अहमदनगर ब्रेकिंग : शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- शेततळ्यात बुडून धनंजय दादाभाऊ आगलावे (२२) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी दुपारी २ वाजता गुंजाळवाडी पठार येथे घडली. आगलावे यांच्या घरामागे शेततळे आहे. धनंजय गायींना पाणी पाजण्यासाठी शेततळ्यातून पाणी काढत असताना पाय घसरून आत पडला. पोहता येत नसल्याने तो बुडाला. नागरिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या भागात अवकाळी पाऊस  

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे यापूर्वीच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात आता परत अवकाळी पावसाने हजेरी लावली. आज शिर्डी आणि राहाता परिसरात अवकाळी पावसाची हजेरी, अर्धा तास जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची परत एकदा धावपळ उडाली. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊसाचा हवामान खात्याने इशारा दिला  होता. त्यानुसार आज … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यात परत बिबट्याचा संचार

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  यापुर्वीच वनविभगाने दोन बिबटे जंरबंद करूनही परत पाथउर्ी तालुक्यातील मोहरी परिसरात बिबट्या व दोन बछड्यांना नागरिकांनी पाहिल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. बुधवारी रात्री १ बिबट्याची मादी व दोन बछडे नागरिकांना दिसले. रात्रीची वेळ असल्याने वनविभागाचे कर्मचारी येऊनही आम्ही काही करू शकत नाहीत,असे सांगितल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. … Read more

त्यांच्या जीवावरच मी आमदार झालो

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  शेतकरी व निराधार तळागाळातील कष्टकरी माणूस हा माझा श्वास आहे. त्यांच्या जीवावरच मी आमदार झालो. त्यामुळे मतदारसंघातल्या सर्व वंचित निराधारांना संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळवून देईन.मतदार संघातील इतर विकासकामे करत असताना या योजनेला मी प्रथम प्राधान्य देईल असे मत आमदार लंके यांनी व्यक्त केले. गावातील … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येने ओलांडला साठ हजारांचा आकडा आज वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज १९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ हजार १५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २९५ ने वाढ … Read more

आमदार रोहित पवारांचा फोटो पाहून तुम्हालाही वाटेल आमदार असावा तर असा…

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- रोहित पवार यांना आपली गाडी थांबवून अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीला धावले गेल्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. रोहित पवार यांनी स्वत: काट्यात गेलेली अपगातग्रस्त गाडी बाहेर काढण्यासाठी मदत केली. रोहित पवार यांचं हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. मांडवे- पिंगळी (ता.माण) यादरम्यान बुधवारी दहिवडीतील काटकर या शेतकऱ्याचा अपघात … Read more

विखे पाटील म्हणतात राज्यात लवकरच भाजपची सत्ता येईल !

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास मंत्राने संपूर्ण देशाचा विश्वास संपादन केला आहे.बिहार निवडणुकीच्या यशानंतर सर्वाची जबाबदारी वाढली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेवून आत्मनिर्भर योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यत पोहचवा. राज्यात लवकरच सता येईल. शिर्डी नगरपंचायतीवरही भाजपचाच झेंडा फडकविण्यासाठी कटीबध्द व्हा असा संदेश भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे … Read more

श्री घोडेश्वरी देवी मंदिरात धाडसी चोरी ,११ लाख रुपयांचा ऐवज चोरी.

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जागृत देवस्थान श्री घोडेश्वरी देवी मंदिरात गुरुवारी मध्यरात्री धाडसी चोरी झाली असून. मंदिर गाभाऱ्यातील १७ किलो चांदी व त्यावरील हिरे असे एकूण ११ लाख रुपयांची चोरी झाल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. सोनई पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे व सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-राहुरी शहरातील हॉटेल न्यू भारत मधील हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा श्री.संदिप मिटके DYSP श्रीरामपूर विभाग,अहमदनगर , आयुष नोपाणी, अभिनव त्यागी प्रशिक्षणार्थी आयपीएस यांच्या पथकाची कारवाई एका पिडीत परप्रांतीय( बंगाली) महिलेची सुटका व १ आरोपी ताब्यात आज दि. 19/11/2020 रोजी श्री.संदिप मिटके DYSP श्रीरामपूर विभाग,अहमदनगर यांना राहुरी शहरातील हॉटेल न्यू … Read more

युवकांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेतल्यास वंचित घटकांना मोठा आधार मिळणार -अभिषेक कळमकर

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- टीम हँगर वॉरियर्स व फीडिंग इंडियाच्या वतीने वंचित घटकातील मुलांची दिवाळी गोड करुन बालदिना निमित्त त्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कोठी येथील वंचित घटकातील मुलांना माजी महापौर अभिषेक कळमकर व शम्स हाजी समीर खान यांच्या हस्ते खाऊचे वाटप झाले. यावेळी फक्रुद्दीन हकीमजीवाला, नुमेर शेख, नदीम शेख, अफान सोलापूरे, सलमान … Read more

