चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-शहर व उपनगरामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने गस्त वाढवावी, अशी मागणी महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी पोलिस प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे. महापौर वाकळे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शहर व उपनगरामध्येे चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील … Read more

काल कोरोना मुळे झाला इतक्या रुग्णांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-नगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे आणखी चार जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या आता ९५७ झाले आहे, तर दिवसभरात नवे २६७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नगर जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. नगर शहर व जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून शुक्रवारी सायंकाळी सहा … Read more

शिवीगाळ केल्याच्या रागातून टोळक्याने एकास चोपले

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-शहरातील वाढती गुन्हेगारीची वाटचाल पाहता जिल्ह्याची प्रतिमा गुंडाराज झाली आहे. जाब विचारला म्हणून टोळक्याकडून एकास बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना नगर शहरात घडली आहे. विशेष म्हणजे या १४ जणांच्या टोळक्याने संबंधितास चाकू, तलवार, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. हि घटना शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या सावेडीच्या यशोदानगरमधील … Read more

चायना मांजावर राज्यात बंदी घालण्याची मागणी चायना मांजा पर्यावरणाला हानीकारक ठरुन अनेकांचा बळी घेत आहे !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- पर्यावरणाला हानीकारक असलेल्या व अनेकांचा बळी घेणार्‍या चायना तसेच नायलॉन मांजावर राज्यात गुटखा बंदीप्रमाणे बंदी घालण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, ओबीसी सेलचे अमित खामकर, अत्तर खान, … Read more

बाळ बोठेला तात्काळ अटक करून त्याच्या अवैद्य धंद्याची व संपत्तीची सखोल चौकशी करा !

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :- रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी नगर शहरातील पत्रकार बाळासाहेब बोठे यांनी दिली असून बोठे हाच मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार बोठे आणि सागर भिंगारदिवे यांनी मिळून जरे यांना मारण्याची सुपारी दिली होती, असे पोलीस अधीक्षक पाटील यांनी पत्रकार परिषदेत … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स वाचा आजची कोरोना रुग्नांची सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात आज २७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६१ हजार ८४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६७ ने वाढ झाली. … Read more

दिल्लीतील शेतकरी आंदोलनास आम आदमी पार्टीचा पाठिंबा

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-विविध राज्यातून आलेल्या शेतकर्‍यांचे गेल्या सात दिवसापासून दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनास आम आदमी पार्टीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. मार्केटयार्ड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करुन शेतकरी आंदोलकांचे मागण्या मान्य करीत शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. या आंदोलनात शहर जिल्हा संघटक प्रा.अशोक … Read more

पत्रकार बोठे याच्या अटकेनंतरच उलगडणार रेखा जरे यांच्या हत्याकांडमागील कारण !

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-नगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची गत ३० नोव्हेंबर रोजी रात्री नगर- पुणे महामार्गावर जातेगाव घाट परिसरात हत्या झाली आहे. या हत्याकांडात पोलिसांनी आतापर्यंत फिरोज राजू शेख, ज्ञानेश्वर शिंदे, आदित्य चोळके, सागर उत्तम भिंगारदिवे, ऋषिकेश ऊर्फ टप्या वसंत पवार या पाच आरोपींना अटक केली … Read more

… तेव्हापासूनच पत्रकार बाळ बोठेबद्दल शंका निर्माण झाली होती !

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले आहे. तीनच दिवसांत पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला. नगरमधील ज्येष्ठ पत्रकार बाळ ज. बोठे हे या हत्याप्रकरणात सूत्रधार आहेत व यातील आणखी एका आरोपीच्या मदतीने सुपारी देऊन बोठे यांनी ही हत्या … Read more

रेखा जरे पाटील खून प्रकरण मनोज पाटलांनी उलगडले आणि बोठे पाटील अडकले !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-रेखा जरे पाटील हत्याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी पाच पथके तयार करून तपास सुरू केला होता. या प्रकरणी पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी या पाचही आरोपींची कसून चौकशी केली असता आरोपींनी पत्रकार बाळासाहेब बोठे यांनी सुपारी दिल्याची कबुली दिली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील व त्यांच्या टीमने केलेल्या … Read more

