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरात नुकताच तीन ठिकाणी चोरी केल्यानंतर आता शनिवारी चोरट्यांनी पुन्हा धूम स्टाईलने एकदा चोरी केली आहे . याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भरदुपारी प्रोफेसर कॉलनी रस्त्यावरील रेणुका माता मंदिर जवळ वैशाली विलास देशपांडे (वय ६० रा. प्रोफेसर कॉलनी रोड ) या महिलेचे दोन तोळे वजनाचे … Read more

धक्कादायक : अचानक वाढले अहमदनगर मध्ये कोरोना रुग्ण,वाचा २४ तासांतील आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज १०८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार २५१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १४१ ने वाढ … Read more

ना हुंडा, ना खर्च करीत रमैनी पद्धतीने पार पडला विवाह

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-सध्या सर्वत्र लग्नाची धामधूम सुरु असून, लग्नसमारंभ मोठ्या थाटात होण्यासाठी वारेमाप खर्च करण्याची पध्दत रुढ झाली आहे. या रुढीला फाटा देत शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात ना हुंडा, ना खर्च करीत रमैनी पद्धतीने खंडू पुंड (रा. नेवासा) व वैशाली कोरडे (रा. अकोले) यांचा विवाह थाटात पार पडला. रमैनी पद्धतीच्या विवाह सोहळ्यात … Read more

नादुरुस्त रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा; नागरिकांनी प्रशासनाला दिला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- नगर – मनमाड महामार्गावर असलेल्या बारागाव नांदूर फाटा येथे अनेक अपघातांची मालिका सुरूच आहे. नागरिकांचे जीव जात आहेत तरी देखील या रस्त्याची दुरुस्तीसाठी कोणत्याही हालचाली केल्या जात नसल्याने परिसरातील नागरिक त्रासले आहे. बारागाव नांदूर हे गाव सधन गाव म्हणून परिचित आहे. या रस्त्यावरून नांदूरसह कुरणवाडी, वावरथ, जांभळी, जांभूळबन, चिंचाळे, … Read more

या भाजीला मिळाला उच्चांकी दर!!

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल उच्चांकी भावात विकला जावा, यासाठी आडतदाराने अनोखी शक्कल लढविली आणि लिलाव पद्धतीने उच्चांकी भावात गवार विकली गेली. परिणामी सरासरी ८० रुपये किलो भाव निघणाऱ्या गवार शेंगभाजीला चक्क शंभर रुपयांचा दाम मिळाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात सातत्याने घसरण … Read more

शहरात खोदण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम दोन दिवसात होणार सुरु

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- शहरांमध्ये पाईपलाइन, वीज तारांचे भुयारी वायरिंग व भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम दोन ते तीन दिवसात सुरु होणार असून, या पार्श्‍वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी रविवारी (दि.31 जानेवारी) दिल्लीगेट येथील रस्त्याची पहाणी केली. तर संबंधीत ठेकेदार व मनपा अधिकार्‍यांना काम चांगल्या पध्दतीने दर्जेदार व लवकर … Read more

चोरट्याने कारमधून मोबाईल लंपास केला

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- कारच्या उघड्या असलेल्या काचतून हात आत टाकत कारमधून १३ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना शनिवारी दुपारी दोन ते सव्वा दोन वाजेच्या दरम्यान गांधी मैदान येथे घडली. कोतवाली पोलीस ठाण्यात आयुबखान रमजानभाई शेख (वय ५३ रा. शिरूर जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more