अहमदनगर मध्ये पावसाची जाेरदार हजेरी ! येत्या २४ तासांत …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात मंगळवारी दुपारी पावसाने जाेरदार हजेरी लावली. या पावसामुळे रस्त्यांवर माेठ्या प्रमाणात पाणी साचले हाेते. येत्या २४ तासांत हवामान विभागाने जाेरदार पावसाचा इशारा दिला आहे.

१ जून ते २१ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात ४८२ मिलिमीटर पावसाची नाेंद झाली आहे.जिल्ह्यात अाॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या दाेन दिवसांत अतिवृष्टी व मुसळधार पाऊस झाला हाेता.

प्रामुख्याने दक्षिण जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव तालुक्याला या अतिवृष्टीचा माेठा फटका बसला हाेता. त्यानंतर मात्र पावसाचा जाेर कमी झाला हाेता. गेल्या दाेन दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाला सुरुवात झाली आहे.

मंगळवारी शहर व जिल्ह्याच्या अनेक भागात जाेरदार पाऊस झाला. दरम्यान, येत्या २४ तासांत जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात ४८२ मिलिमीटर पावसाची नाेंद आतापर्यंत झाली आहे.

पारनेर, श्रीगाेंदे, कर्जत, संगमनेर व राहाता तालुक्यात सरासरीपेक्षा काहीसा कमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक ७२८ मिलिमीटर पाऊस हा अकाेले तालुक्यात झाला आहे.