मंत्री मुंडे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी नगरमधून यांनी केली मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- महाविकासआघाडी सरकारमधील सामाजीक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी एका महिलेवर केलेल्या अत्याचाराचा नगर शहर भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने निषेध केला आहे.

शहर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पै.अंजली वल्लाकटी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेवून तातडीने मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, जर तातडीने राजीनामा घेतला नाहीतर शहर भाजप महिला आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशाराही दिला आहे.

आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरूद्ध रेणू अशोक शर्मा यांनी ब्लॅकमेल करून  बलात्कार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याबाबत मुंडे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट करून कबूल केले आहे की, ”करुणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो.

ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्रपरिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधातून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांवर या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात.

माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनीदेखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे. सदर करूणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. मात्र सामाजिक न्याय खात्या सारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी आपण वरील गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे.

वरील घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. वरील वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून मुंडे यांचा मंत्रीपदाचा त्वरित राजीनामा घेवून त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अन्यथा नगर शहर भाजपा महिला मोर्चा, आपल्या सरकार विरुद्ध सदर मंर्त्याच्या राजीनाम्याकरिता व कायदेशीर कारवाईकरिता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. असा इशारा दिला आहे.

Leave a Comment