आयुक्त म्हणाले…कुणाच्या दबावाखाली काम करू नका

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे, मात्र या लसीकरण मोहिमेमध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ लागल्याने सर्वसामान्य नागरिक यापासून वंचित राहू लागले आहे. याच अनुषंगाने मनपाच्या आयुक्तांनी महत्वपूर्ण सूचना केल्या आहे. महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर होणारा नगरसेवकांचा हस्तक्षेप थांबविण्याच्या सूचना देत, कुणाच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तौक्ते चक्रीवादळामुळे शेतकऱ्याच्या सहा म्हशी ठार !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने कोकणासह गोव्यात प्रचंड नुकसान केले आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या या वादळाने अनेक जिल्ह्यात झाडे कोसळेली,त्याचसोबत घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळाचा फटका नगर जिल्ह्यातील काही भागास बसला असून आज शहरातील कानडे मळा येथील एका शेतकऱ्याच्या म्हशींच्या अंगावर वीजवाहक … Read more

विनाकारण हिंडफिऱ्यांची होणार अँटीजेन टेस्ट

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यातच नागरिकांना वारंवार आवाहन करून देखील लोक जबाबदारीने वागायला तयार नाही आहे. म्हणून जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढू लागली आहे. यातच अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली फिरणार्‍यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे असा संशय जिल्हा प्रशासनाला आहे. यामुळे ग्रामीण भागात आता गर्दीच्या ठिकाणी चेक … Read more

गुड न्यूज : अखेर कुकडीचे आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-  कुकडीच्या आवर्तनावर मुंबई उच्च न्यायालयात प्रशांत औटी यांनी दाखल केलेली याचिका सोमवारी मागे घेतलीय. त्यामुळे कुकडीचे आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कुकडी प्रकल्पातून नियोजनानुसार गेल्या आठवड्यातच पाणी सोडण्यात येणार होते. मात्र जुन्नर तालुक्यातील शेतकरी प्रशांत औटी यांनी याविरोधात याचिका दाखल केली. त्यावर कुकडी प्रकल्प आठमाही असल्याने आवर्तन … Read more

शिक्षकाने मुलीचा वाढदिवस साजरा केला कोविड सेंटरमध्ये

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- कोरोनाच्या संकटकाळात शिक्षक तन, मन व धनाने आपले योगदान देत असताना, शिक्षकाने आपल्या मुलीचा वाढदिवस कोविड सेंटरमध्ये सामाजिक उपक्रमाने साजरा केला. माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे यांनी आपली मुलगी आरवी हिंगे हिच्या वाढदिवसानिमित्त सर्व खर्चांना फाटा देत, कोरोनाच्या परिस्थितीची जाणीव ठेऊन वाळूंज (ता. नगर) येथील कृषी उत्पन्न … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण ! वाचा आजची अधिकृत आकडेवारी..

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-अहमदनगर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना आज काहीसा दिलाया मिळालाय. कारण गेल्या चोविस तासांत जिल्ह्यातील नव्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झालीय. गेल्या चोविस तासात अहमदनगर जिल्ह्यात 2105 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। … Read more

कोरोनाने नव्हे तर उपासमारीने मरण्याची परिस्थिती

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- टाळेबंदीचा काळावधी दिवसंदिवस वाढत असताना सर्वसामान्यांना दोन वेळचे जेवण मिळण्यासाठी राज्य सरकारने सर्व रेशन कार्डधारकांना गहू, तांदळा बरोबर दरमहा गोड तेल, तूरडाळ व एक गॅस टाकी मोफत देण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील सकट यांनी जिल्हाधिकारी … Read more

गरजूंच्या दारोदारी व पालावर उदरनिर्वाहासाठी पोहचली युवानची मदत

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- वाढत चाललेली टाळेबंदी, श्रमिक, कष्टकरी व हातावर पोट असलेल्यांचा गंभीर बनत चाललेला उदरनिर्वाहाचा प्रश्‍न, दिवस भागवाताना दोन वेळच्या जेवणाची पडणारी भ्रांत अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना युवान या सामाजिक संस्थेने १००० गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप केले. कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी मिळालेल्या जीवनावश्यक मदतीने वंचिताच्या चेहर्‍यावर समाधान उमटले. युवान … Read more

तिच्या मोहजालात अनेक अडकले पण दहशतीपोटी कोणी पुढे आलेले नाही…

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- नगर तालुक्यातील एका बागायतदाराला प्रेमपाशात अडकवून नाजूक संबंधाचा व्हिडिओ काढणार्‍या तरूणीच्या मोहजालात अनेक जण अडकले आहेत. मात्र तिच्या दहशतीपोटी अद्याप कोणी फिर्याद देण्यासाठी पुढे आलेले नाही. यातून बडे हनीट्रॅपचे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या तरूणीसह एजंट अमोल सुरेश मोरे याला रविवारी न्यायालयासमोर हजर केले … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या सरपंचावर अखेर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- वर्धापनदिन अंकात रुई ग्रामपंचायतीची शुभेच्छा जाहिरात दिली असता त्याचे पेमेंट मागितले असता देण्यास टाळाटाळ केली. त्याचदरम्यान रुई गावातील खराब रस्त्याची बातमी छापली असता त्याचा राग मनात धरून खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केल्याप्रकरणी रुई ग्रामपंचायतीचे सरपंचाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी येथील वृत्तपत्राच्या वर्धापनदिनाच्या अंकात रुई ग्रामपंचायतीचे … Read more

