लग्नास नकार दिला म्हणून त्याने ‘ती’च्या बापाला संपवलं ! मौलानासह 3 लोक आरोपी, संगमनेरात घडली धक्कादायक घटना

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar Crime News

 

Ahmednagar Crime News : नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे दिसत आहे. यामुळे लोकांना कायद्याचा धाक उरला नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच आता जिल्ह्यातील संगमनेरमधून एक खळबळ जनक घटना समोर आली आहे. लग्नास नकार दिला असल्याने एका व्यक्तीने त्या मुलीच्या बापाला संपवले आहे. मुलगी दिली नाही याचा राग धरून एका मौलानाने आपल्या मित्रांच्या मदतीने मुलीच्या बापाचा खून केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यूपीमधून आलेल्या एका मौलानाने त्याला ज्या कुटुंबाने निवारा दिला त्याच कुटुंबातील मुली सोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली.

परंतु सदर व्यक्ती हा मौलाना आहे, त्या व्यक्तीचा राहण्याचा एक निश्चित ठाव-ठिकाणा नाही म्हणून मुलीच्या बापाने मौलानाला आपली मुलगी देण्यास नकार दाखवला. मात्र यामुळे मौलाना ला खूपच राग आला आणि त्याने मुलीच्या बापाला मै तुम्हे बरबाद कर दुंगा असे म्हणत धमकी दिली आणि तेथून निघून गेला. यानंतर या मौलानाने आपल्या मित्रांच्या मदतीने संगमनेरच्या मदीनानगर येथील आहतेशाम इलियास अन्सारी (मुलीचा बाप) यांचा खुन केला. पोलिसांनी मात्र या प्रकरणाचा अवघ्या काही दिवसात छडा लावला असून आरोपी मौलाना व त्याच्या मित्राला अटक केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणात उत्तर प्रदेश राज्यातील साहरणपुर येथील मौलाना मोहम्मद जाहीद मोहंमद युनुस मुलतानी, कल्याण येथील मोहंमद इम्रान निसार सिद्दकी व बिजनोर जिल्ह्यातील बगदाद अन्सार येथील मोहंमद फैजान शमीम अन्सारी या तीनही आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.विशेष म्हणजे यातील मौलाना व त्याच्या एका मित्राला अटक करण्यात आली आहे. पण एक आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. हाती आलेल्या माहितीनुसार आठ महिन्यांपूर्वी मौलाना मोहम्मद जाहीद मोहंमद युनुस मुलतानी हा चंदा मागण्यासाठी संगमनेर मध्ये आला होता.

येथे तो एका मशिदीत मौलाना बनला. या मौलानाला आहतेशाम इलियास अन्सारी यांनी राहण्यासाठी आश्रय दिला. दरम्यान मौलाना याने अन्सारी याच्या मुली सोबत निकाह करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र हा मौलाना दुसरा राज्यातील आहे आणि तो मौलानाचे काम करतो यामुळे राहण्याचा ठाव-ठिकाणा नाही, अशा परिस्थितीत मुलीच्या बापाने त्याला मुलगी देण्यास नकार दाखवला. यामुळे नाराज झालेल्या मौलानाने अन्सारी यांना मै तुम्हे बरबाद कर दुंगा अशी धमकी दिली आणि तो तिथून निघून गेला.

यानंतर तो मौलाना अकोले तालुक्यातील देवठाण येथे काही दिवस थांबला. यानंतर तो कल्याणला गेला. यादरम्यान तो मौलाना पुन्हा अन्सारी यांच्या संपर्कात आला. दरम्यान 2 एप्रिल ला सकाळी 11 वाजता अन्सारी हे घराबाहेर पडले ते परत आलेच नाहीत. यामुळे कुटुंबाने सर्वत्र शोधाशोध केली. परंतु अन्सारी यांचा कुठेच तपास लागला नाही यामुळे त्यांनी पोलीस स्थानकात मिसिंग रिपोर्ट दाखल केली.

अन्सारी कुटुंबाने अन्सारी मौलाना मोहम्मद जाहीद यांना भेटायला अधून मधून कल्याणला जात असल्याने आणि मौलाना सोबत त्यांचे पारिवारिक संबंध प्रस्थापित झाले असल्याने त्यांना फोन करून अन्सारी यांच्या बाबत विचारणा केली. पारिवारिक संबंध प्रस्थापित झाले असल्याने मौलाना यांच्यावर कुटुंबाचा पूर्ण विश्वास होता आणि त्यांच्यावर कुटुंबाला संशय देखील आला नाही. मौलाना यांना अन्सारी बाबत कुटुंबाने विचारपूस केली असता मौलानाने तुमचे वडील ठीक असून ते लवकरच घरी परत येतील असे आश्वासन दिले.

पण जेव्हा कुटुंबाने मौलानाला संगमनेर मध्ये बोलावले तेव्हा त्याने टाळाटाळ केली. तसेच फोन केल्यानंतर घाबरत घाबरत बोलणे, अचानक फोन कट करणे असा अनुभव कुटुंबाला आला. यामुळे मौलानाने अन्सारी यांचा घात केला असावा असा संशय अन्सारी कुटुंबाला आला. याची त्यांनी पोलिसांना माहिती देखील दिली. यामुळे पोलिसांनी मौलाना यांना बोलावून घेतले आणि त्यांचा जबाब नोंदवला. दरम्यान 24 एप्रिल ला पोलिसांना मालदाड येथील जंगलात एक अनोळखी प्रेत सापडले.

हे प्रेत सापडल्यानंतर पोलिसांनी अन्सारी कुटुंबीयांना बोलावलं यावेळी कुटुंबाने सदर मृतदेह हा अन्सारी यांचाच असल्याची ओळख पटवली. यानंतर पंचनामा झाला आणि पंचनामा मध्ये त्यांचा खून झाला असल्याचे स्पष्ट झाले. मात्र पोलिसांकडे स्ट्रॉंग पुरावा नव्हता. यामुळे त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान मौलाना हा अन्सारी यांचा मृत्यू झाल्यानंतरही कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी संगमनेरात आला नाही. शिवाय एक एप्रिल ते तीन एप्रिल दरम्यान तो संगमनेरात असतानाही त्याने तो कल्याण मध्ये असल्याचे अन्सारी कुटुंबाला सांगितले होते.

यामुळे पोलिसांचा संशयाची सुई मौलाना कडे वळली आणि त्यांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या. यावेळी पोलिसांनी आरोपी मौलानाला रिमांड मध्ये घेतले आणि त्याने गुन्हा कबूल केला. यावेळी त्याने आपल्या मित्रांसमवेत अन्सारी यांचा खून केला असल्याचे कबूल केले. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या टीमने या खुनाचा उलगडा केला. या प्रकरणात उपाधीक्षक यांच्या टीमने आत्तापर्यंत मौलाना आणि एका आरोपीला जेरबंद केले असून एक आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे.