निलेश लंके यांच्या विजयामुळे जनशक्तीचा विजय ! विखे फॅक्टरचा फुगा फुटला

जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके व भाऊसाहेब वाकचौरे लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले. या निवडणुकीतून जनशक्तीचा विजय झाला असून, विखे फॅक्टरचा फुगा फुटल्याची भावना कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. अॅड सुभाष लांडे यांनी व्यक्त केली. दोन्ही नवनिर्वाचित खासदारांचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने त्यांनी अभिनंदन केले. कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडीला राज्यभर सक्रिय पाठिंबा दिला … Read more

लग्नास नकार दिला म्हणून त्याने ‘ती’च्या बापाला संपवलं ! मौलानासह 3 लोक आरोपी, संगमनेरात घडली धक्कादायक घटना

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे दिसत आहे. यामुळे लोकांना कायद्याचा धाक उरला नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच आता जिल्ह्यातील संगमनेरमधून एक खळबळ जनक घटना समोर आली आहे. लग्नास नकार दिला असल्याने एका व्यक्तीने त्या मुलीच्या बापाला संपवले आहे. मुलगी दिली नाही याचा राग धरून एका … Read more

३७ – अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा कार्यरत सर्व सुरक्षारक्षक कर्तव्यावर दक्ष

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या सुरक्षा कक्षाबाबत मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व उपाययोजना करण्यात आली असून त्याबाबत कोणतीही कमतरता राहिलेली नाही. या ठिकाणी नेमण्यात आलेली त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा नियमानुसार कार्यरत असून सर्व सुरक्षारक्षक कर्तव्यावर दक्ष असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ३७ – अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश … Read more

चारा टंचाई भेडसावणार नाही,दोन महीन्याचे नियोजन तयार -ना.विखे

Radhakrishan Vikhe Patil News

येणारी परीस्थीती लक्षात घेवूनच पशुसंवर्धन विभागाने चारा उपलब्ध करण्याचे नियोजन केले असून, दोन ते अडीच महिने चारा पुरेल आशी कार्यवाही केली असल्याने टंचाई भासणार नसल्याची ग्वाही महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. एका वृतवाहीनीला दिलेल्या मुलाखती प्रसंगी मंत्री विखे पाटील म्हणाले की,टंचाई परीस्थीती निर्माण होणार ही शक्यता लक्षात घेऊनच विभागातील अधिकार्यांना चारा … Read more

साडेआठ कोटींचा कर्ज घोटाळ्यातील डॉक्टरांची जामीन फेटाळले

अहमदनगः बनावट कागदपत्रांच्या आधारे साडेआठ कोटींचे कर्ज प्रकरण मंजूर करणाऱ्या डॉक्टरांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी (दि. 20) फेटाळून लावला. डॉ. राकेश कांतिलाल गांधी (रा. पाईपलाइन रस्ता, सावेडी) आणि डॉ. आशिष अजित भंडारी (रा. सारसनगर) ही जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. लोणे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. रेंज फौंडेशनच्या … Read more

सावेडी उपनगरात चोरट्यांचा धुमाकूळ

Ahmednagar News

Ahmednagar News : बाहेर गावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद फ्लॅटच्या सेफ्टी दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटमधून रोकड सह सोन्याचे दागिने असा ५३ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सावेडी उपनगरातील धर्माधिकारी मळा येथील एका अपार्टमेंट मध्ये घडली. गेल्या आठवडा भरात सावेडी उपनगरात अनेक ठिकाणी बंद घरे फोडली असल्याने चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले … Read more

Kharif Season 2024 : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! बियाणे, खते तपासणीसाठी जिल्ह्यात १५ भरारी पथके

खरीप हंगाम २०२४ साठी यंदा शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होण्याचे कृषि विभागाने नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यात निविष्ठा उपलब्धता तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. १५ भरारी पथकांमार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्धतेमध्ये अडचण उद्भवल्यास तक्रार निवारण कक्षाशी संपर्क … Read more

Ahmednagar Rain : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पावसाने हजेरी लावली ! उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

कोपरगाव तालुक्यात घारी, चांदेकसारेसह परीसरात १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पावसाने हजेरी लावली असून अर्धा पाऊण तास जोरदार वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र निर्माण झाले. गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील तापमान प्रचंड प्रमाणात वाढलेले असल्यामुळे उष्णतेने व उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. … Read more

मोठयाचं पोरगं एवढीच भाजपा उमेदवाराची गुणवत्ता ! बाळासाहेब थोरात यांचे टीकास्त्र

समोरच्या उमेदवाराने पाच वर्षाच्या खासदारकीच्या कार्यकाळात काय काम केेले ? किती फिरले ? किती वेळा मतदारसंघात आले ? कोणते प्रश्‍न सोडविले? त्यांनी काहीच काम केले नाही. मोठयाचं पोरगं आहे, पैसा भरपूर आहे, सत्तेची ताकद आहे म्हणून खासदार व्हायचंय ! यापेक्षा कोणतीही गुणवत्ता त्यांच्याकडे नाही ही वस्तूस्थिती असल्याचे सांगत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी खा. डॉ. … Read more

