अहमदनगर शहरातील त्या कॉंग्रेस नेत्याची गच्छंती !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- गेल्या काही दिवसांपासून नगर शहर काँग्रेसमध्ये थोरात समर्थकांमध्येच काळे व भुजबळ असे दोन गट झाल्याचे स्पष्ट दिसू लागले होते. भुजबळ गटाने मकर संक्रांतीनिमित्त घेतलेल्या तीळगुळ वाटप कार्यक्रमात भुजबळ यांना काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र विद्यमान शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांना हटविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या … Read more

वीजबिल माफीसाठी त्यांचे अर्धनग्न आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- कोरोना महामारी संकटाच्या काळात अनेकांच्या रोजगारावर गदा आली. आर्थिक उत्पन्नाचे स्रोत बंद झाले. यामुळे शेतकरी, छोटे व्यावसायिक, व्यापारी, मजूर यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. दरम्यान कोरोनाचे हे संकट पूर्णपणे नष्ट होई पर्यंतया सर्वांचे विज बिल माफ करावे या मागणी साठी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलने करून सरकारचे लक्ष … Read more

विस्कळीत होणार्‍या पाणी पुरवठ्याबाबत मनपाने नियोजन करावे

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- अहमदनगर शहरला पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी दि.19 ते 30 जानेवारी दरम्यान शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले आहे. परंतु या कालावधीत नागरिकांची पाण्यासाठी परवड होऊ नये यासाठी मनपाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिवराष्ट्र सेनेच्यावतीने निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी शिवराष्ट्र सेनेचे पक्षाध्यक्ष संतोष … Read more

वृद्धाच्या पोटातून काढले चक्क खिळे अन् ब्लेडचे तुकडे!

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- बालरोग तज्ज्ञ डॉ. गजानन मंकीकर यांच्या भोसरी येथील मंकीकर या लहान मुलांच्या हॉस्पिटल व सर्जिकल नर्सिंग होममध्ये एका साठ वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. संबंधित ज्येष्ठ नागरिकाच्या पोटातून चक्क ब्लेडचे तुकडे, स्क्रू, खिळे, लोहचुंबकाचा एक खडा, पिना, कटर, आदी घातक वस्तू निघाल्याने डॉक्टरही … Read more

अहमदनगर मध्ये कोरोना लसीकरण मोहिमेस सुरुवात ! ‘यांनी’ घेतला पहिला डोस …

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-  अहमदनगर, दि. १६: कोरोना लसीकरण मोहिमेस आज जिल्ह्यात सुरुवात झाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जिल्ह्यातील या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महानगरपालिकेच्या जिजामाता नागरी आरोग्य केंद्र येथे केला. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी लसीचा पहिला डोस घेतला तर जिजामाता … Read more

संतप्त कामगारांचा आत्मदहनाचा इशारा अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे विश्‍वस्त चर्चेसाठी गैरहजर

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- अवतार मेहेरबाबा ट्रस्ट कामगारांचे वेतन वाढीचे प्रकरण सहाय्यक कामगार आयुक्तांपुढे असताना चर्चेला विश्‍वस्त येत नसल्याने कामगारांना तारखेवर तारीख मिळत आहे. शुक्रवारी (दि.15 जानेवारी) रोजी सदर प्रकरणाच्या तारखेला विश्‍वस्त दुपारी उशीरा पर्यंत हजर न राहिल्याने लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनचे पदाधिकारी व कामगार सभासदांनी सहाय्यक कामगार … Read more

नगरच्या कवीने सादर केलेल्या कवितांचा संग्रह जाणार ना. शरद पवारांच्या भेटीला

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- येथील कवी विनोद शिंदे यांचा संवेदना प्रकाशन संस्था, पुणे यांच्या वतीने माजी संमेलनाध्यक्षा डॉ.अरुणाताई ढेरे यांचे हस्ते व गझलकार रमण रणदिवे यांचे प्रमुख उपस्थितीत शेते कापणीसाठी पांढरी झाली आहेत या कविता संग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या कविता … Read more

जिल्ह्यात आज १२ केंद्रावर लसीकरण होणार

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-कोरोना लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. केंद्र आणि राज्य शासन आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार शनिवार, १६ जानेवारी रोजी ही मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण १२ केंद्रांवर पहिल्या टप्प्यात ही मोहिम राबविण्यात येणार असून यात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्ह्यातील आठ ग्रामीण रुग्णालये आणि … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ गावाच्या ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार !

