file photo

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-  गेल्या काही दिवसांपासून लाळ्या-खुरकूत आजारामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे. यामुळे अनेक जनावरे देखील दगावली आहे.

यातच जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील काही गावांमध्ये जनावरांना या आजराने ग्रासले आहे. राहुरी तालुक्यातील आंबी व अंमळनेर येथे लाळ्या-खुरकूत आजाराने थैमान घातले असून अनेक जनावरांना याची बाधा झाली आहे.

त्यातच लाळ्या खुरकूत आजाराची लागण झाल्याने चार गाई दगावल्याने पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,

आंबी येथील भावेश तागड, नितीन मतमोल यांच्या दोन दुभत्या जर्सी गाई व डुकरे वस्तीवरील माजी सरपंच शंकर डुकरे यांची एक गाय लाळ्या खुरकूत आजाराने मृत्युमुखी पडली आहे.

त्यामुळे या गोपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तथापी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सातपुते यांनी घटनास्थळी धाव घेत मृत गाईंचे शवविच्छेदन करत नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे.

दरम्यान जनावरांचा या रोगापासून बचाव करण्यासाठी लसीकरण युद्धपातळीवर सुरु आहे.