अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-मनमाड महामार्गा लगत चिंचोली फाटा ता.राहुरी येथे सी.एन.जी गँस पाईप लाईनचे खोदकाम सुरु असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली उत्तर प्रदेश मधील तरुणाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी संबधित ठेकेदार व सुपरवायझरवर खूनाचा गुन्हा दाखल करावा

अन्यथा ३० सप्टेंबर रोजी राहुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन छेडु असा इशारा आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी दिला आहे. जिल्हाध्यक्ष पगारे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले की,

सीएनजी पाईप लाईन खोदकाम चालू असताना उत्तर प्रदेशातील मजुर नागेश प्रसाद याचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला.येथिल ठेकेदाराने सदर घटना दाबण्यासाठी मजुरांना दमबाजी केली आहे.

कामावरुन काढुन टाकण्याची धमकी दिली आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या तरुणास बाहेर काढुन त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणी येथिल प्रवरा रुग्णालयात नेण्यात आला होता.

शवविच्छेदन करुनही पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हि दाखल केलेला नाही. संगमनेर येथिल एका खाजगी रुग्णवाहीनीतुन मृतदेह उत्तर प्रदेश येथिल चतुनिगोंडा तालुका मोहोस येथे नेण्यात आला.

ढिगाऱ्याखाली दबून मजुराच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा दिनांक ३० सप्टेंबर रोजी राहुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन छेडु असा इशारा जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे दिला आहे.

या निवेदनावर जिल्हा सचिव राजन ब्राम्हणे, अहमदनगर शहराध्यक्ष हरिष आल्हाट, युवक जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटोळे, युवक अहमदनगर शहराध्यक्ष संदीप वाघमारे, राहुरी तालुका अध्यक्ष प्रदीप मकासरे, रमेश पलघडमल आदिंच्या सह्या आहेत.