मनपाच्या तिजोरीत तब्बल ४० कोटी ५० लाखांचा कर भरणा

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- शहरातील करदात्यांना थकबाकीवर ७५ टक्के शास्तीमाफी देण्याची सोमवारी शेवटची मुदत होती. ही मुदत वाढवण्याची नगरकरांची मागणी लक्षात घेऊन आयुक्तांनी १५ डिसेंबरपर्यंत शास्तीमाफीला रात्री उशिरा मुदतवाढ दिली. शहरातील ९१ हजार करदात्यांनी तब्बल १९४ कोटींचा मालमत्ता कर थकवला आहे. चालू वर्षातील ४६ कोटींच्या मागणीसह वर्षभरात २३९ कोटी वसूल करण्याचे आव्हान … Read more

रेखा भाऊसाहेब जरे यांची हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ,आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना..

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- नगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांचा नगर पुणे महामार्गावर जातेगांव घाटात तलवारीने वार करून निर्घुन खुन करण्यात आला. सोमवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. जरे या सोमवारी कामानिमित्त पुणे येथे गेल्या होत्या. पुणे येथून कारने नगरकडे येत असताना जातेगाव … Read more

आज २७३ रुग्णांना डिस्चार्ज तर २३७ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात आज २७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६० हजार ८६५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २३७ ने वाढ झाली. … Read more

भाजप सरकार हुकुमशाही राजवटीप्रमाणे वागत आहे !

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- शेतकरीविरोधी असलेल्या नव्या कृषी विधेयकाविरोधात दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनास किसान सभेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. तर सदर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणार्‍या केंद्रातील भाजपप्रणित मोदी सरकारचा जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर निषेध नोंदवून निदर्शने करण्यात आली.  प्रारंभी महिला शेतकरी चित्रा उगले व … Read more

प्रस्थापित राजकीय पक्षांनी बहुजन समाजाचे नुकसान केले

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-‘प्रस्थापित राजकीय पक्षांनी बहुजन समाजाचे नुकसान केले. राजकारणाच्या लढाईत बहुजन समाजाचे प्रश्‍न प्रलंबीत राहिले असून, न्याय, हक्कासाठी त्यांना आजही संघर्ष करावा लागत आहे. बहुजनांच्या हक्कासाठी बहुजन समाज पार्टी पर्याय म्हणून पुढे आली असून, नगर जिल्ह्यात देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याची भावना प्रदेश सचिव बाळासाहेब आवारे यांनी व्यक्त केली. सिध्दार्थनगर … Read more

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करत लाखोंचा दंड वसूल

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-शहरात वाहतूक कोंडीबरोबरच अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाहन चालकांना शिस्त नसल्याने नेहमीच वाहतूक कोंडी होते. तसेच वाढत्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी व बेशिस्त वाहन चालकांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांकडून धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.. वाहतूक नियमांचा भंग करणार्‍या वाहन चालकांविरूद्ध शहर पोलिसांनी कारवाईची विशेष मोहीम सुरू केली … Read more

आरपीआयच्या वतीने महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी अभिवादन

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-‘विद्येचे सर्वश्रेष्ठ महत्त्व पटवून देणारे स्त्री स्वातंत्र्याच्या कल्पनांना साकाररूप देणारे महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजाला प्रकाशित केले. मुलींच्या शिक्षणाची सोय करून आजच्या स्त्रीला त्यांनी आदर स्थान मिळवून दिले आहे. फुले दांपत्यांनी दीनदलितांच्या उद्धारासाठी कार्य केले. सामाजिक रूढी, परंपरा व अंधश्रध्दा झुगारून त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजात बदल घडवण्यासाठी … Read more

महात्मा फुले यांच्या जीवन कार्यातून आजच्या युवकांनी प्रेरणा घ्यावी -अ‍ॅड. भानुदास होले

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-‘क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जीवन कार्यातून आजच्या युवकांनी प्रेरणा घेऊन कार्य करण्याची गरज आहे. समाजातील विषमता नष्ट करून समानता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्यभर संघर्ष केला. समाजाला दिशा देऊन दीपस्तंभाचे कार्य महात्मा फुले यांनी केले असल्याची भावना जिल्हा माळी सेवा संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. भानुदास होले यांनी … Read more

जिकडे तिकडे चोहीकडे बिबटया.. बिबट्या

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. नुकतीच चांदबीबी महाल या पर्यटनस्थळाच्या आसपास बिबट्याचे दर्शन झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यानंतर आता नगर-सोलापूर रोडवर वाटेफळ-साकतच्या शिवेवर बिबटयाचे दर्शन घडल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. रुई छ्त्तीसी … Read more

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने महात्मा फुलेंना स्मृती दिनी अभिवादन

