अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी कालिदास बाबासाहेब बोडखे (रा. पारगाव वाळूंज, ता. नगर) याला जिल्हा न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

२०१८ मध्ये फिर्यादी मिना भिवसेन घुले व पती भीवसेन घुले त्याच्या मयत मुलीच्या मुलाला (नातवाला) भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी मच्छिंद्र घुले यांनी हा वाद सोडवला.

घरी जाण्यासाठी निघाल्यानंतर कालीदासने भिवसेन व मच्छिंद्र यांच्या डोक्यात फावडे मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी नगर तालुका ठाण्यात फिर्याद दाखल होती.

न्यायाधीश एम. ए. बारलिया यांनी आरोपी कालिदास याला ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल सरोदे यांनी काम पाहिले.