‘बाजार समिती बंद’मुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान ! 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  सध्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे नगर बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत . यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान होत आहे.

कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून बाजार समितीतील शेतीमालाचे व्यवहार सुरू करण्याची बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे .

यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , सध्या कोरोना संसर्ग नियत्रंणात आणण्यासाठी सर्व बाजार समितीमधील शेतमालाचे खरेदी विक्रीचे व्यवहार बंद करण्यात आले आहेत .

यामुळे नगर बाजार समितीच्या मुख्य आवारातील फळे , भाजीपाला , अन्नधान्य व इतर  व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत .

सध्या वादळी वारा व पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान होत आहे. त्यातच बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच खराब होत असुन, यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे . सध्या खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना

शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्री करून -बियाणे , खते , औषधे , शेती अवजारे  वेळेत मिळणे गरजेचे आहे . यामुळे बाजार समितीच्या मुख्य आवारातील फळे , भाजीपाला व भुसार माल तसेच नेप्ती उपबाजारातील फळे, भाजीपाला व कांदा व्यवहार सुरू केल्यास

शेतकऱ्यांच्या शेतीमालाची विक्री हाईल .आलेल्या पैशातुन शेतकरी खते बियाणे , शेती पुरक अवजारे यांची खरेदी करतील . कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करून वेळेची मर्यादा घालुन देऊन बाजार समितीतील खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू करण्याची मागणी सभापती घिगे यांनी केली आहे .