जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला सक्तमजुरी

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी कालिदास बाबासाहेब बोडखे (रा. पारगाव वाळूंज, ता. नगर) याला जिल्हा न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. २०१८ मध्ये फिर्यादी मिना भिवसेन घुले व पती भीवसेन घुले त्याच्या मयत मुलीच्या मुलाला (नातवाला) भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी मच्छिंद्र घुले यांनी हा वाद सोडवला. घरी जाण्यासाठी निघाल्यानंतर कालीदासने … Read more

अहमदनगर मध्ये पावसाची जाेरदार हजेरी ! येत्या २४ तासांत …

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात मंगळवारी दुपारी पावसाने जाेरदार हजेरी लावली. या पावसामुळे रस्त्यांवर माेठ्या प्रमाणात पाणी साचले हाेते. येत्या २४ तासांत हवामान विभागाने जाेरदार पावसाचा इशारा दिला आहे. १ जून ते २१ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात ४८२ मिलिमीटर पावसाची नाेंद झाली आहे.जिल्ह्यात अाॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या दाेन दिवसांत अतिवृष्टी … Read more

सीएनजी गँस लाईनच्या कामावर मजुराचा मृत्यू , ठेकेदारावर गुन्हा दाखल होण्यासाठी आरपीआय आंबेडकर गट करणार आंदोलन!

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-मनमाड महामार्गा लगत चिंचोली फाटा ता.राहुरी येथे सी.एन.जी गँस पाईप लाईनचे खोदकाम सुरु असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली उत्तर प्रदेश मधील तरुणाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी संबधित ठेकेदार व सुपरवायझरवर खूनाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा ३० सप्टेंबर रोजी राहुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन छेडु असा इशारा आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे … Read more

वडिलांच्या वर्षश्राध्दनिमित्त मुलांनी पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिली शैक्षणिक साहित्याची मदत

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- सेवानिवृत्त सहायक फौजदार स्व. मच्छिंद्र कुसळकर यांचा वर्ष श्राद्धच्या कार्यक्रमास सामाजिक उपक्रमाची जोड देत, त्यांच्या मुलांनी पाथर्डी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या पूरग्रस्त भागातील गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत दिली.तर पूरामुळे दोन गावांना जोडणारा नदीवरचा पुल वाहून गेला असता, वडिलांच्या स्मरणार्थ पर्यायी रस्त्याची दुरुस्ती केली. गरजू घटकातील … Read more

समाजात समानता प्रस्थापित करुन वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आरपीआय कार्यरत -अमित काळे

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- वाळूंज पारगाव मौला (ता. नगर) येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) शाखेचे उद्घाटन आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे व महिला जिल्हाध्यक्षा आरती बडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात कविता बाळासाहेब नेटके यांची सर्वानुमते महिला तालुकाध्यक्षपदी तर अजय पाखरे यांची युवक तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. … Read more

बबन बानकर यांचे निधन

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-  पोखर्डी येथील स्वस्तधान्य दुकानदार बबन ठकाराम बानकर (वय 49) यांचे नुकतेच हृदयविकराने निधन झाले. बबन बानकर हे धार्मिक व मनमिळावू वृत्तीचे होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.स्वस्तधान्य दुकानामुळे त्यांचा समाजामध्ये मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, एक मुलगी, जावई असा परिवार आहे. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 848 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरु होत नसल्याने लोकसहभागातून शाळा सुरु करण्याचा उपक्रम

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-  महाराष्ट्रात दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून बंद असलेल्या शाळा सुरु होत नसल्याने पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या शैक्षणिक पालकशाही अभियानातंर्गत नांदगाव (ता. नगर) पासून मैदानी लोकशाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनानंतर राज्यातील पहिली मैदानी लोकशाळा नांदगाव … Read more

पशुपालकांच्या चिंतेत भर ! जनावरांना होतोय ‘या’ रोगाचा प्रादुर्भाव

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-  गेल्या काही दिवसांपासून लाळ्या-खुरकूत आजारामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे. यामुळे अनेक जनावरे देखील दगावली आहे. यातच जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील काही गावांमध्ये जनावरांना या आजराने ग्रासले आहे. राहुरी तालुक्यातील आंबी व अंमळनेर येथे लाळ्या-खुरकूत आजाराने थैमान घातले असून अनेक जनावरांना याची बाधा झाली आहे. त्यातच लाळ्या खुरकूत आजाराची लागण … Read more

