तहसील कार्यालयात भाजपचे जागरण गोंधळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी भाजपा आक्रमक

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- नगर तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, दुधाचे घसरलेले भाव, कर्जमाफी पासून वंचित राहिलेले शेतकरी, नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना न मिळालेली मदत व पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील त्रुटी अश्या अनेक मागण्यांसंदर्भात भाजपा नगर तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय, नगर येथे जागरण गोंधळ आंदोलन करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या … Read more

वाडिया पार्कमधील बॅडमिंटन हॉल आजपासून होणार सुरू

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-क्रीडा संकुलातील खेळांची मैदाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टप्प्याटप्प्याने सुरू केली जातील. ही मैदाने गेल्या काही महिन्यांपासून बंद होती. अनेक मैदानांची साफसफाई, सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. खेळाडूंनी सर्व अटी-शर्ती व शासनाच्या नियमांची काळजीपूर्वक अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी शेखर पाटील यांनी केले. तसेच वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हाॅलवर … Read more

खोटे मेसेज पाठवून फसवणूक करणारी टोळी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- क्युआर कोड वापरून ई-पेमेंट केल्याचा खोटा मेसेज दाखवून दुकानदारांची फसवणूक करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केली. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संजय अशोक सोनार, शुभम भगवान सोनवणे, रवी उत्तम पटेल, राजू श्रीहरीलाल गुप्ता (भोसरी, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून २ … Read more

दिवसभरात कोरोनाने एकही मृत्यू नाही

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनामुळे सोमवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मात्र, दिवसभरात नवे १६९ रुग्ण आढळून आले. चार महिन्यांत सर्वात कमी रुग्ण सोमवारी आढळले. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या १३३४ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४१, खासगी प्रयोगशाळेत ३७ आणि अँटीजेन चाचणीत ९१ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील … Read more

जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 58000 चा आकडा वाचा आजचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात आज २९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५५ हजार ९८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६९ ने वाढ … Read more

गणेश चौक ते बोल्हेगाव रस्त्यावरील खड्डे बुजवावे – कुमारसिंह वाकळे

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- बोल्हेगाव नागापूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत आहे. परंतु नागरिकांचे विविध प्रश्न प्रलबिंत आहे. गणेशचौक ते बोल्हेगाव पर्यंत जाणाऱ्या रत्यावर खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवास करीत असातांना आपला जीव मुठीत धरून करावा लागतो. या रस्त्यावर दिवसभर अनेक छोटेमोठे अपघात होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न … Read more

एक्साईट बॅटरी कंपनीतील कामगारांना २४,४१४ रू बोनस व बक्षिस वाटप !

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- कोरोणासंसर्ग विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन असल्यामुळे सर्व उद्योगधंदे ठप्प झाले होते. आता हे सर्व उद्योग धंदे सुरू झाले असून एक्साईट कंपनीमध्ये कामगाराकडून मोठ्या प्रमाणात उत्पादन काढून घेतले आहे. यासाठी कामगारानीही रात्रंदिवस काम करून १२ लाख ५० हजार बॅट्यांचे उत्पादन काढून दिले आहे. यासाठी दि. २३ ऑक्टोबर रोजी कंपनी … Read more

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! शिष्यवृत्ती परीक्षा ‘या’ महिन्यात होणार

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सन 2020-21 मध्ये घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता 5 वी ) व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) फेब्रुवारी ऐवजी एप्रिल महिन्याच्या चौथ्या रविवारी घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षात ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. तसेच फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेचा … Read more

बिग ब्रेकिंग : अर्णब गोस्वामीचा जामीन नाकारला !

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- पत्रकार अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता अर्णब गोस्वामी यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागणार असून सत्र न्यायालयातून जामीन मिळेपर्यंत त्यांना तळोजा तुरुंगातच राहावं लागणार आहे. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक वृत्तवाहिनीचे … Read more

मास्कचा वापर न करणार्‍यांवर होणार दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- संपुर्ण देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. तसेच कोरोनाला हद्दपार करण्यासाठीची लढाई जिल्ह्यात सुरु असल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेट देखील सुधारतो आहे. दरम्यान शासनाच्या नियमांचे भंग केल्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश नूतन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहे. सध्या सणासुदीचा … Read more

अरे वा ! स्मार्टफोनशी कनेक्ट होणारी रॉयल एनफील्डची ‘ही’ बहुप्रतीक्षित बाईक लॉन्च

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- रॉयल एनफील्डने आपले सर्वाधिक प्रतिक्षीत असलेली बुलेट मीटियर 350 भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. त्याची प्रारंभिक किंमत 1.76 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ग्राहक फायरबॉल, सेटेलर आणि सुपरनोव्हा या तीन भिन्न वैरिएंट मध्ये ते विकत घेऊ शकतील. यात त्यांना पिवळा, काळा आणि लाल रंगाचा पर्याय मिळेल. लॉन्चबरोबरच … Read more

1 डिसेंबरपासून बीएसएनएल प्लॅनमध्ये होणार ‘हे’ बदल ; ‘ह्या’ ग्राहकांना होणार ‘हा’ फायद

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- 1 डिसेंबरपासून बीएसएनएल अनेक योजना बदलणार आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी 3 नवीन पोस्टपेड योजना देखील सादर करेल, ज्याची किंमत 199 रुपये, 798 आणि 999 रुपये आहे. बीएसएनएल आणखी एक मोठा बदल करणार आहे, ज्याचा ग्राहकांना खूप फायदा होईल. कंपनी आपल्या 106 आणि 107 रुपयांच्या योजनेची वैधता वाढवणार आहे. … Read more

सणासुदीच्या काळात कापड बाजारात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- शहरातील कापड बाजार येथे सणासुदीच्या काळात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने भुरट्या चोरीपासून नागरिकांचे संरक्षण होण्यासाठी बाजारात पोलीसांची गस्त वाढविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलीस उपअधिक्षक विशाल ढुमे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित … Read more

तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल तर ही बातमी वाचाच

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- मोदी सरकारने आता सर्व चारचाकी वाहनांसाठी १ जानेवारी २०२१ पासून ‘फास्ट टॅग’ अनिवार्य केला आहे. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढले आहे. ज्यामध्ये १ जानेवारीपासून सर्व चार चाकी वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ अनिवार्य केला आहे. विशेष :- हा नियम जुन्या म्हणजेच ज्यांची विक्री … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाचा जिल्ह्यातील अपडेट्स सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५५ हजार ६९४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २१५ ने वाढ … Read more

स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये १०+२ वीच्या पदभरती

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- केंद्रीय निवड आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या रिक्त असलेल्या विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार कम्बाईन हायर सेकंडरी (१०+२) पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव :- १) लोअर डिव्हिजन लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक २) पोस्टल सहाय्यक/सॉर्टिंग सहाय्यक ३) डाटा एंट्री ऑपरेटर … Read more

कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते! बेफिकीरीने वागू नका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल हे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळी प्रकाशपर्वाचा सण असल्याने प्रदूषण आणि गर्दी … Read more

मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त ‘कौमी एकता सप्ताहा’ चे आयोजन

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- मखदुम एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटी व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदच्यावतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त कौमी एकता सप्ताहाचे 11 ते 16 नोव्हेंबर 2020 पर्यंत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी दिली. या सप्ताहाचा शुभारंभ बुधवार दि.11 रोजी स.11 वा. … Read more