पाच नंबर साठवण तलाव कोपरगावकरांसाठी मैलाचा दगड ठरणार : सुनील गंगुले

kopargav talav

आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी १३१.२४ कोटीची पाणी योजना आणली. त्यामुळे कोपरगावकरांची पाणी संकटातून मुक्तता करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल असून पाच नंबर साठवण तलाव कोपरगावकरांसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. शहरातील नागरीक मागील काही वर्षापासून तीव्र पाणी टंचाईची … Read more

पाणलोटासह लाभक्षेत्रात पावसाची प्रतिक्षा, कोपरगावला १२ दिवसाआड पाणी, दारणा धरणात ५६ टक्के पाणी !

darana

कोपरगाव गेल्या २ महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत आहे. ७ टीएमसी क्षमतेचे दारणा धरण अवघे ४ टीएमसी इतके भरले आहे. त्यात ५६ टक्के पाणी साठा तयार झाला. पाणलोटासह लाभक्षेत्रातही पावसाने हुलकावणी दिल्यामुळे नगर, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या धरणात ऑगस्ट उजाडला तरी जेमतेम पाण्याचा साठा आहे. त्यामुळे हजारो शेतकरी अद्याप जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

झगडे फाटा येथे अशोक लेलॅन्ड कंपनीच्या मालट्रकमधून ४०० लिटर डिझेलची चोरी !

crime

पोहेगाव झगडे फाटा येथे उभ्या असलेल्या एका मालवाहू ट्रकच्या चालकाला बंदूकीचा धाक दाखवत डिझेल टाकीतून नुकतेच ४०० लिटर डिझेल चोरी केले गेले. काल गुरूवारी (दि. १८) पहाटेच्या सुमारास झालेल्या डिझेल चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अशोक लेलॅन्ड कंपनीचा (आरजे ११ जीसी ४५०५) क्रमांकाचा मालवाहू ट्रक यूपीकडून झगडे फाटा मार्गे इंदापूर … Read more

राज्यात सर्वत्र भरपूर पाऊस पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे, आ. काळेंचे विठूरायाला साकडे !

ashutosh kale

कोपरगाव मतदार संघासह राज्यात सर्वत्र भरपूर पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखी होवू दे, असे साकडे आ. आशुतोष काळे यांनी विठूरायाला घातले आहे. आषाढी एकादशीनिमित्त काल बुधवारी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव बेट भागातील श्री काशी विश्वेश्वर, श्री शुक्लेश्वर व परमपूज्य राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी महाराज तसेच कोपरगाव शहरातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आषाढी … Read more

श्री साईबाबा संस्थानच्या साईबाबा सुपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांमुळे रुग्णाचा हात वाचला !

saibaba hospital

श्री साईबाबा संस्थानच्या साईबाबा सुपर हॉस्पिटलचे डॉ. संदीप देवरे यांच्या प्रयत्नामुळे कोपरगाव येथील ३६ वर्षीय तरुणाच्या कुटुंबात आंनद निर्माण झाला आहे. बनकर आडनावाच्या तरुणाच्या उजव्या हातामध्ये अचानक मुंग्या येऊन हात दुखायला लागला आणि हात उचलायचा बंद झाला. त्यावेळी त्याला शिर्डीतील श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. तेथे कार्डिओलॉजिस्ट डॉ. संदीप देवरे यांनी त्याची तपासणी … Read more

ज्यांना शिवसेनेने मोठे केले तेच राक्षसी आकांक्षेपोटी सेना सोडून गेले – राहुल ताजनपुरे

mashal

ज्यांना शिवसेनेने मोठे केले ते स्वतःच्या राजकीय राक्षसी आकांक्षेपोटी सेना सोडून गेले आणि मिंधे झाले. अशी टीका शिवसेनेच्या विधानसभा विस्तारक राहुल ताजनपुरे यांनी केली. गुरुवारी कोपरगाव येथे युवासेना जिल्हाप्रमुख अॅड. निरज नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी लोकसभेतील नेवासा, श्रीरामपूर व कोपरगाव येथील युवा सेनेच्या आढावा बैठकीत ताजनपुरे बोलत होते. राहुल ताजनपुरे म्हणाले की, या भागात युवा … Read more

