इंदुरीकर महाराजांच्या बचावासाठी आमदार निलेश लंके …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- पारनेर तालुक्यातील भाळवणी याठिकाणी आमदार निलेश लंके यांच्या कोरोना सेंटरमध्ये सप्ताहाचे आयोजन केले होते

यावेळी समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे हरिकीर्तन या ठिकाणी ठेवण्यात आले त्यांनी कीर्तनामध्ये केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करू नका असे आमदार निलेश लंके

यांनी प्रसिद्धीपत्रक काढून खुलासा केला आहे या पत्रकामध्ये भाळवणी, ता. पारनेर येथील मा. शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदीर कोवीड सेंटर भाळवणी येथे रुग्णांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

चालु आठवड्यामध्ये हरिनाम सप्ताहाचे आयोजन कोवीड सेंटरमध्ये केले होते. त्यानुसार दिनांक 20 ऑगस्ट रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांची नियोजीत किर्तनरूपी सेवा कोवीड सेंटरमध्ये होती.

त्यांच्या किर्तनातील काही वाक्यांचा संदर्भ घेऊन काही बातम्या वर्तमान पत्रात व न्युज चॅनलवर प्रसारीत झाल्या होत्या. त्यांचे वाक्य हे कुणाला उद्देशुन किंवा कुणाच्या विरोधात नव्हते परंतु काही व्यक्तींना त्यांचे ते वाक्य रूचलेले दिसत नाहीत.

समाजप्रबोधनकार हे कुणा पक्ष-पार्टीचे नसतात ते समाज प्रबोधन करण्याचे काम करतात. समाजप्रबोधन व अध्यात्मामध्ये ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांचे नाव मोठे आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा कुणीही विपर्यास करू नये ही विनंती. आमदार निलेश लंके यांच्या वतीने करण्यात आली आहे.