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर शहरात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आली. यावेळी यशस्विनीच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे पाटील, महिला बालविकास अधिकारी विजयामाला माने, समन्वयक रोहिणी पवार, आरती बडेकर, वैशाली … Read more

भर चौकात त्या दोघांनी पोलिसांची कॉलर धरली

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-कायदा व सुव्यस्था अबाधित राहावा यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस प्रशासनाचा आपण आदर केला पाहिजे. आपल्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस सेवा करणाऱ्या खाकीवरच काही समाजकंटकांकडून हात उगारला गेला आहे. शहरामधून जाण्यासाठी ट्रकमधील दोघांनी केडगाव बायपास चौकात पोलीस कर्मचार्‍याला दमबाजी करत त्यांच्या गणवेशाची कॉलर धरली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात कमलेश दुबाल सिंग (वय- … Read more

घर साफसफाईसाठी आलेल्या महिलेने सोन्याचे गंठण केलं लंपास

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. घराच्याबाहेर पडले तरीही चोरट्यांकडून लुटण्याची भीती आहे. मात्र आता घरबसल्या देखील चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. घर कामासाठी आलेल्या महिलेने दोन तोळ्याचे गंठण चोरून नेल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी प्रतिभा अवसरकर (रा. नानाजीनगर, नगर) हिच्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल … Read more

घरगुती पिठाच्या गिरणीमुळे महिलांना उपजिविकेचे साधन झाले

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-कोरोना संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊनची घोषणा झाली, यामुळे अनेक कंपन्या, उद्योग, व्यवसाय बंद पडले. बेरोजगारांमध्ये आणखी भर पडली, अशा परिस्थितीत राष्ट्रवादी पक्षाने रोजगारच्या नव्या संधी उपलब्ध करण्यासाठी 50 टक्के सवलतीमध्ये उपलब्ध केलेल्या पिठ गिरण्यांमुळे महिलांना उपजिविकेचे साधन झाले, असे प्रतिपादन सीमा सुनिल त्र्यंबके यांनी केले. नगर शहराचे आमदार संग्राम जगताप … Read more

कोरोना ब्रेकिंग : आज आकडा झाला कमी , वाढले इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात दररोज तीनशेपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत होते मात्र आज हा आकडा कमी झाला असून गेल्या चोवीस तासांत १७४ रुग्ण वाढले आहेत आज २७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६० हजार ५९२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे … Read more

अहमदनगरच्या 70 वर्षांच्या आजीने केले ‘असे’ काही यूट्यूब चॅनलवर झाले 6.5 लाख सब्सक्राइबर !

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- जिद्दीला वय नसते असे म्हणतात. जिद्दीमधून 70 वर्षांच्या आजीने जे काही केले ते वाचून तुम्ही थक्क व्हाल. काही महिन्यांपूर्वीपर्यंत महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये राहणाऱ्या सुमन धामणे कोणालाही माहित नव्हत्या, पण आता त्या इंटरनेट सेंसेशन झाल्या आहे. 70 वर्षांची सुमन कधीही शाळेत गेल्या नव्हत्या, परंतु सध्याच्या त्यांच्या ‘आपली आजी’ या यूट्यूब … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजप कार्यकर्त्यांंमध्ये ‘राडा’, दोन नेत्यातील वाद चव्हाटय़ावर !

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर शहरातील एका महाविद्यालयात सुरू असलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेत भाजप कार्यकर्त्यांंमध्ये चांगलाच ‘राडा’ झाल्याची माहिती समोर आली आहे.  कोरोनाच्या काळात पक्षाने काय केले, यावरून हा गोंधळ झाला. यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद देवगावकर आणि माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी यांच्याच चांगलाच वाद झाला.  भाजपचे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जिल्हाभर … Read more

इतिहासात पहिल्यादांच शिर्डीमध्ये घडतेय हि घटना

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर – गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. या महामारीमुळे अनेक गोष्टी कार्यपद्धतीत बदल झाले आहे. आता याचाच भाग म्हणून कोरोना महामारीमुळे नगरपंचायतच्या इतिहासात प्रथमच नगराध्यक्षांची निवड व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी येत्या 7 डिसेंबरला होणार्‍या विशेष सभेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नगराध्यक्ष निवडीसाठी … Read more

महत्वाची बातमी : चांदबिबी महाल परिसरात फिरण्यास बंदी

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- नगर तालुक्यातील चांदबीवी महाल परिसरात दोन दिवसापूर्वी बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे वन विभागातर्फे या परिसरात फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे त्याचबरोबर वन विभागाकडून योग्य त्या उपाय योजना ही करण्यात आल्या आहेत.  ” शेतकऱ्यांनी एकट्याने शेतात जाणे टाळावे त्याचबरोबर फटाके वाजवणे, हातामध्ये घुंगराची काठी ठेवणे, शेतात बसून किंवा वाकून काम … Read more