अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- पाथर्डी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या आष्टी तालुक्यातील हारेवाडी, मराठवाडी, पिंपळगावघाट, देवळगाव, सावरगाव, शेडाळे, दौलावडगाव या डोंगर पट्ट्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरांची पडझड झाली. कपाशी, उडीद, कांदा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला सरकार मदत करेल, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले. करंजी घाटाच्या सीमेवर असलेल्या अरेवाडी, मराठवाडी, देऊळगाव शेडाळा या परिसरात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी सकाळी दहा वाजता मंत्री मुंडे यांनी या नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. नुकसानग्रस्त परिसराची पाहणी केल्यानंतर राजमाता आश्रम शाळेत शेतकऱ्यांशी संवाद साधताना मंत्री मुंडे म्हणाले, कृषी, महसूल व संबंधित विमा कंपनीचे प्रतिनिधी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या पिकाचे पंचनामे केले जातील.

त्यानंतर संबंधित शेतकऱ्याला नुकसानभरपाई दिली जाणार आहे. राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याने शेतकऱ्याला न्याय दिला जाईल. आमदार आजबे म्हणाले सावरगाव, शेडाळा, गंगादेवी येथील घरांची मोठी पडझड झाल्यामुळे येथील नुकसानग्रस्तांना न देखील मोठी मदत तसेच इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही शासनाने देण्याची मागणी आमदार यांनी यावेळी केली.

यावेळी आमदार बाळासाहेब आजबे, बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, तहसीलदार राजाभाऊ कदम, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, जिल्हा परिषद सदस्य सुखदेव खाकाळ, शिवाजी डोके, सभापती अशोक इथापे, बद्रीनाथ जगताप, रमेश तांदळे, राष्ट्रवादीचे नेते परशुराम मराठे,

मोहन मराठे, बन्सी मराठे, सरपंच अशोक माळी, आदर्श शिक्षक सतीश मराठे, म्हातारदेव मराठे, कान्हू मराठे, भाऊसाहेब मराठे, शहादेव मराठे, पांडुरंग हाडे, राजू शिरसाठ, सुनील घोडके, दत्तू घोडके. गोविंद फसले,मुरली फसले, बाळासाहेब कोहक, माजी सरपंच प्रकाश पालवे व शेतकरी उपस्थित होते.