Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांची मजाच मजा, ‘या’ बँका एक लाखाच्या गुंतवणुकीवर देत जबरदस्त परतावा, बघा व्याजदर…

Content Team
Published:
Senior Citizen

Senior Citizen : तुम्हीही एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात का?, जय होय तर आम्ही तुमच्यासाठी अशा काही बँका घेऊन आलो आहोत ज्या सध्या एफडीवर सर्वाधिक परतावा देत आहेत. या बँका सामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहेत.

सध्या खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर ७.७५ टक्के व्याज देत आहेत. आम्ही आज टॉप 10 बँकांच्या तीन वर्षांच्या एफडीवरील व्यजदरांबद्दल सांगणार आहोत. तसेच तुम्ही येथे तीन वर्षासाठी एक लाख जमा केल्यास तुम्हाला किती फायदा होईल हे देखील सांगणार आहोत.

बँक ऑफ बडोदा

ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर व्याजदरः 7.75 टक्के

तीन वर्षांसाठी गुंतवलेले 1 लाख रुपये 1.26 लाख रुपये होतील.

ॲक्सिस बँक

ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर व्याजदरः 7.60 टक्के

तीन वर्षांसाठी गुंतवलेले 1 लाख रुपये 1.25 लाख रुपये होतील.

एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि पंजाब नॅशनल बँक

ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर व्याजदरः 7.50 टक्के

तीन वर्षांसाठी गुंतवलेले 1 लाख रुपये 1.25 लाखांपर्यंत वाढतील.

कॅनरा बँक

ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर व्याजदरः 7.30 टक्के

तीन वर्षांसाठी गुंतवलेले 1 लाख रुपये 1.24 लाख रुपये होतील.

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया

ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर व्याजदरः 7.25 टक्के

तीन वर्षांसाठी गुंतवलेले 1 लाख रुपये 1.24 लाख रुपये होतील.

युनियन बँक ऑफ इंडिया

ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर व्याजदरः 7 टक्के

तीन वर्षांसाठी गुंतवलेले 1 लाख रुपये 1.23 लाख रुपये होतील.

इंडियन बँक

ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या FD वर व्याजदर: 6.75 टक्के

तीन वर्षांसाठी गुंतवलेले 1 लाख रुपये 1.22 लाख रुपये होतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe