अरे बापरे…!जमिनीच्या वादातून महिलेच्या अंगावर डिझेल ओतून जिवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- जमिनीच्या वादातून चक्क एका महिलेच्या अंगावर डिझेल ओतून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पाथर्डी तालुक्यातील येळी येथे घडली आहे. वंदना पांडुरंग पारगरे असे या घटनेतील पीडित महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, … Read more

आमदार पाचपुते म्हणतात: सेटलमेंट करण्याचा माझा धंदा नाही

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- तालुक्यातील जनता सुज्ञ असून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे हे खरे असेल, तर ज्यांना ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी सर्वांनी जोमाने तयारीला लागावे. तालुक्यातील मायबाप जनतेच्या बळावर २०२४ ची कुस्ती देखील मी निकाली काढल्याशिवाय राहणार नाही. कारण सेटलमेंट करण्याचा माझा धंदा नाही असे कोणाचेही … Read more

तहसीलदार देवरे: चौकशी समितीचा गोपनिय अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- पारनेरच्या तहसीलदार देवरे बहुचर्चित वादाच्या अनुषंगाने जिल्हा पुनर्वसन अधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या चौकशी समितीने याबाबतचा गोपनिय आहवाल जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांना सादर केला आहे. या संदर्भात समितीने दोन दिवस संबंधीतांचे म्हणणे ऑन कॅमेरा नोंदवले. तसेच चौकशीदरम्यान संबंधीतांनी दाखल सादर केलेली तब्बल दोन हजार पानांची दखलही समितीने … Read more

तोंडाला काळे फासणाऱ्या तनपुरे कारखाना कामगारांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- प्रवरानगर येथील रहिवाशी व डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संलग्न संस्थेतील कामगाराच्या तोंडाला काळे फासणाऱ्या राहुरीच्या स्थानिक कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश दिनकर खर्डे राहणार भगवतीपुर तालुका राहुरी या कामगाराने याप्रकरणी फिर्याद दिल्याने इंद्रभान पेरणे, सचिन काळे, सिताराम नालकर, नामदेव शिंदे, सुरेश तनपुरे, बाळासाहेब तारडे व … Read more

विकास कामामध्ये अडथळा आणण्यात काहींचा हातखंडा – आ.बबनराव पाचपुते

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-आज दि. ०३ सप्टे २०२१ रोजी विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण देवदैठण येथे करण्यात आले यावेळी बोलताना आमदार बबनराव पाचपुते म्हणाले की कोरोना मुळे निधी आणण्यात अनेक अडचणी येत असताना देखील तालुक्यामध्ये भरघोस विकास निधी आणण्याचे काम आपण केले आहे. तालुक्यात विकास कामे जोरात चालू असताना काही लोकांच्या … Read more

कामगारांनी चुकीच्या पद्धतीने आंदोलन केल्यास कारवाई करू, तनपुरे कारखान्याचे चेअरमन ढोकणेंचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- डॉ. तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी प्रवरा कारखान्याच्या कर्मचार्‍याला काळे फासून चुकीचे कृत्य केलेले आहे. कायदा हातात घेत चुकीचे कृत्य होत असल्यास संचालक मंडळ सहन करणार नाही. कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा होत आहे. लवकरच तोडगाही निघेल. परंतु चुकीच्या पद्धतीने आंदोलन होत असल्यास संचालक मंडळ कायदेशिर कारवाई करेल असा ईशारा कारखान्याचे … Read more

लई पाऊस झाला पण शेतीच समद वाटोळं झालं’ शब्दात शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या व्यथा

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- ‘आधी पाऊस नव्हता म्हणून पीके वाया गेली, उरली सुरली होती ती थोड्याफार पाण्यावर तगली होती पण काही कळायच्या आत तीपण अतिवृष्टीच्या पावसात वाहून गेली असून साहेब आमच्या शेतीचं लय वाटोळं झालं. पुराच्या पाण्याने बंधारे फुटून गेले, जमिनी वाहून गेल्या, कांदा-कपाशी, बाजरी पाण्यात पव्हत आहे. आता आमची परिस्थिती आगीतून … Read more

जिल्ह्यात खळबळ ! झटपट श्रीमंत होण्यासाठी पारनेर मध्ये या मुलाने टाकला बनावट नोटांचा कारखाना !

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथे बनावट नोटा छापण्याच्या कारखान्याचा पारनेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.याप्रकरणी विकास सुरेश रोकडे (वय १९) (रा. वडगाव सावताळ) या तरुणास अटक करण्यात आली आहे. दरम्यान आरोपी तरुणाकडून नोटा छापणारे मशीन, कटींग मशिन, पाचशे, शंभरच्या बनावट नोटा, खराब झालेल्या, चुरगळलेली नोटा त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या … Read more

ठेकेदारास कोणी किती लाख मागितले ? हवेत गोळीबार करण्याऐवजी त्यांनी नाव जाहीर करा !