सूर्यनगर परिसरात संपूर्ण शांतता असून धार्मिक तेढ निर्माण करुन राजकारण करु नका

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- नगर-औरंगाबाद रोडवरील तपोवन जवळ असलेल्या सूर्यनगर मधील घटनेचा अर्धवट माहिती देऊन सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल करुन धार्मिक तेढ निर्माण केला जात असल्याची भावना येथील स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. वैयक्तिक भांडणाचे भांडवल करुन धर्माच्या नावावर राजकारण करण्याचे काम कोणी करु नका, असे पत्रक नागरिक या नात्याने सुनिल … Read more

मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन आरोग्य दिन म्हणून साजरा शहरातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची नेत्र तपासणी

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- मराठी पत्रकार परिषदेचा 82 वा वर्धापन दिन राज्यात आरोग्य दिन म्हणून साजरा केला जात असताना शहरात मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबीराचे उद्घाटन कोरोनाच्या संकटकाळात आरोग्यसेवा देणारे व गरजूंसाठी आधार ठरलेल्या बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे, माजी समाजकल्याण अधिकारी … Read more

आज १७५ रुग्णांना डिस्चार्ज तर २४८ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात आज १७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६१ हजार ५६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २४८ ने वाढ … Read more

रेखा जरे हत्याकांड : मुख्य आरोपी पत्रकार बाळासाहेब बोठे फरार !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणात एका प्रतिष्ठित वृत्तपत्राचा निवासी संपादक बाळ बोठे हा मास्टरमाइंड असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट झाले आहे. पत्रकार बोठे यानेच सुपारी देऊन रेखा जरे यांचे हत्याकांड केल्याची माहिती अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. जरे हत्या प्रकरणात आता पर्यंत पाच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : रेखा जरे हत्याकांडाचा अखेर उलगडा ! जिल्ह्यातील ह्या मोठ्या पत्रकाराने दिली होती सुपारी !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- अहमदनगर शहरातील यशस्विनी महिला बिग्रेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाउसाहेब जरे पाटील यांच्या हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला आहे. अहमदनगर पोलिसांच्या अथक परिश्रमानंतर रेखा जरे यांचे मारेकरी समोर आले आहेत. अहमदनगरचे जिल्हा पोलीस अध्यक्ष मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळासाहेब बोठे यांनी … Read more

कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्या तिघांनी प्राण गमावले

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-बेशिस्त वाहन चालवणे, नियमांचे उल्लंघन करणे… आदी घटनांमुळे अनेकदा गंभीर अपघात  घडत असतात. यामध्ये अनेकदा अनेकांना जीव देखील गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच असाच  एका अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारची रिक्षाला धडक बसली या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. सुमन … Read more

आरोग्य केंद्रातील प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी,अवेळी बंद व डॉक्टरांची….

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-अवेळी बंद असणारे व डॉक्टरांची उपस्थिती नसलेल्या मौजे टाकळी काझी (ता. नगर) येथील शासकीय आरोग्य केंद्रातील प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) वासुदेव सोळंके यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, महाराष्ट्र राज्य … Read more

जागतिक एड्स दिनानिमित्त पथनाट्यातून जनजागृती एमआयडीसीत स्थलांतरीत कामगारांची आरोग्य तपासणी

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ व आश्रय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त एमआयडीसी परिसरात पथनाट्य घेऊन स्थलांतरीत कामगारांमध्ये एड्सची जनजागृती करण्यात आली. तर कामगारांसाठी आरोग्य शिबीर घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. जागतिक एड्स दिन साजरा होत असताना अशिक्षित घटक असलेल्या स्थलांतरीत कामगारांमध्ये एड्सची जनजागृती करुन त्यांची आरोग्य तपासणी … Read more