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-नगर तालुक्यातील डोंगरगण येथे अर्धांगवायूचा झटका आलेल्या मातोश्रींना मतदान केंद्रावर घेऊन जात असताना, कोणतीही विचारपूस न करता एमआयडीसी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी मुख्याध्यापकास बेदम मारहाण केली. या प्रकाराने संतप्त झालेले गावकरी एकत्र येत बोरसे यांच्या अन्यायाच्या विरोधाती मतदान प्रक्रियेवर तब्बल दोन तास बहिष्कार टाकला. त्यामुळे … Read more

गावचा कारभारी कोण आज ठरणार; मतमोजणी होणार १८ जानेवारीला

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-महाराष्ट्र राज्यातील १४ हजार ग्रामपंचायती मध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला होता. कधी नाही ते या वेळेस मोठ्या हाय व्होल्टेज लढाया या निवडणुकी मध्ये पाहावयास आपल्याला मिळाल्या. आज या १४ हजार ग्रामपंच्यातींसाठी मतदान होणार आहे. मतदार राजा कोणाला मतदान करतो याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. सत्ताधारी पक्ष व विरोधी भाजप यांच्यातच … Read more

जिल्हा बँके’साठी २० फेब्रुवारीस मतदान

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- एडीसीसी नावाने देशभरात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा राज्य सहकारी प्राधिकरणाकडून काल शुक्रवार रोजी करण्यात आली आहे. बँकेचे २१ संचालक निवडून देण्यासाठी दि.२० फेब्रुवारीस मतदान होणार असून दि.२१ फेब्रुवारी रोजी मतमोजणी द्वारे निकाल घोषित होणार आहे. या निवडूकीसाठी निवडणूक निर्णय … Read more

जिल्ह्यात ७०५ ग्रामपंचायतींसाठी दुपारी साडेतीन पर्यंत सरासरी ७१ टक्के मतदान मतदानासाठी युवा मतदारांसह वृद्धांचाही उत्साह

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७१.४६ टक्के मतदान झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांनी दिली. सायंकाळी उशीरापर्यंत मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे सायंकाळी मतदान संपेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी मिळण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त … Read more

अहमदनगर जिल्हा कोरोना लसीकरण मोहिमेसाठी सज्ज ! उद्यापासून जिल्ह्यात असे होणार लसीकरण

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-कोरोना लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. केंद्र आणि राज्य शासन आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार शनिवार, १६ जानेवारी रोजी ही मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण १२ केंद्रांवर पहिल्या टप्प्यात ही मोहिम राबविण्यात येणार असून यात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्ह्यातील आठ ग्रामीण रुग्णालये आणि … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ९९८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०९ ने वाढ … Read more

मंत्री मुंडे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी नगरमधून यांनी केली मागणी

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- महाविकासआघाडी सरकारमधील सामाजीक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी एका महिलेवर केलेल्या अत्याचाराचा नगर शहर भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने निषेध केला आहे. शहर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पै.अंजली वल्लाकटी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेवून तातडीने मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, जर तातडीने राजीनामा घेतला … Read more

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-नायलॉन मांजा विक्री आणि वापराला बंदी असतानाही जिल्ह्यासह शहरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री केली जात असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे. पतंगबाजीसाठी या मांजाचा वापर होत असल्याची पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांचा आदेश धाब्यावर बसवून चोरी छुप्या पध्दतीने नायलॉन मांजाची विक्री तसेच वापर करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली … Read more

कोरोनाकाळात नियमभंग करणाऱ्या हजारो गुन्ह्यांची नोंद

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-गेले अनेक महिने जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. दरम्यान या काळात कोरोनासंबंधी करण्यात आलेले नियम मोडल्याचे गुन्हे पोलिसांकडून दाखल केले जात होते. जिल्ह्यात आत्तापर्यंत सुमारे 26 हजार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. राज्यात ही संख्या सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येते. मास्कचा वापर न करणे, सोशल डिन्स्टन्स न पाळणार्‍या, संचारबंदी … Read more

पोलीस महानिरीक्षक डॉ. दिघावकर यांच्या विशेष पथकाचा तोफखान्यात जुगार अड्ड्यावर छापा

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या विशेष पथकाने नगर शहरातील तोफखाना परिसरात सुरू असलेल्या जुगारवर छापा टाकला. या छाप्यादरम्यान 14 जुगार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 35 हजार 500 रूपयाची रक्कम, एक लाख 60 हजार रूपयांच्या दुचाक्या व 750 रूपयांचे जुगार साहित्या असा एक लाख 96 … Read more