गांजा विक्रीसाठी आलेल्या जामखेड येथील दोघांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- गांजा विक्रीसाठी आलेल्या जामखेड येथील दोघांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे. त्यांच्याकडून 150 किलो गांजा, कारसह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित दोन महिला मात्र पसार झाल्या आहेत. किरण आजिनाथ गायकवाड (वय 29 रा. मिलिंदनगर, ता. जामखेड) व मौलाना सत्तार शेख (वय 27 … Read more

गावठी हातभट्टीवर पोलिसांच्या कारवाया सुरूच…

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- नगर तालुका पोलिसांनी वाळकी शिवारात गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत गावठी दारू , कच्चे रसायन असा 31 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून भट्टी चालक संतोष दिलीप पवार (रा. धोंडेवाडी, वाळकी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 702 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

तनपुरे कारखाना कामगारांचे उपोषण सुरूच, संचालक व कामगारांची बैठक निष्फळ, काँग्रेसच्या आमदारांचा पाठींबा

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-  डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी उपोषणाच्या चौथ्या दिवशी बोंबाबोंब आंदोलन करून कारखाना व्यवस्थापनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याची तयारी करत असल्याची माहिती संचालक मंडळाला समजताच कारखान्याचे चेअरमन नामदेव ढोकणे यांच्यासह संचालक मंडळ उपोषणस्थळी दाखल होऊन उपोषण कर्त्यांबरोबर चर्चा केली परंतु उपोषणकर्त्यांनी तहसीलदार अथवा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ठोस लेखी आश्वासन मागितल्याने ही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ ठिकाणी आढळला मृतदेह..!

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- अज्ञात व्यक्तीने टणक व कठीण हत्याराने पाठीवर, डोक्यावर व हातापायावर गंभीरपणे मारून अज्ञात व्यक्तीचा खून केल्याची घटना नगर तालुक्यातील अरणगाव- सोनेवाडी जाणाऱ्या बाजुस घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, अरणगाव ते सोनेवाडी जाणाऱ्या रेल्वे ओव्हरब्रीज रोडच्या बाजूस … Read more

नगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात राणेंविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातवादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडते आहे. दरम्यान या प्रकरणात राणेंविरोधात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातच नगर जिल्ह्यात देखील राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतेच नारायण राणेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात … Read more

देवरेंच्या बदलीसाठी महसूल कर्मचारी एकटावले; आंदोलनच सुरूच ठेवणार

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- गेल्या काही दिवसांपासून पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यामुळे नगर जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. यातच आता तहसीलदार देवरेंच्या विरोधात तालुक्यातील महसूल कर्मचारी एकटावले आहे. त्यांनी आंदोलन पुकारले आहे. पारनेर तालुक्यातील महसूल कर्मचारी व तलाठी संघटनांनी बुधवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे कामकाज ठप्प झाले. एकतर … Read more

दिलासादायक ! ‘या’ तालुक्यातील पन्नासहून अधिक गावे झाली कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- नगर जिल्ह्यातून कोरोना पायउतार होऊ लागला आहे. कोरोनाबाधितांची संख्या आता काहीशी घटताना दिसून येत आहे. यातच अनेक तालुक्यातील गावांचा प्रवास हा कोरोनामुक्तीकडे सुरु आहे. यातच नगरकरांसाठी एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. नगर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत असून, ११० गावांपैकी ५७ गावांत कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. … Read more

तुमचे आंदोलन बंद करा; अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना सांगून तुमच्या बदल्या करू

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-  तुम्ही सुरू केलेले आंदोलन बंद करा; अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना सांगून तुमच्या बदल्या करू, अशी धमकी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते काशीनाथ दाते यांनी दिल्याचा आरोप महसूल कर्मचारी संघटनेने बुधवारी केला, तर आपण अशी धमकी दिली नसल्याचे स्पष्टीकरण सभापती दाते यांनी दिले आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली करावी; अन्यथा आमची बदली … Read more

चार वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीला पळवून नेले मात्र…

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- मुलीस फुस लावून पळवून नेणार्‍या आरोपीला अटक करण्यात पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला यश आले आहे. भाऊसाहेब ऊर्फ मनोज देवराम हंडाळ (रा. हंडाळवाडी ता. पाथर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिडीत अल्पवयीन मुलीला देखील ताब्यात घेतले आहे. तपासकामी त्यांना पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत … Read more

‘त्या’ कर्मचाऱ्यांचे तहसीलदाराविरोधात आंदोलन सुरू..!

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप राज्यभर व्हायरल झाली. यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संघटनांनी देवरे यांच्या बाजूने मुख्यमंत्र्यांसह अनेकांना निवेदने दिले. मात्र प्रत्यक्षात देवरे यांच्या समवेत काम करणारे त्यांच्या हाताखालील कर्मचारीच आता देवरे यांच्या विरोधात उभे राहीले आहेत. पारनेर तालुका महसूल कर्मचारी व तलाठी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ७५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०७ हजार ४४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७३४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

इंदुरीकर महाराजांच्या बचावासाठी आमदार निलेश लंके …

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- पारनेर तालुक्यातील भाळवणी याठिकाणी आमदार निलेश लंके यांच्या कोरोना सेंटरमध्ये सप्ताहाचे आयोजन केले होते यावेळी समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे हरिकीर्तन या ठिकाणी ठेवण्यात आले त्यांनी कीर्तनामध्ये केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करू नका असे आमदार निलेश लंके यांनी प्रसिद्धीपत्रक काढून खुलासा केला आहे या पत्रकामध्ये भाळवणी, ता. पारनेर … Read more

देवरे प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची समिती नेमा

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची स्थानिक लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कामात अडथळा निर्माण करून महिला अधिकारी म्हणून अहवेलना व कुचंबणा होत असल्याबद्दल महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले. देवरे यांच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य स्तरावरून वरिष्ठ … Read more

बेणे अनुदानात जिल्ह्यातील ‘ या’ साखर कारखान्याच्या संचालकांचा १२ कोटीचा घोटाळा!, शेतकरी संघटनेचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- बेणे अनुदानात अशोकच्या संचालक मंडळाने सुमारे १२ कोटी रूपयांची अनियमितता दिसून येत आहे. तसेच कारखान्याच्या जमिनी शैक्षणिक संस्थेच्या नावे करून या जमिनी लाटण्याचा डाव असल्याचा आरोप करून याप्रकरणी संचालक मंडळावर बरखास्तीची कारवाई करावी, अशी मागणी आरोप शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल औताडे व युवराज जगताप यांनी केली आहे. प्रादेशिक … Read more

खासदार विखेंनी केला नगरच्या ‘ या’ मल्लाचा गौरव

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :-अहमदनगर येथील कुस्तीपटू पै.महेश रामभाऊ लोंढे यांनी शेवगाव कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत मानाची चांदीची गदा पटकविल्याबद्दल खा.डॉ.सुजय दादा विखे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. गेल्या आठवड्यात शेवगाव येथे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पै. महेश लोंढे व शिर्डीचे पै.मयूर चांगले यांच्यात … Read more

२४ वर्षीय विवाहित तरुणीचा विनयभंग

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :-  राहुरी तालुक्यातील केंदळ बुद्रुक परिसरात २४ वर्षीय विवाहित तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहित तरुणी शेतामध्ये काम करत असताना आरोपी विठ्ठल तारडे हा तिच्या जवळ आला व आपण उसात जाऊ असे म्हणून तरुणीला धरुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नारायण राणेंविरोधात ह्या तालुक्यात गुन्हा !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधात बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त होत असतानाच पारनेर येथेही शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहकले यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पारनेर पोलिस ठाण्यात जात राणे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगांवकर, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास … Read more