जिल्हा परिषदेच्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्या! ‘या’ जिल्हा परिषद सदस्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- सध्या करोनाची दुसरी लाट आल्याने अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढती आहे. त्यानंतर तिसऱ्या लाटेचाही इशारा आरोग्य तज्ञांनी दिला आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्वतोपरी प्रयत्न चालू असून, अधिकारी-कर्मचारी या कामात अहोरात्र व्यस्त आहेत. सध्या संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक गावात करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी सर्व्हेक्षण करण्यात येते. हे जोखमीचे काम करणाऱ्या … Read more

कोरोनाचा धोका वाढत असताना गेल्या आठ दिवसांपासून लसीकरण ठप्प

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाचा वाढता धोका पाहता सुरुवातीस लसीकरण मोहीम वेगाने राबवण्यात आली. मात्र आता पुन्हा एकदा लसीकरण मोहीम थंडावली आहे. यातच जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण महत्वाचे असताना जिल्ह्यात लसीचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प झाले आहे. यामुळे भविष्यात धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली … Read more

बालरोगतज्ञांची टास्कफोर्स स्थापन करा’ …! मनपा आयुक्तांकडे ‘यांनी’ केली मागणी

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्यावर विविध उपाययोजना करणे गरजेच्या आहेत. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी लसीकरणाला महत्त्व देण्यासाठी आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व १७ प्रभागांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करावी, तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मानवी जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. या कोरोना संकट काळामध्ये नागरिक भयभीत झाले आहेत. … Read more

रिमांड होममधून अल्पवयीन मुलास पळविले!

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- येथील रिमांड होम बालगृहातील एका अल्पवयीन(वय११वर्षे) मुलास अज्ञाताने पळवून नेले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील रिमांड होम बालगृहात असलेल्या मुलांना जेवणासाठी सोडले होते. नंतर मुले हे जेवण करून झाल्यानंतर हात धुण्यासाठी नळावर गेले असता किरण गोविंदा रेड्डी (वय ११वर्ष,रा. शिमोगाए, जिल्हा चीपमंगरूळ) या मुलास कोणीतरी अज्ञात इसमाने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या जिल्ह्यातील आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1856 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –  (ही बातमी आताच ब्रेक झाली आहे,सविस्तर अपडेटसाठी कृपया काहीवेळाने पेज रिफेश करा ) अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

दुसर्‍या लाटेतही बुथ हॉस्पिटल कोरोनाच्या लढ्यात पाय घट्ट रोवून अनेकांचे जीव वाचवत आहे !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- शरद पवार विचार मंचच्या वतीने कोरोना रुग्णांना आधार देत निस्वार्थपणे आरोग्यसेवा पुरविणार्‍या सॅलवेशन आर्मी संचलित बुथ हॉस्पिटलला अंड्याचे ट्रे व पाणी बॉटलच्या बॉक्सची मदत देण्यात आली. शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांच्याकडे ही मदत सुपुर्द केली. यावेळी भैय्या बॉक्सर, नदीम सय्यद, … Read more

‘बाजार समिती बंद’मुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान ! 

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  सध्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे नगर बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत . यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान होत आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून बाजार समितीतील शेतीमालाचे व्यवहार सुरू करण्याची बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे . यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात … Read more

तेरा वर्षीय विद्यार्थिनीच्या लीवर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी मदत करण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  शहरातील अशोकभाऊ फिरोदिया इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थिनी इफरा फातेमा शेख (वय 13 वर्षे) ही लीवरच्या गंभीर आजाराने त्रस्त असून, मुंबईच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. डॉक्टरांनी तीच्या कुटुंबीयांना तातडीने लीवर ट्रान्सप्लांट करण्याची शस्त्रक्रिया सांगितली आहे. यासाठी 17 लाख रुपये खर्च येणार असून, तीला सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी … Read more

पहिल्याच पावसात वाहून जाणार हा रस्ता…. मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष निकृष्ट दर्जाच्या कामाची संपूर्ण रक्कम जाणार ठेकेदाराच्या घशात !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  प्रभाग क्रमांक 12 मधील नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, मंगलाताई लोखंडे, सुरेखाताई कदम यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्याने पालिकेमध्ये पत्रव्यवहार करून 2016 व 17 मध्ये मंजूर करून घेतलेले काम मदवाशा दर्गा ते जुनी मनपा, आशा टॉकीज ते कृष्णा मिसळ, गणेश मंदिर ते पाचपीर चावडी चौक व वाडिया पार्क ते … Read more

टाळेबंदीत अनाधिकृत मोबाईल टॉवरचे काम प्रगतीपथावर स्थानिक नागरिकांचा विरोध !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  शहरात विनापरवाना मोबाईल टॉवरकडे मनपा प्रशासन डोळेझाक करत असतना, टाळेबंदीचा गैरफायदा घेऊन अरणगाव रोड, महापालिका हद्दीतील इंदिरानगर भागात अनाधिकृत मोबाईल टॉवर उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. महापालिकेकडे सदर काम बंद करण्याची तक्रार करुन देखील महापालिका प्रशासन डोळेझाक करत असल्याने दोनशे स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षर्‍या असलेले निवेदन चोभे मास्तर यांनी जिल्हाधिकारी … Read more

नगर तालुक्यातील या गावात १० दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- सध्या काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी अद्यापही कोरोनाचा जोर कायम आहे. नगर तालुक्यातील जेऊर येथे देखील कोरोनाचा विस्फोट झाला होता. या पार्श्वभूमीवर गावात १० दिवसांचा जनता कर्फ्यु पुकारण्यात आला आहे. जेऊर येथे मागील महिन्यात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला होता. येथे आजपर्यंत … Read more

खबरदार!जर खते व बियाणांचा काळाबाजार केल्यास ‘ही’ कारवाई होईल!

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतांचा आवश्‍यक पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या याआदेशानुसार जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. खरीपाच्या पेरणी दरम्यान शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, बी-बियाणे व खतांची साठेबाजी व काळाबाजार होऊ नये. यासाठी कृषि विभागाने १५ भरारी पथके नियुक्त केली आहेत. जर या भरारी पथकांना बी-बियाणे … Read more

नागरिकांत भीतीचे वातावरण ! माजी सभापती मनोज कोतकर म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-   केडगाव परिसरातील पथदिव्यांची दुरुस्ती करण्यासाठी मनपा विद्युत विभागाने उपाय योजना करण्यात याव्या. बंद पथदिवे सुरू करावेत. तसेच एलईडी पथदिवे लवकरात लवकर बसवण्यात यावे अन्यथा पूर्व सुचना न देता कोरोना नियमाचे पालन करित लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल, असा इशारा मनपा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिला … Read more

जिल्ह्यात किती लाख लोकांनी घेतली कोरोनाची लस ? जाणून घ्या सविस्तर आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने अवघ्या देशाला झोडपून काढलंय आणि अशात लशींच्या कमतरतेमुळे संकट जास्त गडद झालं आहे. जिल्ह्यात 13 जानेवारीपासून करोना लसीकरणाला सुरूवात झालेली आहे. जिल्ह्यात गेल्या साडेचार महिन्यांत 6 लाख 15 व्यक्तींनी करोनाची लस घेतली असून यात 4 लाख 81 हजार व्यक्तींनी पहिला तर 1 लाख 33 … Read more

दवाखान्याच्या कचऱ्याचा ढीग रस्त्यावर बेवारस… नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता सर्वत्र नागरिक धास्तावले आहे. यातच या महामारीविरुद्ध सुरु असलेली जीवघेणी लढाई पाहता दवाखाना नको असाच पवित्रा नागरिक घेत आहे. एकीकडे स्वतःसह परिसराची काळजी नागरिक घेताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दवाखान्यातील कचऱ्याचा ढीग कोणीतरी अज्ञात व्यक्तीने केडगाव बायपासलगत आणून … Read more

कोरोनाचा वाढता धोका पाहता प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करावे

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यामुळे दरदिवशी नागरिकांचे बळी जात आहे. याला रोखण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे. मात्र शहरात लसीकरण वाढविण्यासाठी प्रत्येक प्रभागात केंद्र सुरू करावे, अशी मागणी आरोग्य समितीच्या वतीने करण्यात आली. आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी आयुक्त शंकर गोरे यांची … Read more

हनीट्रॅप प्रकरणात धक्कादायक माहिती समोर !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- नगर तालुक्यातील हनीट्रॅप प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला आरोपी बापू बन्सी सोनवणे याला शुक्रवारी न्यायालयाने 24 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नगर तालुक्यातील जखणगाव येथे एका 30 वर्षीय महिलेने एका बागतदाराला नाजूक संबंधाचे आमिष दाखवून त्याचा व्हिडिओ बनवून त्याच्याकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी गुन्हा … Read more

जिल्हाधिकाऱ्यांनी थेट पंतप्रधान मोदींसमोर मुख्यमंत्री ठाकरेंचे कौतुक केले आणि नंतर….

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या राज्यातील ६० जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. महाराष्ट्रातून बोलण्याची संधी मिळालेले अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी घेतलेल्या विविध निर्णयांमुळे करोनाशी लढा देण्यात यश येत … Read more