अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचा सहावा बळी

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :-  महानगरपालिकेतील एक कर्मचारी व त्याच्या कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्यावर औरंगाबाद रोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आज त्या कर्मचाऱ्याच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत अहमदनगर शहरात कोरोनानेे सहा बळी घेतले त्यामुळे अहमदनगर शहरात भीतीचे वातावरण झाले आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले ४८ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज ४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ०७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ३६७ इतकी झाली आहे तर बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ७२७ इतकी झाली … Read more

दंड भरणार नाही! तर केस चालविणार… सुहास मुळेंचा निर्धार!

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :-  नगर शहरात लॉकडाऊन बाबत फेक मेसेज व्हायरल केल्याचा गुन्हा दाखल झालेल्या सुहास मुळें यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भादंवि १८८ अन्वये पाचशे रुपयांपैकी पाच रुपयेही दंड भरणार नाही. तर यासंदर्भात आवश्यक ते सर्व पुरावे असल्याने ही केस चालविण्याचा निर्धार सामाजिक कार्यकर्ते सुहास मुळे यांनी ‘अहमदनगर लाईव्ह २४. कॉम’शी … Read more

नुसतेच पत्रे ठोकण्याऐवजी यंत्रणेत सुधारणा करा – माजी आ. राठोड

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- नगर शहरात लॉकडाऊननंतरही करोना रुग्ण वाढले आहेत. एका अर्थाने मनपा प्रशासन अपयशी झाले आहे, असा आरोप करत शिवसेना उपनेते माजी आ. अनिल राठोड यांनी केलाय. ‘लॉकडाऊन करण्यास विरोध नाही. पण ते नियोजनपूर्ण आणि पद्धतशीर असावे. दुर्दैवाने महापालिका यंत्रणा केवळ पत्रे ठोकतानाच दिसते. उपाययोजना करताना मात्र दिसत नाही. त्यामुळे घाईघाईत … Read more

धक्कादायक : कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिलेची गर्भधारणा

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- दीड वर्षांपूर्वी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करूनही महिलेला गर्भधारणा झाल्याचा व संबंधित कुटुंबास त्यामुळे त्रास सहन करावा लागल्याचा धक्कादायक प्रकार नगर जिल्ह्यात घडला आहे. तसेच या संदर्भात संबंधित डॉक्टरांना विचारणा केल्यानंतर त्यांनी त्या कुटुंबास अरेरावीची भाषा केल्याचाही प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात सतीश मोटे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा … Read more

जिल्ह्यात ‘ह्या’ ठिकाणी आहेत सर्वात जास्त कोरोना अ‍ॅॅक्टिव्ह !

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. यात मुंबई , पुणे अव्वल हे जिल्हे अव्वल राहिले. परंतु आता नगर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढले आहे. प्रशासन काटेकोर काळजी घेऊनही जिल्ह्यातील बाधितांची आकडेवारी मंगळवारी आलेल्या माहितीनुसार १ हजार ७६ झाली आहे. यात ६६६ रुग्ण बरे झाले असून ३८४ ऍक्टिव्ह केस आहेत. जिल्ह्यात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ६२ रुग्णांची कोरोनावर मात !

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- आज अहमदनगर जिल्ह्यातील ६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  यात अकोले ०७, नगर ग्रामीण ०८,मनपा १४,नेवासा ०१, पारनेर ०४ राहाता ०२,संगमनेर १५, शेवगाव ०६,श्रीगोंदा ०२ आणि श्रीरामपूर येथील ०३ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. दरम्यान आतापर्यंत कोरोनातून बरे झालेले एकूण रुग्ण ७२८ असून सध्या ३२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. … Read more

माजी आमदार राठोड झाले आक्रमक म्हणाले ज्यांचे हात बरबटले त्यांच्याच माथी हे पाप….

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- दुरवस्था झालेल्या तपोवन रस्त्याचे काम होण्यासाठी शिवसेनेने वेळोवेळी आंदोलन करून पाठपुरावा केला. त्यामुळे मुख्यमंत्री निधीतून हा रस्ता मंजूर होऊन साडेतीन कोटींचा निधी मंजूर झाला. या निधीतून दर्जेदार काम होणे अपेक्षित होते, परंतु, ठेकेदाराने कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केला. गैरव्यवहाराने ज्यांचे हात बरबटले त्यांच्याच माथी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वधू- वरासह आठ जणांना कोरोना ची लागण !

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 :-  अहमदनगर शहरातील तारकपूर येथील एका व्यापाऱ्याच्या मुलाचे 28 तारखेला लग्न झाले. ते लग्न तारकपूर येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये झाले लग्न समारंभ झाल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. ते तपासणीला गेले असता वर-वधू सह आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे आता लग्न समारंभात आलेल्या सर्व लोकांची तपासणी करावी लागणार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लॉकडाऊन बद्दल फेक मॅसेज व्हायरल करणाऱ्या सुहास मुळेवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 :- काल अहमदनगर जिल्ह्यातील काही Whatsapp ग्रुपवर जनता कर्फ्यू बाबत खोटा मॅसेज व्हायरल केल्याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक योगेश खामकर यांनी दिलेल्या फिर्यादी वरू सुहास मुळे याच्या वर कोतवाली पोलीस ठाण्यात अहमदनगर शहरात 16 जुलै पासून जनता कर्फ्यू लागू होणार आहे अश्या विषयाचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले ४१ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 (7.32 PM) :  जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या २२ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ३८४ इतकी झाली आहे तर बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या … Read more

कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात वाढले ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या तुमच्या परिसरातील माहिती

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : जिल्ह्यात आज आणखी १७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत मुकुंदनगर १, गवळी वाडा (नगर) १, दिल्ली गेट १, आंबेडकर चौक (नगर) २, नागापूर (नगर) १ रुई छत्रपती (ता. नगर) १, मंगल गेट १, समतानगर २, पाईपलाईन रोड १, चिंभळा (ता. श्रीगोंदा) १, मांडवगण (ता. श्रीगोंदा) १, नगर शहर १, … Read more

निम्म्यापेक्षा अधिक नगर लॉकडाऊन …

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : नगर शहरात करोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने चितळेरोड आणि सावेडीतील भिस्तबाग चौकात नव्याने कंटेनमेंट झोन घोषित केलाय. चितळेरोडच्या कंटेनमेंट झोनची मुदत दि. २५ तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत, तर भिस्तबाग येथील कंटेनमेंची मुदत दि. २६ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत असेल. दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत कंटेन्मेंट झोनमुळे निम्म्यापेक्षा अधिक नगर शहर लॉकडाऊन झाले … Read more

अहमदनगर शहरातील ‘हा’ परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 :अहमदनगर शहरातील भिस्तबाग परिसरात कोरोना रूग्ण आढळल्यानंतर हा परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आला. हे प्रतिबंध २६ जुलैपर्यंत आहेत. भिस्तबाग परिसरातील अयोध्यानगर, पाइपलाइन रस्ता या परिसरात रूग्ण आढळत आहेत. फैलाव रोखण्यासाठी हा परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आला. भिस्तबाग, अयोध्यानगर, काैशलघर, सुपर क्लिनर्स, उत्तरेकडील ओढा, शेंदूरकर घर, पिंपरकर घर, मचे घर व … Read more

अहमदनगर महापालिकेचे कामकाज बंद !

अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2020  :  महापालिकेतील एका अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर कर्मचारी युनियनने काम बंद केले. जोपर्यंत पर्यायी इमारत उपलब्ध होत नाही, तोपर्यंत काम बंदच राहील. प्रशासनाने प्रतिबंधात्मक साधने न पुरवल्यामुळे कर्मचाऱ्यांना बाधा झाल्याचा आरोप युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी केला. संपूर्ण शहरात कोरोना रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांनाच बाधा झाली. आतापर्यंत … Read more

म्हणजे मनपा प्रशासन अपयशी झाले आहे…

अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2020  : नगर लॉकडाऊन करण्यास आमचा विरोध नाही, पण मनपा प्रशासनाने गांभीर्याने विचार करायला पाहिजे होता. शहरात यापूर्वी तीन लॉकडाऊन झाले. त्यानंतरही रुग्ण वाढले, म्हणजे मनपा प्रशासन अपयशी झाले आहे, असा आरोप शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. ते म्हणाले, लॉकडाऊनबाबत आयोजित बैठकीला सर्वपक्षीय नगरसेवक, व्यापाऱ्यांना बोलावणे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘तो’ संदेश खोटा…शेअर केल्यास होईल कारवाई !

अहमदनगर Live24 टीम (13 जुलै 2020  11.07 PM) :अहमदनगर शहरात आज एक संदेश व्हायरल होत असून यात 16 तारखेपासून जनता कर्फ्यू लागू होणार असल्याचे सांगितले आहे, मात्र तो संदेशच खोटा असून अश्या प्रकारचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट झाले असून कोणीतरी खोडसाळ पणा केल्याचे समोर आले आहे. याबाबत अहमदनगर सायबर पोलिसांकडून फेक मेसेज ग्रुप वर … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज दिवसभरात ७२ रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम (13 जुलै 2020  8.45 PM) :  जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी ०६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ४३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ३६३ इतकी झाली आहे. आज दिवसभरात ७२ रुग्णांची भर पडली. … Read more