मतदार यादीनुसार लसीकरण करा – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- राहुरी तालुक्यामध्ये कोविड लसीकरणाबाबत ज्या गावांमध्ये जास्त लोकसंख्या असेल त्या गावाला प्राधान्य देऊन तेथील मतदार यादीनुसार लसीकरण करावे, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आरोग्य विभागाला केल्या आहेत. राहुरी तालुक्यातील मांजरी आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या २० गावांच्या दक्षता समितीच्या प्रतिनिधींसमवेत ना. तनपुरे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी … Read more

गावपुढाऱ्यांच्या हस्तक्षेपाला आरोग्य विभाग वैतागला!

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- नगर तालुक्यातील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी गावपुढा-यांच्या वारंवार होणाऱ्या हस्तक्षेपाला वैतागले असून, आरोग्य विभागाच्या वतीने प्रांताधिकारी यांना याबाबत निवेदन देऊन गावपुढा-यांच्या पराक्रमाचा भांडाफोड केला आहे. सर्वत्र कोरोनाचा उद्रेक झाला असुन कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी स्व:ताच्या कुटुंबाचा विचार न … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने केल असे काही ! पण अखेर गुन्हा दाखल…

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-  पत्नीची हत्या करून तिने आत्महत्या केली आहे, असा बनाव करणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथील पती विजय ऊर्फ बंडू आप्पासाहेब गवळी याच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मढी खुर्द येथील विजय ऊर्फ बंडू आप्पासाहेब गवळी व त्याची पत्नी सुवर्णा यांच्यात १३ मे रोजी … Read more

नगर शहरात ५ लाख ३० हजार २०० रूपयांचा दंड वसूल !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत नगर शहरात ५ लाख ३० हजार २०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई महापालिकेच्या चार पथकांनी केली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शहरात दक्षता पथक गठीत करण्यात आले आहेत. परिमल निकम, शशिकांत नजान, कल्याण बल्लाळ, संतोष लांडगे … Read more

अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे डोके ठिकाण्यावर आहेत काय??

अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त गोरे यांनी पुन्हा किराणा दुकानासह इतर आस्थापना बंद करण्याबाबत आदेश काढला आहे. उठसुठ लॉकडाऊन केलं जातंय. हे निर्णय म्हणजे प्रशासकीय आणि राजकीय निष्क्रियपणाची साक्ष देत आहेत. देशात पहिल्या जनता कर्फ्युपासूनच हा पर्याय असू शकत नाही, असा मतप्रवाह समोर आला आहे. आरोग्य यंत्रणेचे ‘बारा’ वाजलेत, त्याकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही. नको त्ये … Read more

गुंडांनी लष्कराला जाणाऱ्या पिण्याच्या पाईपलाईनचे काम पाडले बंद

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत मिलिट्री इंजीनियरिंग सर्विसची पिण्याचे पाईपलाईनचे काम सावेडी येथील राजकीय गुंडांनी खंडणी मिळण्याच्या उद्देशाने बंद पाडण्याच्या निषेधार्थ अर्जदार सरकारी ठेकेदार मतीन सय्यद यानी बंद पडलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हे दाखल करून काम चालू करण्यात यावे या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना देऊन मागणी करण्यात … Read more

अहमदनगरकरानों घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचाच ! नाही तर करावी लागेल कोरोना टेस्ट..

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्ण वाढतच आहेत दररोज वाढणाऱ्या ह्या रुग्ण संख्येमुळे संपूर्ण आरोग्यव्यवस्थेवर ताण आला आहे. या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी आता नावा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढला आहे. उद्यापासून अहमदनगर शहरात चार ठिकाणी व जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या … Read more

संगीत तज्ज्ञ डॉक्टर मधुसूदन बोपर्डीकर काळाच्या पडद्याआड

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-  नगरच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, येथील ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ, संंस्कृतचे अभ्यासक डॉ. मधुसूदन बोपर्डीकर यांचे आज पहाटे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. पेमराज सारडा कॉलेजचे ते माजी प्राचार्य होते. बंदिश सांगितिक अकादमीच्या माध्यमातून त्यांनी नगरमध्ये संगीत चळवळ उभारली. त्यांनी अनेक शिष्य घडवले. संवादिनी वादनात त्यांचा सखोल अभ्यास होता. … Read more