नगर रेल्वे स्थानकच्या सल्लागार समितीपदी उद्योजक मुनोत व शाह

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर रेल्वे स्थानकच्या सल्लागार समितीपदी उद्योजक प्रशांत मुनोत व विपुल शाह यांची नियुक्ती करण्यात आली. रेल्वे स्थानक येथे स्टेशन मॅनेजर एन. पी. तोमर, वाणिज्य अधिकारी आर. एस. मीना यांच्या हस्ते मुनोत व शाह यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य हरजितसिंह वधवा … Read more

सलग दुसऱ्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाबत झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे सलग दुसऱ्या दिवशी दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद नाही. मात्र, नव्याने २०५ पॉझिटिव्ह आढळून आले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१४ टक्के आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १३६८ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४७, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२ आणि अँटीजेन चाचणीत १३६ बाधित आढळले. … Read more

या नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या काळात देशात बिहारमध्ये निवडणूक झाली व कोणत्याही क्षणी या निवडणुकीचा निकाल घोषित होईल. त्याचबरोबर नगर जिल्ह्यातही निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यातच अकोले पाठोपाठ आता कर्जत येथील नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी आज प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये विद्यमान नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांची कोंडी झाली आहे. त्यांना आता नवीन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ह्या बँकेची कोट्यवधींची फसवणूक; जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल…

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर शहरातीक मर्चंट को-ऑप बँक लि. अ. नगर शाखेची १० कोटी २५ लाख रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी अनिल साळी व उज्वला साळी या जोडप्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने बँक वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नितीन केवलचंद भंडारी, धंदा नोकरी, रा.श्रुती बंगला मार्केट यार्ड मागे, सारसनगर, अ. नगर … Read more

हॉटेल लॉजिंगमध्ये मुक्काम करून ऑनलाईन फसविले

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- आनंदऋषी ‘हॉस्पिटलजवळ असलेल्या हॉटेल आयरिश येथे पुण्याचे चोघे तरुण हॉटेल लॉजमध्ये मुक्कामी थांबले. हॉटेल लॉर्जिंगचे बिल देण्यासाठी चौघा आरोपींनी जातांना हॉटेलच्या काउंटरवर ऑनलाईन पेसे अकाऊंटवर पाठविल्याचे भासवून ऑनलाईन फसवणूक करून लॉर्जिंग हॉटेलचे पैसे न देताच निघुन गेले. याप्रकरणी हॉटेल मॅनेजर दिपीक सुनील विधाते, (रा. तपोवन रोड, नगर) यांनी कोतवाली … Read more

दिवाळीदरम्यान गुंतवणुकदारांनी कुठे गुंतवणूक करावी?

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- बहुप्रतिक्षित दिवाळी उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय. दीपावलीचा हा प्रकाशोत्सव आपल्या आयुष्यात आनंद व समृद्धी घेऊन येतो. दिवाळीच्या या पवित्र प्रसंगी गुंतवणूक केली जाते आणि काही काळानंतर या गुंतवणुकीचे मूल्य काही पटींनी वाढते, अशी धारणा त्यामागे आहे. गुंतवणुकीसाठी अनेक वित्तीय साधने उपलब्ध आहेत. पण दिवाळीच्या सणासाठी गुंतवणुकीच्या सर्वोत्तम … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाचा आजचे सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार १५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २०५ ने वाढ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा डोक्यात दगड घालून एकाचा खून

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-नगर शहरात काल भरदिवसा ६.३० च्या सुमारास एका इसमाचा डोक्यात दगड घालून मारुन खून करण्याचा खळबळजनक प्रकार घडला. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी आरोपी रमेश (पिंटू) देवदान हिवाळे, वय ३३, रा. रामवाडी, नगर या तरुणास अटक केली आहे. याप्रकरणी प्रविण रामदास प्रभुणे, वय ३०, धंदा रिक्षाचालक, रा. बोल्हेगाव या तरुणाच्या फिर्यादीवरून … Read more

म्हणून माजी झेडपी अध्यक्षा शालिनीताई विखे चिडल्या

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे अनेक महत्वाच्या कामकाजाबाबतच्या सभा या ऑनलाईन स्वरूपात पार पडत आहे. यातच जिल्हा परिषदेमध्ये आयोजित एका सभेदरम्यान झालेल्या गोंधळावरून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे या चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जिल्हा परिषदेची आज ऑनलाईन सभा होती. आधी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. जे सदस्य … Read more