पणत्यांच्या झगमगत्या प्रकाशात विद्यार्थ्यांनी अनुभवली कोरोनातील दिवाळी

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  रांगोळ्यांनी सजलेले अंगण, लखलखत्या पणत्यांचा झगमगाट, तुरळक फटाक्यांची आतषबाजी, हवेत सोडलेल्या आकाश दिव्यानी उजळलेले आसमंत, हातात असलेल्या दिव्यांचा प्रकाश तर संगीताच्या तालावर ठेका धरत वंचित घटकातील मुला-मुलींनी दिवाळीचा आनंद लुटला. निमित्त होते लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, निरंजन सेवाभावी संस्था व शासकीय बाल निरिक्षण समितीचे दीपोत्सव-2020 चे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर … Read more

कोरोनाने डोके वर काढले.. ह्या तालुक्यात वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ११ नोव्हेंबरला शून्य होता. मात्र, दिवाळीतील वाढत्या गर्दी आणि नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. बुधवारी एकाच दिवसात श्रीरामपुरात १६ रुग्ण सापडल्याने प्रशासनासह आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. येत्या २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होत असल्याने या … Read more

दरवर्षी भाऊबीजच्या दिवशी मुस्लिम भाऊ ओवाळणी घेऊन बहिणीच्या भेटीला

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  काही वर्षांपुर्वी आकस्मिक निधन झालेले पत्रकार नंदू शिंदे यांच्या कुटुंबीयांना मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख यांनी भेट देऊन आर्थिक मदतीसह दिवाळी भेट दिली. भाऊबीजच्या दिवशी दरवर्षी न चुकता ओवाळणी घेऊन येणार्‍या एका मुस्लिम भावास पाहून अनेकांचे मन भारावले. तर अनोख्या पध्दतीने साजरी करण्यात आलेल्या या … Read more

आरोग्यमय जीवनासाठी खेळाशिवाय पर्याय नाही -आमदार निलेश लंके

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- आरोग्यमय जीवनासाठी खेळाशिवाय पर्याय नाही. कोरोना सारख्या महामारीने मनुष्यामध्ये आरोग्याप्रती जागृकता निर्माण झाली. आरोग्य सदृढ असल्यास जीवन आनंदी बनते. सलग 40 वर्ष दिवाळी सुट्टीत शहरी व ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी निंबळक येथे घेण्यात येणारी दिवाळी क्रिकेट स्पर्धा कौतुकास्पद आहे. निंबळक गावासह एमआयडीसीच्या विकासात लामखडे परिवाराचे भरीव योगदान दिले आहे. … Read more

गावातील आर्थिक अडचणी सोडवून शेतकर्‍यांना आधार द्यावा -राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- दिवाळी पाडवा व भाऊबीजच्या मुहूर्तावर घोरपडवाडी (ता. राहुरी) येथे घोरपडवाडी मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेडचे उद्घाटन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, रासपचे शरद बाचकर, रासपचे जिल्हा युवा अध्यक्ष नानाभाऊ जुंधारे, यशवंत सेनेचे विजय तमनर, पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप पवार, विश्‍वास पाटील धोंडे, पाटबंधारे … Read more

टीम टॉपर्स स्केटिंगच्या वतीने एलएलबी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचा सत्कार

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत नुकत्याच झालेल्या एलएलबी परीक्षेत उत्तीर्ण झालेले आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू गौरव डहाळे, अक्षय मुल्लया व सिद्धार्थ नागोरी यांचा टीम टॉपर्स स्पोर्टस अ‍ॅण्ड मल्टीपर्पज अकॅडमीच्या वतीने सत्कार करण्यात आला. टीम टॉपर्सचे संस्थापक अध्यक्ष आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत पाटोळे यांनी एलएलबी उत्तीर्णांचा सत्कार केला. यावेळी टेनिसबॉल क्रिकेट संघटनेचे … Read more

26 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार शेतकरी, कामगारांचा मोर्चा

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  26 नोव्हेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्‍वभूमीवर हमाल पंचायत येथे बुधवारी (दि.18 नोव्हेंबर) शेतकरी, कामगार संयुक्त संघर्ष समितीची बैठक पार पडली. हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकित गुरुवार दि.26 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले. यावेळी आयटकचे अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, कॉ. बाबा … Read more

नागरिकांकडून पैसे उकळणार्‍या पोलीसांवर कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विना मास्क फिरणार्‍या नागरिकांकडून शंभर रुपये दंड आकारले जात आहे. मात्र एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत नागरिकांकडून मनमानीपणे पाचशे ते हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात येत असल्याचा आरोप मनसेचे नगर तालुका उपप्रमुख बाळासाहेब ढवळे यांनी केला आहे. तर नागरिकांची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना अवाजवी दंड वसूल करु नये, … Read more