दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच दोन बालकांचा विहिरीत पडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-दिवाळीचा सण आला असून सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे. यातच श्रीगोंदा तालुक्यातून अत्यंत दुखांकित बातमी समोर येत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील लगडवाडी परिसरात विहिरीमध्ये पाय घसरून दोन भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील लगडवाडी परिसरात राहणाऱ्या कांतीलाल … Read more

बिबट्यानंतर आता या प्राण्याची दहशत वाढू लागली

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तरास नामक प्राण्याचा वावर वाढू लागल्याच्या घटना ऐकण्यात आल्या आहेत. या प्राण्याकडून काही जणांवर हल्ला झाल्याच्या घटना देखील घडल्या होत्या. अकोले तालुक्यातील राजूर मध्ये या प्राण्याचा वावर वाढू लागला आहे. जंगलात खायला नसल्याने बिबट्या, तरास गावाकडे येऊ लागल्याने नागरिकमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने … Read more

दूध उत्पादक शेतकऱ्यांना अकरा लाखांचा बोनस वाटप

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- गोधन फार्मतर्फे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दूध व्यवसायात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याच्या उद्देशाने राहुरी तालुक्यातील मालुंजे येथे आधुनिक दूध संकलन केंद्र उभारले. तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीबरोबर सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. यातच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गोधन फार्मतर्फे मागील वर्षभरात दूधपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या बिलातून एक पैसाही कपात न करता, … Read more

अज्ञात समाजकंटकांडून सामाजिक कार्यकर्त्याच्या घराची तोडफोड

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-दारूबंदी, भ्रष्टाचार, अवैध धंदे अशा प्रवृत्तींना आळा बसावा यासाठी कार्य करणाऱ्या पारनेर तालुक्यातील निघोज मधील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या घराची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली आहे. दरम्यान हि घटना काल रात्री १२ : ३०च्या दरम्यान घडली. याबाबत सामाजिक कार्यक्रते बबन कवाद यांनी अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले कि, यांच्या घरी काही … Read more

तरुणावर हल्ला करणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बिबट्याने संगमनेर तालुक्यात एका तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात अनिल संभाजी मधे हा युवक जखमी झाला होता. ही घटना संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला येथे घडली होती. तरुणावर हल्ला केल्याने वन खात्याने पिंजरा लावला होता. … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन कोटीहून अधिकचा पीकविमा मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-पारनेर तालुक्यातील डाळिंब उत्पादक 423 शेतकर्‍यांना 2 कोटी 20 लाख 3 हजार 940 रुपये तर 22 संत्रा उत्पादक शेतकर्‍यांना 1 लाख 99 हजार 45 रुपये व 5 आंबा उत्पादक शेतकर्‍यांना 80 हजार 45 रुपये हवामानावर आधारित पीकविमा मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान सन 2019-2020 या आर्थिक वर्षात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील … Read more

सराफाकडून महिलेची 9 लाखांची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील एका महिलेला एका सराफाने लाखो रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पिता पुत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी एक़ास ताब्यात घेतले असून एक जण पसार झाला आहे. दरम्यान याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, येथील … Read more

पुरवठा विभागाचा हलगर्जीपणा; ग्राहकांना मिळणाऱ्या धान्यात आढळल्या लेंड्या

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-ऐन सणासुदीच्या काळात शासनाने नागरिकांसाठी सरकारी धान्य दुकानात गहू, तांदूळ, हरभरा डाळ व साखर पाठविली आहे. यामध्ये तांदूळ अत्यंत खराब असून गहू व उंदराच्या लेंड्यासह इतरही घाण आहे. हा तांदूळ काळाकुट्ट असून अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. हा नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. सदर धान्य अजिबात खाण्यायोग्य नाही. अशाच प्रकारे … Read more

महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला काही तासातच केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यातच बहुतांश वेळा महिलांवरील होणारे अत्याचाराच्या घटना त्यांच्या परिचित व्यक्तींकडूनच झालेल्या आढळून आल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील पानोडी परिसरातील एका 35 वर्षीय विवाहित महिलेवर नातेवाईकाने बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी कि, पीडितेने तक्रारीत म्हटले आहे … Read more

भटक्यांची पंढरी श्रीक्षेत्र मढी देवस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील भटक्यांची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र मढी देवस्थानचे अकरा जणांचे विश्वस्त मंडळ नगरच्या सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात जाहीर केले. देवस्थानच्या मागील विश्वस्त मंडळाची मुदत गेल्या ३१ ऑगस्ट रोजी संपली. नियमानुसार सहायक धर्मादाय आयुक्तांनी नव्या विश्वस्त मंडळाची प्रक्रिया १ आॅक्टोबरपासून सुरू केली होती. देवस्थानच्या घटनेप्रमाणे स्थानिकांमधून सहा, … Read more

केंद्राच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडले

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या संकटमय काळात केंद्राच्या आडमुठ्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आधीच कोरोनाने आर्थिक हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. यातच केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना (पी. एम. किसान) योजनेंतर्गत मागील वर्षापासून प्रत्येकी २ हजार रुपये मदत दिली जात होती. … Read more

साेन्या-चांदीच्या मागणीत मोठी वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- कोरोना महारोगराईमुळे कठीण काळातून जाणाऱ्या सराफा बाजारपेठेसाठी धनत्रयोदशी-दिवाळीच्या सणामुळे दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनच्या नियमांतील शिथिलता पाहता घरांतून बाहेर निघून धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीची खरेदी करत आहेत. यामुळे सोन्या-चांदीच्या मागणीत वाढ पाहायला मिळाली आहे. विशेष म्हणजे, कोरोना महारोगराईदरम्यान या वर्षी सात ऑगस्टला हाजिर बाजारात सोने ५६,१२६ रु. प्रति १० ग्रॅम … Read more

वयाच्या सोळाव्या वर्षी अनिल कराळे शिवसेनेत सक्रिय झाले आणि…

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील मिरी, करंजी जिल्हा परिषद गटाचे सदस्य व शिवसेनेचे गटनेते अनिल कराळे यांचे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना १३ ऑक्टोबरला दाखल करण्यात आले होते. महिनाभर उपचार सुरू होते. त्यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. वयाच्या … Read more

निवडणुकीत शिवसेनेचा स्वबळाचा नारा

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-अकोले नगरपंचायत निवडणुकीत सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा नारा देत महाविकास आघाडीऐवजी एकला चलोरेची भूमिका शिवसेनेने घेतली. तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या शासकीय विश्रामगृहावर शिवसैनिकांची बैठक झाली. आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला गुरुवारी आयोजित बैठकीचे निमंत्रण न दिल्यामुळे शिवसैनिकांनी आक्रमक होऊन काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आगपाखड … Read more

फसवणूक प्रकरणी सोनारावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- दागिने ठेवा आणि प्रत्येक महिन्याला एका तोळ्यामागे एक हजार रुपये मिळवा, अशा फसव्या योजनेत येथील एका सोनाराने कोकमठाणच्या (ता. कोपरगाव) येथील महिलेची नऊ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. योगिता पवार (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बाळासाहेब डहाळे व अक्षय डहाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल … Read more

प्रतिबंधक सूचनांचे पालन करा; महसूलमंत्र्यांचे जनतेला आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-देशभरासह राज्यात अखेर दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. तर सर्वत्र धनतेरस साजरी केली जाणार असून एकमेकांना त्या बद्दल शुभेच्छा दिल्या जात आहेत. याच पार्श्वभुमीवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाची दिवाळी आपण सर्वांनी उत्साहात, आनंदात साजरी करुया. कोविडचा धोका अजूनही टळलेला नसल्याने प्रतिबंधक … Read more

या तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; एकच दिवसात वाढले एवढे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा फैलावत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत आहे. त्यातच जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोनाने पुन्हा एकदा वेग घेतल्याच्या दिसून येत आहे. अकोले तालुक्यात कोरोनाचा कहर काही थांबायचे नाव घेत नाही. तर लोक देखील काही जबाबदारीने वागायला … Read more

तरुणावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच काल बिबट्याने संगमनेर तालुक्यात एका तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात अनिल संभाजी मधे हा युवक जखमी झाला होता. ही घटना संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला येथे घडली होती. तरुणावर हल्ला केल्याने वन खात्याने पिंजरा लावला … Read more