‘अशा’ पद्धतीने ठरवली जाते दागिन्यांची किंमत ; जाणून घ्या होईल फायदा

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-सोने हा आज भारतीय लोकांमधील गुंतवणूकीचा सर्वाधिक पसंत असणारा मार्ग आहे. सोन्यातील गुंतवणूक वेगाने वाढली आहे. उत्सवाचा काळ असो किंवा पारंपारिक उत्सव असो, या पिवळ्या धातूचे प्रत्येक घरात एक विशेष स्थान आहे. गुंतवणूकीच्या बाबतीतही सोन्याचा चांगला नफा झाला आहे. सोने खरेदी ही भारतीयांची नेहमीच पसंती असते. लवकरच दिवाळीचा सण … Read more

Vi च्या ‘ह्या’ प्लॅन्समध्ये मिळतोय 50 जीबी पर्यंत डेटा ; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- व्होडाफोन आयडिया आता नवीन ब्रँड vi म्हणून ओळखला जातो. परंतु ही कंपनी यापूर्वीच वेगवेगळे बरेच बदल करीत आहे. व्हीआयने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक खास ऑफर सुरू केल्या आहेत. एक उत्तम योजनाही व्हीआयकडून आणली गेली आहे. प्रीपेड व्यतिरिक्त, व्हीआयकडे बर्‍याच धमाकेदार पोस्टपेड योजना देखील आहेत. वीआई च्या पोस्टपेड योजना … Read more

रेशन कार्डला मोबाइल नंबर जोडलाय का ? नसेल तर घरबसल्या ‘असा’ जोडा नंबर

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-आपल्याला शासनाकडून रेशन (विनामूल्य किंवा कमी किंमती) घ्यावयाचे असल्यास त्यासाठी रेशनकार्ड आवश्यक असते. रेशन कार्ड स्वस्त धान्य व्यतिरिक्त आपली ओळख आणि पत्ता पुरावा म्हणून कार्य करते. सरकारी योजनांसाठी बहुधा रेशनकार्ड आवश्यक असतात. म्हणून आपण रेशन कार्ड नेहमीच अद्ययावत ठेवले पाहिजे. हे न केल्यास, आपल्याला बर्‍याच सेवा गमवाव्या लागतील. अद्ययावत … Read more

साहेबांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत निकृष्ट कामाचा केला निषेध

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- स्थानिक स्तर लघुपाटबंधारे उपविभागीय अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एक अनोखे आंदोलन केले. या सरकारी विभागामार्फत झालेल्या निकृष्ठ कामांचा निषेध संभाजी ब्रिगेडच्या वतीने नोंदविण्यात आला. स्थानिक स्तर लघुपाटबंधारे या खात्यामार्फत नव्याने १९ बंधारे बांधण्यात आलेले आहेत. या बंधाऱ्याला गेट टाकण्यासाठी २३ ऑक्टोबरला निवेदन दिले होते. तसेच … Read more

चालक वर्गाना आर्थिक मदत करा; भाजपाच्या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला होता. यामुळे अर्थचक्र अक्षरश कोलमडून पडले होते. तसेच अनेकांच्या हातचा रोजगार गेल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ देखील आली आहे. यातच कोरोना काळात दळणवळण बंद असल्याने राज्यातील तमाम चालकांना स्वतःसह कुटूंबाला उपासमारीचा सामना करावा लागला आहे, दरम्यान सणासुदीचा काळ आला असून … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण थकीत वेतन दिवाळीपूर्वी

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील 3 महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री.परब म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन लवकर मिळावे अशीच शासनाची भूमिका होती त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. आज … Read more

दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महानगरपालिका तयार

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची झुंबड उडाली आहे. फिजिकल डिस्टन्सिंगला फाटा देत उसळलेली ही गर्दी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निमंत्रण देणारी ठरण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. दिवाळीमुळे नगरची बाजारपेठ फुलून गेली आहे. कोरोनाबाधितांची संख्या घटत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे नागरिकही … Read more

महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख पदी पत्रकार जितेंद्र आढाव यांची निवड

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ ( महाराष्ट्र ) या सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख पदी श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगव्हाण येथील पत्रकार जितेंद्र आढाव यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारत सरकार वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या हस्ते अहमदनगर येथे नियुक्ती पत्र देऊन त्यांची … Read more

सावेडी नाका येथील फटाका मार्केटचे आमदार जगताप यांच्या हस्ते शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-सावेडी नाका येथील नगर फटाका असोसिएशनच्या फटाका मार्केटचे शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, फटाका असोसिएशनचे अध्यक्ष निखील वारे, कार्याध्यक्ष सतीश बारस्कर, वैभव ढाकणे, दिपक खेडकर, योगेश भुजबळ, दत्तात्रय वाबळे, योगेश रोकडे, राजू तांदळे, शंतनू भाळवे, निलेश खळदकर, नितीन हराळे, गोपाळ … Read more