देशाला नीलेश लंकेंची गरज, त्यांना दिल्लीला पाठवा ! खा. सुप्रिया सुळे यांचे आवाहन

एक सुसंस्कृत, कष्ट करणारा, तुमच्या आमच्या बरोबर असणारा अतिशय प्रेमळ लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांना विधीमंडळात पाठविले. आता त्यांना दिल्लीला पाठवायचे असून देशाला नीलेश लंके यांची गरज असल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शेवगांव तालुक्यातील भातकुडगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये सुप्रिया सुळे बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार … Read more

संविधान वाचविण्यासाठी ११ हजारांची मदत ! बौध्दाचार्य संजय कांबळे यांनी आ. लंकेेंकडे केला धनादेश सुपूर्द आरपीआय आंबेडकर गटाचा लंकेंना पाठींबा

देशाचे संविधान वाचले पाहिजे अशी भूमिका घेत बैध्दाचार्य संजय कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांना ११ हजार रूपयांचा निवडणूक निधी दिला. दरम्यान आर पी आय आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या आदेशान्वये या पक्षाचा निलेश लंके यांना पाठींबा जाहिर करण्यात आला आहे. शेखर पंचमुख यांनी सांगितले की, बहुजनांना अभिमान … Read more

अ‍ॅड कोल्हे यांची आ. लंके यांनी घेतली भेट पोलिसांनी गुुंडगिरीला चाप लावण्याची मागणी

न्यायालयाच्या आवारात करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या अ‍ॅड. अशोक कोल्हे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आ. नीलेश लंके यांनी नगर येथील रूग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत विचारपूस केली. लंके यांनी अ‍ॅड. कोल्हे यांना धीर देत आम्ही सर्वजण तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली. अ‍ॅड. कोल्हे यांच्याकडून घटनेचा तपशील जाणून घेतल्यानंतर वकीलांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत त्यांनी … Read more

संविधान बदलण्‍याचा महाविकास आघाडीचा दावा म्‍हणजे केवळ जनतेची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न

संविधान बदलण्‍याचा महाविकास आघाडीचा दावा म्‍हणजे केवळ जनतेची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न असून, कॉंग्रेस पक्षाकडून जाणीवपुर्वक खोडसाळपणाची वक्‍तव्‍य केली जात असल्‍याचा आरोप दलित महासंघ आणि बहुजन महासंघाचे संस्‍थापक अध्‍यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सक्‍टे यांनी केला. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या प्रचारार्थ प्रा.मच्छिंद्र सक्‍टे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांची बैठक घेवून महायुतीच्‍या पाठीशी खंबीरपणे … Read more

ॲड अशोक कोल्हे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखे यांनी व्यक्त केला निषेध

न्यायालयाच्या आवारातच ॲड अशोक कोल्हे यांच्यावर अज्ञात इसमांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखे पाटील यांनी जाहीर निषेध व्यक्त करत या प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपिंना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. ॲड अशोक कोल्हे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना खा. डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या … Read more

विकासाच्या संतुलनाच्या आधारावर नवीन भारताचे निर्माण करणे हेच भाजपचे स्वप्न ! : सुजय विखे पाटील

भाजप सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या काळात कृषीपासून ते प्रत्येक क्षेत्रात भारताचा विकास झाला आहे. संरक्षणाच्या क्षेत्रात जिथे आपण सर्वच आयात करायचो, तिथे आज आपण अनेक देशांना शस्त्रे निर्यात करतो. यापुढील काळात सगळ्यांचा समतोल विकास करत असतांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाचे संतुलन याच्या आधारावर नवीन भारताचे निर्माण करणे, हेच भाजपचे स्वप्न आहे. भारत आत्मनिर्भर होण्यासाठी, विश्वगुरु … Read more

तुमच्याकडे यंत्रणा, मग रडीचा डाव का खेळता ? अभिषेक कळमकर यांचा सवाल नगरमधील मारहाणीच्या आरोपास प्रत्युत्तर

तुमच्याकडे भरभक्कम यंत्रणा असेल तर असे रडीचे डाव खेळण्याची आवश्यकता नसली पाहिजे. नीलेश लंके यांनी यापूर्वी बऱ्याचदा सांगितले आहे की, निवडणूक निवडणूकीच्या पध्दतीने खेळा.तुमच्या हातून निवडणूक सटतेय हे तुम्ही नगर दक्षिणच्या जनतेला दाखवून देत असल्याचे सांगत नगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी डॉ. सुजय विखे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या … Read more

शहरातून दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवले

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर शहरातून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पीडित मुलींच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना व कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. तेलीखुंट परिसरात राहणाऱ्या एका महिलेने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची अल्पवयीन मुलगी (वय १६) यापूर्वी घरातून निघून गेली होती. पोलिसांनी तिचा … Read more

आमदार असताना पावने पाच वर्षात शेतकऱ्यांचे किती प्रश्न विधानसभेत मांडले, खा. सुजय विखे यांचा परखड सवाल

महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर येथील सभेत विरोधी उमेदवाराचा खडसून समाचार घेत विरोधी उमेदवार पावने पाच वर्ष सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काय केले. त्यांनी विधानसभेत किती शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी कितीवेळा विधानभवना बाहेर आंदोलने केली असा परखड सवाल त्यांनी विचारला. महायुतीच्या वतीने नगर तालुक्यातील कामरगाव येथे महायुतीचे उमेदवार … Read more