इंदोरीकर महाराजांना दिलासा ‘या’ कारणामुळे सुनावणी पुढे ढकलली..
अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-पुत्रप्राप्तीबाबतच्या विधानावरून वादग्रस्त ठरलेले निवृत्ती महाराज (इंदोरीकर) यांच्या खटल्याची सुनावणी त्यांचे वकील के. डी. धुमाळ आजारी असल्याने पुढे ढकलण्यात आली. ही सुनावणी आता ८ डिसेंबरला होणार आहे. ‘पीसीपीएनडी’ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांवर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आदेशाने येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. मंगळवारी सरकारी वकिलांचा युक्तिवाद होणार होता. … Read more