देवरे प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची समिती नेमा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची स्थानिक लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कामात अडथळा निर्माण करून महिला अधिकारी म्हणून अहवेलना व कुचंबणा होत असल्याबद्दल

महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले. देवरे यांच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी

राज्य स्तरावरून वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती सात दिवसाच्या आत स्थापन करा, अन्यथा राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला.

यापूर्वीसुद्धा नजिकच्या काळातच अशा प्रकारे अनेक महिला अधिकारी व इतर अधिकारी यांच्या विरोधात केवळ लोकप्रतिनिधींच्या मर्जीने काम न केल्यामुळे वरिष्ठांवर दबाव टाकून पाहिजे, अशा प्रकारची चौकशी करून कारवाईचे प्रस्ताव पाठवल्याचे दिसून आले.