वाळू तस्करांची मुजोरी; महिला तलाठ्यास केली शिवीगाळ

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात वाळू तस्करी वाढू लागली आहे. आणि दिवसेंदिवस या वाळू तस्करांचा धुडगूस देखील वाढू लागला आहे. कायद्याला पायदळी तुडवत हे तस्कर खुलेआम आपला व्यवसाय चालवत आहे. सरकारी अधिकाऱ्यांचा देखील यांना धाक उरलेला नाही आहे. अशीच काहीशी घटना राहुरी तालुक्यात घडली आहे. राहुरी तालुक्यातील चिंचोलीफाटा येथील प्रवरा नदीपात्रातील अवैध … Read more

कारखाना विक्री घोटाळ्याप्रकरणी भाजपनेते किरीट सोमय्या गुरुवारी पारनेरला येणार

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्री व्यवहाराची चौकशी व पाहणी करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या गुरुवारी पारनेरला भेट देणार आहेत. दरम्यान नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रिफांवर आरोप केल्यानंतर सध्या सोमय्या चर्चेचे केंद्रबिंदू बनलेले आहे. यातच त्यांचा आता पारनेर दौरा हा विशेष चर्चेचा ठरणार आहे. … Read more

‘या’ग्रामपंचायतमध्ये २७ लाखांचा अपहार ..!

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 : –श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ गावच्या आजी माजी सरपंचांसह तत्कालीन ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतच्या सुमारे २६ लाख ८८ हजार २५२ रुपयांच्या निधीचा वेळोवेळी अपहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा. यासाठी लोणी व्यंकनाथ येथील राजेंद्र काकडे, स्वप्नील लाटे, दादा मडके यांच्यासह ग्रामस्थ तहसिल कार्यालयासमोर सोमवारी उपोषणाला बसल्याने सोमवारी रात्री उशिरा विस्तार … Read more

‘या’तालुक्यातील नागरिकांचाच महावितरण कंपनीला शॉक…!

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- नगर तालुक्यात महावितरण कंपनीची परिस्थिती बिकट बनली असून, कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीमुळे कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे. नगर तालुक्यात घरगुती ग्राहक, व्यवसायिक, औद्योगिक ग्राहक तसेच शेतकऱ्यांकडे वितरण कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे बिल थकीत आहे. त्यामुळे कंपनी फारच बिकट परिस्थितीतून जात आहे. विद्युत वितरण कंपनीची तालुक्यातील सर्वाधिक थकबाकी जेऊर सेक्शनची आहे. … Read more

दुर्दैवी घटना: विजेचा शॉक लागून पती – पत्नीचा मृत्यू…! ‘या’ तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- कपडे सुकायला टाकत असलेल्या पत्नीला विजेचा शॉक बसल्याने ती जोरात ओरडली त्यामुळे मदतीसाठी गेलेल्या पतीला देखील विजेच्या जबर धक्का बसून पती – पत्नीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पाथर्डी तालुक्यातील सांगवी खुर्द येथील सांगवी-साकेगाव रस्त्याला कटारनवरे वस्तीवर घडली. शोभा मच्छिंद्र कटारनवरे व मच्छिंद्र कोडींबा कटारनवरे असे या घटनेत … Read more

बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगून लुटणाऱ्या मनोहर भोसलेचे ‘अहमदनगर’ कनेक्शन ! जिल्ह्यात खरेदी केलीय तब्बल इतकी जमीन…

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  मनोहर भोसले याच्या विरोधात नुकतंच बारामती पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संत बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्यासह त्यांच्या दोन अन्य साथीदारांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्करोग बरा करतो असे सांगत … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ९५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २७ हजार ८३५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

वाळू तस्कराने महिला तलाठीचा केला विनयभंग, पोलिसात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील चिंचोलीफाटा येथिल प्रवरा नदी पाञातील अवैध वाळू उपसावर दोन दिवसापुर्वी केलेल्या कारवाई नंतर त्याठिकाणी पुन्हा वाळू उपसा सुरु झाला का ? याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका महिला कामगार तलाठीस अश्लिल शिवीगाळ करुन लज्जा उत्पन्न असे वर्तन करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वाळू तस्करावर राहुरी पोलीस ठाण्यात … Read more

डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने केले ५ गावठी दारू अड्डे उध्वस्त

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-   राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ येथील ५ अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर श्रीरामपुरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांचे पथकाने छापा टाकून २ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ५ आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आज दि. २१ सप्टेंबर रोजी डीवायएसपी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत … Read more