कोपरगावातील गोधेगाव शिवारात आकाशातून इलेक्ट्रिक यंत्र पडल्याने खळबळ

electrik yantr

कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव शिवारातील एका शेतात आकाशातून पांढऱ्या रंगाचे चौकोनी आकाराचे व छत्री सारखे असलेले इलेक्ट्रिक यंत्र पडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु, अधिक माहिती घेतली असता हवामान मोजमाप यंत्र असल्याचा प्राथमिक अंदाज उपस्थितांनी व्यक्त केला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील गोधेगाव शिवारातील शेतकरी सतीश राजेंद्र पठाडे यांच्या शेतात मंगळवारी (दि.९) दुपारच्या सुमारास … Read more

खरीप हंगाम २०२४ साठी आ. काळे भरणार शेतकऱ्यांचे पिक विम्याचे अर्ज !

ashutosh kale

खरीप हंगाम २०२४ साठी पिकविमा भरण्याची सुरुवात १८ जून पासून सुरु झाली आहे. मागील वर्षी असंख्य शेतकऱ्यांनी पिक विमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता. यंदाही शेतकऱ्यांना पिकविमा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी खरीप हंगामातील सर्वच पिकांचे पिकविम्याचे अर्ज आ. आशुतोष काळे भरणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले गेले आहे की, दुष्काळ, … Read more

नगर जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासू देणार नाही, विवेक कोल्हे यांचे आश्वासन !

vivek kolhe

कोपरगावचे माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या विकासाला प्राधान्य दिले. तोच वारसा कायम ठेवून नगर जिल्ह्यात इफको खताचा तुटवडा भासू देणार नाही. त्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन इफकोचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले. तालुक्यातील कोपरगाव, शिंगणापूर रेल्वेस्टेशन येथे १२ वर्षापासून बंद झालेला इफको खत रॅक पॉईट नुकताच नव्याने … Read more

Ahmednagar Politics : विखेंना टक्कर देण्यासाठी कोल्हे भाजपमध्ये बंड करणार, पक्षाकडून नव्हे तर थेट अपक्ष मैदानात उतरणार?

vikhe kolhe

Ahmednagar Politics : अहमदनगरचे राजकारण व नाराजांची मनधरणी लोकसभेला मोठा चर्चेचा विषय ठरली. माजी आ. स्नेहलता कोल्हे असतील किंवा आ. राम शिंदे असतील यांची विखेंविषयी असणारी नाराजगी दूर करण्याकरता वरिष्ठांना चांगलीच कसरत करावी लागली. दरम्यान ही रणधुमाळी शांत होतेना होते तोच आता नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली. यासाठी भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे … Read more

Ahmednagar news : अहमदनगरमध्ये या गावात नारदीस झाले होते ६० पुत्र, आजही आहेत समाध्या, जवळच झालेले श्रीराम – मारिच हरणाचेही युद्ध

naradi putra

Ahmednagar news : अहमदनगर जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक पर्वणी लाभलेली आहे. जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. विशेष म्हणजे काही ऐतिहासिक स्थळे अगदी रामायणकालीन देखील आहेत. उदा.नारदी ६० पुत्रांच्या समाध्या, सीतामाईला ज्या ठिकाणी कुंकू लावले ते कुंकुमस्थान आदी. अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात अनेक धार्मिक स्थळे आहेत. रामायण व महाभारत ग्रंथात कोपरगाव तालुक्यातील धार्मिक स्थळांचा उल्लेख सापडतो. दक्षिणगंगा … Read more

