तहसीलदार देवरे: चौकशी समितीचा गोपनिय अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- पारनेरच्या तहसीलदार देवरे बहुचर्चित वादाच्या अनुषंगाने जिल्हा पुनर्वसन अधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या चौकशी समितीने याबाबतचा गोपनिय आहवाल जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांना सादर केला आहे.

या संदर्भात समितीने दोन दिवस संबंधीतांचे म्हणणे ऑन कॅमेरा नोंदवले. तसेच चौकशीदरम्यान संबंधीतांनी दाखल सादर केलेली तब्बल दोन हजार पानांची दखलही समितीने घेतली.

मागील महिन्यात पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी पल्लवी निर्मळ,

उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, तहसीलदार वैशाली आव्हाड यांच्या समितीने या प्रकरणी १८ जणांना म्हणणे मांडण्यासाठी पाचारण केले होते. या प्रकरणातील निगडित १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांनीऑन कॅमेरा जबाब नोंदवले.

दरम्यान या प्रकरणाशी संबंधित दस्तूरखुद्द तहसीलदार देवरे, पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, तसेच वैद्यकीय अधिकारी उंदरे, अडसूळ आणि देवरे यांचा वाहनचालक हे जबाब नोंदवण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी समितीसमोर उपस्थित राहिले नव्हते.

त्यामुळे या पाच जणांचे जबाब नोंदवण्यात आले नाही. या उर्वरित पाच जणांचे म्हणणे सादर झाल्यावर मागील आठवडाभर समितीने चौकशी दरम्यान संबंधीतांनी सादर केलेल्या विविध अनुषंगीक जवळपास दोन हजार कागदपत्रे तपासली. त्यानंतर समितीने याबाबतचा गोपनिय आहवाल जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्याकडे सादर केला आहे.