‘या’तालुक्यातील नागरिकांचाच महावितरण कंपनीला शॉक…!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- नगर तालुक्यात महावितरण कंपनीची परिस्थिती बिकट बनली असून, कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीमुळे कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे.

नगर तालुक्यात घरगुती ग्राहक, व्यवसायिक, औद्योगिक ग्राहक तसेच शेतकऱ्यांकडे वितरण कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे बिल थकीत आहे. त्यामुळे कंपनी फारच बिकट परिस्थितीतून जात आहे.

विद्युत वितरण कंपनीची तालुक्यातील सर्वाधिक थकबाकी जेऊर सेक्शनची आहे. जेऊर सबस्टेशन अंतर्गत एकूण ३ कोटी ९ लाख ८४ हजार रुपयांची थकबाकी आहे. जेऊर परिसरात विजेचा लपंडाव सुरूच आहे.

त्यामुळे जेऊर परिसरातील शेतकरी व नागरिक विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराविरोधात नेहमीच रोष व्यक्त करताना दिसतात. परंतु थकीत वीज बिल भरण्यासाठी सहकार्य करत नसल्याचे थकीत रकमेच्या आकड्यावरून दिसून येत आहे.

या भागातील एकुण थकबाकी तब्बल ३ कोटी ९ लाख ८४ हजार रुपये इतकी आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराएवढे सुद्धा उत्पन्न नाही.त्यात जुन्या विद्युत वाहिन्या दुरुस्तीचे काम चालू आहे.

केडगाव लाईनवर भिस्तबाग व जेऊर दोन सबस्टेशन सुरू आहेत. त्यामुळे ओव्हर लोड होऊन जेऊर सेक्शनला समस्या वाढल्या आहेत. तालुक्यात सर्वात जास्त थकबाकी जेऊर सेक्शनचीच आहे.

विज बिल माफीसाठी योजना आणून देखील शेतकऱ्यांनी लाभ घेतला नाही. कर्मचाऱ्यांच्या पगारा एवढे सुद्धा उत्पन्न मिळत नाही. सर्व नागरिकांनी थकबाकी भरून विद्युत वितरण कंपनीला सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.