काळे-कोल्हे संघर्ष समाप्तीकडे जाताच विखेंचा खोडता ! विखे-कोल्हे संघर्ष महिनाभरात पेटणार पण झळ काळेंनाही बसणार

kolhe vikhe kale

अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेच्या राजकारणात साखर सम्राटांचे आजवर वर्चस्व दिसले. माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात – पालकमंत्री राधाकृष्ण विखे असतील किंवा आ.आशुतोष काळे-माजी आ. स्नेहलता कोल्हे असतील यांचे उत्तरेत राजकीय वर्चस्व राहिले. परंतु यांच्यात मात्र कधी सख्य दिसले नाही. बऱ्याच वर्षे एकाच पक्षात असूनही थोरात-विखे यांचा राजकीय संघर्ष कायम तेवत राहिला. तर काळे-कोल्हे यांचा देखील राजकीय … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये होमगार्ड पथकाच्या ट्रॅव्हल बसवर दगडफेक, एक जखमी

Ahmednagar News

Ahmednagar Breaking : सध्या देशात लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुक ठाणे जिल्हा येथे बंदोबस्ताकरीता गेलेले होमगार्ड हे छत्रपती संभाजीनगर येथे परतत असताना त्यांच्या ट्रॅव्हल बसवर कोपरगाव तालुक्यातील समृद्धी मार्गावर अज्ञात इसमांनी दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फुटल्या असून यात बसचे नुकसान झाले आहे. तर चालक किरकोळ … Read more

अहमदनगर कोपरगाव रस्त्यावरील बेकायदा होर्डिंग्ज ! दुर्घटना घडण्यापूर्वी सावधानता गरजेची

Ahmednagar News

Ahmednagar News : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १६ जण मृत्युमुखी पडले. तर ७५ जण गंभीर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर नगर- कोपरगाव रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या होर्डिंग्जचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे होर्डिंग्ज सुरक्षित उभारलेत की नाही, याची शहानिशा करणे गरजेची आहे. येथेही अशी दुर्घटना घडण्यापूर्वी सावधानता गरजेची आहे. मुंबईमध्ये सोसाट्याचा वारा व पावसाने होर्डिंग कोसळले. यात … Read more

विजेच्या लपंडावामुळे नागरिकांसह शेतकरी हैराण

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यात तापमान ४०-४१ अंशापर्यंत पोहचले आहे. सूर्य आग ओकत असल्याने तापमानाचा ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यातच चांदेकसारे, घारी, सोनेवाडी, देर्डे कोऱ्हाळे, डाऊच बुद्रुक आदीसह पोहेगाव परीसरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह, शेतकरी वर्ग हैराण झाले आहे. चांदेकसारे आदीसह … Read more

घाटमाथ्याचे पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ahmednagar News

Ahmednagar News : समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे नगर- नाशिक विरूद्ध मराठवाडा असा संघर्ष होत आहे. हा संघर्ष कायमचा मिटवण्यासाठी पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविल्यास या सर्व भागाच्या दुष्काळावर कायमची मात करता येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ना. फडणवीस कोपरगाव येथे तहसील कार्यालय मैदानात आयोजित महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्या शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ विजय … Read more

गोदावरी पट्टयात पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न गंभीर ! गावांमधील शेतकरी हैराण

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव येथील गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडले असून नदी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नदीकाठच्या गावांमधील शेतकरी हैराण झाले आहेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने जनावरे जगवायची कशी? असा प्रश्न उभा राहिला आहे. प्रचंड होत असलेला वाळू उपसा, नदीपात्रात ठिकठिकाणी टाकलेले बेसुमार विजेचे आकडे, … Read more

घराला आग, वस्तूसह दुचाकी जळून खाक ! अचानक लागलेल्या आगीमुळे एकच गोंधळ

Ahmednagar News

Ahmednagar News : खडकी येथे राहणाऱ्या गणेश उत्तम शिरसाठ यांच्या राहात्या घराला काल गुरूवार (दि.२) दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे घरातील संसार उपयोगी वस्तू तसेच दुचाकी, टीव्ही व इतर दैनंदिन वापरातील साहित्य आगीत जळून खाक झाले. दुपारी अचानक लागलेल्या आगीमुळे एकच गोंधळ उडाला होता. आगीचे लोट एवढे मोठे होते की, … Read more