अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार : दिवसभरात तब्बल 167 जणांना लागण !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ वाढ होत आहे.  आज जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आज तब्बल १६७ ने वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार झाला असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३२२ वर पोहोचली आहे. अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दिवसभरात एकूण ११५ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून … Read more

कोरोना रुग्ण आढळल्याने शहरात वाढला आणखी एक कंन्टेन्मेंट झोन !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर महापालिका क्षेत्रात आणखी १ कंन्टेन्मेंट झोन वाढला असून बागरोजा सावेडी भागातील पंकज कॉलनी परिसरामध्ये कोरोना विषाणची बाधा झालेले रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी हा परिसर २९ जुलै पर्यंत कंन्टेन्मेंट झोन तर त्या भोवतालचा परिसर बफर झोन जाहीर केला आहे. सावेडी भागातील पंकज कॉलनी … Read more

आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने हे गावच झाले कंटेनमेंट झोन !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  एकीकडे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आता त्याचे लोण ग्रामीण भागातही पोहोचले आहे नगर तालुक्यातील घोसपुरी या गावात ८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण गाव कन्टेन्मेंट झोन जाहीर केले आहे. सोमवारी गावातील एक व्यक्ती कोरोनाबाधीत आढळून आला होता. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचे स्राव नमुने घेतल्यानंतर त्याच्या घरातील दोघांसह संपर्कातील एक … Read more

अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या या नागरिकांनी स्वतःकेले गावबंद

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  शहरापासून जवळच असलेल्या बुऱ्हाणनगर या गावात ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी स्वतः बंद पाळून संपुर्ण गाव बंद ठेवले आहे. नगर जिल्हा व शहरात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळुन येत आहेत. शहरात आजूबाजूच्या उपनगरासह अनेक गावातील नागरिकांचा संपर्क येत आहे. आणि यातूनच उपनगरासह ग्रामीण भागात देखील … Read more

अहमदनगरचे नागरिक कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासोबत….

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  अहमदनगरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी साहेब यांनी कोरोना संकटकाळात उत्तम कामगिरी केलेली आहे. ते दिवसरात्र अहमदनगरच्या जनतेसोबत होते. शहरातील नागरिकांना त्यांनी मोठा दिलासा दिलेला आहे. त्यांना टार्गेट करून इतके दिवस बेपत्ता असलेले राजकारणी एकत्र येत जर नावे ठेवत असतील तर ते अहमदनगरची जनता खपवुन घेणार नाही. जिल्हाधिका-यांना नाव ठेवणारे … Read more

कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज दुपारी 17 कोरोना रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  जिल्ह्यात आज दुपारी 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलीय. या सतरा अहवालांमध्ये पाथर्डी तालुक्यातील 10, नगर तालुक्यातील वडारवाडीमधील दोन, घोसपुरीमधील एक आणि राहुरीमधील चार रुग्णांचा समावेश आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’आदेश

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हजार पार करून पुढे गेल्याने चिंता वाढली आहे. आता या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी १७ जुलैपर्यंत लागू केलेला प्रतिबंधात्मक आदेशाची ३१ जुलैपर्यंत मुदत वाढवली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केला होता. मात्र हा आदेश … Read more

तक्षिला स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के 24 विद्यार्थी 90 टक्क्यांच्या पुढे

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या यंदाच्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहिर झाला असून, तक्षिला स्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. 24 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांच्या पुढे गुण मिळवले असून, गरिमा गोपलानी हिने 99 टक्के गुण … Read more

अहमदनगरचा बारावीचा निकाल ९२ टक्के ;यंदाही मुलीच अव्वल

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या बारावीच्या परीक्षेत पुणे विभागात नगर जिल्ह्याचा निकाल ९१.९७ टक्के लागला. यंदाही मुलींचे गुणवत्तेचे प्रमाण जास्त आहे. नगर जिल्ह्यात मुली उत्तीर्णचे प्रमाण ९६.१२, तर मुलांचे उत्तीर्णचे प्रमाण ८८.९३ टक्के आहे. पुणे विभागात … Read more

खा.सुजय विखे म्हणतात, ‘आ.संग्राम जगताप यांच्या विरोधात प्रचार करणार नाही’

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामाला संरक्षण खात्याने परवानगी दिली असून हे काम कोणत्याही परिस्थितीत आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. या कामाच्या आड जे कोणी येईल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल,असे खा. सुजय विखे यांनी स्पष्ट केले. नगरमध्ये आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस डॉ. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर शहरात मार्केटमधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. व्यापारी व व्यापारी चे कुटुंब संपूर्ण कोरोना बाधित होते त्यांच्या आज आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला . तर दुसरा बालिकाश्रम रोड येथील ८२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आता अहमदनगर शहरातील कोरोना मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आठ झाली आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more

मनपाच्या कामकाजास सुरुवात ; ‘त्या’ बैठकीत ठरले ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच महानगरपालिकेतील अधिकाऱ्यास कोरोनाने ग्रासल्याचे समोर आले. महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याने महापालिका बंद ठेवण्यात आली होती. आता आजपासून मनपाचा कारभार सुरु झाला आहे. सावधगिरी म्हणून महापालिका प्रशासन कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी करणार आहे. तसेच महापालिकेच्या कामकाजाला आजपासून सुरुवात करण्यात … Read more

अहमदनगर लॉकडाऊनबाबत खा. सुजय विखे यांचे मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने खूपच हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता हजाराच्याही पुढे गेली आहे. त्यामुळे ही परिस्थिती वेळेत रोखण्यासाठी लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे मत खा. डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केले. नगरमध्ये आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस डॉ. विखे यांच्यासोबत … Read more

धक्कादायक : अहमदनगर जिल्ह्यात 24 तासांत वाढले 114 कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 (10.56 AM) :- अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी 32 कोरोना रुग्ण आढळले आहेत, धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासात अहमदनगर जिल्ह्यातील 114 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आज सकाळी आढळलेल्या रुग्णांमध्ये नगर शहरातील 16, संगमनेर 11, आणि श्रीगोंद्यामधील पाच जणांचा समावेश आहे. सकाळच्या 32 जणांच्या अहवालानुसार नगर शहरातील पाईपलाईन रोड, भराडगल्ली, बालिकाश्रम … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ४६ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील ४६ रुग्णांची कोरोनावर मात.यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातले बरे झालेले एकूण रुग्ण संख्या ७७३ झाली आहे. यात नगर मनपा १७, भिंगार ०२, जामखेड०२, कर्जत ०१, नेवासा ११, पाथर्डी ०१, राहाता ०३, राहुरी ०१, संगमनेर ०२, शेवगाव ०१,श्रीगोंदा ०१,श्रीरामपूर ०४ येथील रुग्णांचा समावेश आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती … Read more

मामे सासऱ्याला अडकवायला गेलेला भाचे जावई गजाआड

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- विवाहानंतर पत्नीला सासरी येऊ न देणाऱ्या मामे सासर्‍याला अद्दल शिकवायची म्हणून त्याच्या वाहनात गावठी कट्टा ठेवणार्‍या भाचे जावायला त्याच्याच जाळ्यात अडकवत अटक केली आहे. मुजीबशेख (रा. जखणगाव ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत हकीकत अशी: आरोपी शेख याने प्रेम विवाह केला. परंतु मुलीच्या मामाचा लग्नाला विरोध … Read more

कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने शहरातील ‘या’ ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषित

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-नगर शहरातील भराडगल्ली परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर या परिसरात २८ जुलैपर्यंत कंटेन्मेंट झाेन महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी घोषित केला आहे. तोफखाना परिसरातील भराडगल्ली भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या परिसरातून फैलाव रोखण्यासाठी कंटेन्मेंट झाेन घोषित करण्यात आला. भराडगल्ली, आर्यकुमार व्यायामशाळा, बेंद्रे ज्वेलर्स कोपरा, बिटला घर, … Read more

जिल्ह्यातील कोरोना संकट वाढले, आजही सापडले तब्बल 82 रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 (11.34):- जिल्ह्यातील कोरोना संकट वाढले आहे, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये रात्री उशिरा आणखी 33 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. सुरूवातीला 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आज दिवसभरात 82 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. रात्री उशिरा प्राप्त … Read more