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदा शहरातुन गॅस पाईपलाईन नेण्यासाठी ठेकेदारास कोणी किती लाख मागितले याची चौकशी करावी. जो दोषी असेल त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. आरोप करणाऱ्याने हवेत गोळीबार करण्याऐवजी नाव जाहीर करावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार यांनी केले. मी श्रेय मिळावे म्हणून राजकिय जीवनात कोणतेच काम केले … Read more

डॉ.तनपुरे कारखान्याच्या कामगार आंदोलकावर गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-  राहुरी येथील डॉ. तनपुरे साखर कारखाना कामगारांनी प्रवरेच्या आयात कामगारास गुरुवारी काळे फासले असता तनपुरे कारखाना कामगार आंदोलकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखाना कामगारांचे गेल्या १२ दिवसापासून २५ कोटी ३६ थकीत देणी घेण्यासाठी आंदोलन सुरू आहे. बारा दिवसात विविध प्रकारचे आंदोलन करण्यात … Read more

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले नुकसानग्रस्त शेतकऱ्याला सरकार…

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- पाथर्डी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या आष्टी तालुक्यातील हारेवाडी, मराठवाडी, पिंपळगावघाट, देवळगाव, सावरगाव, शेडाळे, दौलावडगाव या डोंगर पट्ट्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरांची पडझड झाली. कपाशी, उडीद, कांदा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला सरकार मदत करेल, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ घाटामध्ये दरड कोसळली ! रस्ता आता बंद…

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वृद्धेश्वर देवस्थान व मच्छिंद्रनाथ देवस्थान या दोन्ही महत्त्वपूर्ण देवस्थानला जोडणाऱ्या सावरगाव घाटात ठिक ठिकाणी दरड कोसळल्याने व जंगलातील रस्त्यालगतची झाडे थेट घाटातील रस्त्यावरच आडवी झाल्याने जड वाहनांसाठी हा रस्ता आता बंद झाला आहे. मोटारसायकलस्वार मोठी कसरत करून या घाटातून प्रवास करत असले तरी … Read more

आमदार रोहित पवार यांचा विकासकामांचा धडाका ! ‘तो’ प्रलंबित प्रश्न सुटणार …

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाच्या माध्यमातून जामखेडच्या पाणीपुरवठा योजनेसाठी १३८.८४ कोटी ₹ खर्चास राज्य सरकारने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांचा विकासकामांचा धडाका सुरूच असल्याचे दिसत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला जामखेडच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. जामखेड शहराचा पाणी प्रश्न … Read more

९ वर्षाच्या मुलाने वडिलांचा फाशी घेतलेला मृतदेह पहिला अन् पुढे झाले असे काही..

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील नितीन मोतीराम भालेराव या ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली असुन राहुरी पोलीसात अकस्मीक मृत्युची नोंद झाली आहे. नितीन भालेराव हा रोजंदारीवर मिळेल ते काम करत होता. आज दिनांक २ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ५.३० ते ६ चे सुमारास प्रात :विधीच्या निमित्ताने राहुरी … Read more

‘त्या’ संपादकाला अटक होण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविषयी खोटी बातमी दिल्याच्या आरोपावरून औरंगाबाद येथील एका वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक रविंद्र विठ्ठलराव तहकिक व प्रकाशक अंकुशराव नानासाहेब कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष बाबासाहेब उर्फ संजय रामनाथ पठाडे यांनी फिर्याद दिली आहे. पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला … Read more

साखर कारखान्याच्या मालकीच्या जागेतून लाखो रुपयांचे गौण खनिज चोरीस, अधिकाऱ्यांनी केली मोजणी

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- राहुरी येथील डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या जागेतून लाखो रुपयांचे गौण खनिज चोरुन नेले असल्याची तक्रार देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, मुसळवाडीचे सरपंच अमृत धुमाळ, माजी नगरसेवक आप्पासाहेब कोहकडे यांनी केली होती. तर देवळाली प्रवरातील तरुण कुमार भिंगारे व माऊली भागवत यांनी महसुल मंत्री थोरात … Read more

‘ती’ जबाबदारी आमदार बबनराव पाचपुतेंची !

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- राहुल जगताप हे आमदार असताना बबनराव पाचपुते हे पाणी प्रश्नी जगतापाना जबाबदार धरायचे. आता श्रीगोंद्याला पाणी देण्याची जबाबदारी आमदार बबनराव पाचपुते यांची आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना मारला. शेलार म्हणाले मी श्रेय मिळावे म्हणून कोणतेच काम केले नाही. पाणी प्रश्न माझी … Read more

Ahmednagar News : दुभत्या जनावरांना लाळ्या खुरकतची लागण

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-  दुभत्या जनावरांना लाळ्या खुरकत या आजाराची लागण होऊन तीन कालवडी दगावल्याने राहुरी खुर्द परिसरातील गोपालक शेतकरी हवालदिल झाले आहेत. राहुरी खुर्द व गोटुंबा आखाडा भागात या आजाराने धुमाकुळ घातला आहे. या भागातील बहुतांशी दुभत्या जनावरांना लाळ्या खुरकत आजाराची लागण झाली आहे. या आजाराने जनावरांच्या तोंडाच्या जबड्याला, पायाला जखमा … Read more