कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, नागरिकांनी काळजी घेणे अत्यावश्यक

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-  सध्या कोविडचा प्रादुर्भाव प्रथमदर्शनी कमी झालेला दिसत असला, तरी दुसरी लाट येण्याची शक्यता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने वर्तवली असल्याने नागरिकांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टसिंग, गर्दी न करणे, अतिगर्दीच्या ठिकाणी न जाणे, सॅनिटायझरचा वापर अतिशय गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांनी सिव्हिल … Read more

????‍♂️ अहमदनगर ब्रेकिंग : खड्यांमुळे आणखी एकाचा जीव गेला,दुचाकीस्वार जागीच ठार

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-  नगर मनमाड महामार्गावर पडलेल्या मोठ मोठ्या खड्यांमुळे आणखी एकाचा जीव गेला आहे,शिर्डी शहरात नगर – मनमाड महामार्गावर दुचाकी आणी कंटेनरचा भिषण अपघात होत एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराच जागीच ठार झाला असून दरम्यान कंटेनर चालक पळून जात असतांना त्यास काही युवकांनी पाठलाग करून निमगांव बायपास चौफुलीजवळ … Read more

नीलेश लंके यांनी एक वर्षात तब्बल ६५ कोटी ४५ लाखांचा निधी आणला

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-  कोरोना संकटामुळे निधीला कात्री लावण्यात आली असतानाही आमदार नीलेश लंके यांनी एक वर्षात तब्बल ६५ कोटी ४५ लाखांचा निधी खेचून आणला. वर्षपूर्तीनिमित्त एमएलएनीलेशलंके डॉट कॉम या संकेतस्थळावर वर्षभरातील कामाचा लेखाजोखा त्यांनी मांडला आहे. या संकेतस्थळाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी अनावरण केले. मुुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात बुधवारी अनावरण समारंभ … Read more

परदेशी कांदा ग्राहकांना ६०रुपये किलो दराने मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी परदेशातून २५ हजार मेट्रिक टन कांदा आयातीची घोषणा केली. ७ हजार टन कांदा खासगी आयातदार तर उर्वरित नाफेडच्या माध्यमातून आयात होणार आहे. याबाबत बुधवारी नाफेडने ऑनलाइन लिलाव प्रक्रिया अवघ्या १० मिनिटांत आटोपती घेतली. हा आयातीत कांदा नाफेड ५० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी … Read more

सुजित झावरे पाटलांचे आमदार निलेश लंके यांच्यावर टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- अतिवृष्टी झालेल्या नगर जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईचे पैसे जमा झाले मात्र,पारनेर तालुक्यात अद्याप छदामही मिळाला नसल्याची खंत व्यक्त करताना अशा संकटाच्या काळात लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे असते असे सांगत तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी चमकोगिरी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन मदत करावी. तुम्ही कोणाच्या विमानात बसता यापेक्षा जनतेला … Read more

अर्णब गोस्वामी यांची सुटका होत नाही तोपर्यंत निषेध व्यक्त करणार – चंद्रकांत पाटील

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- ही ठोकशाही आहे. यामध्ये कुठलाही कायदा नाही कानून नाही. म्हणून याविरुद्ध महाराष्ट्रात ठिक ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत. आता जो पर्यंत अर्णब गोस्वामी यांची सुटका होत नाही तोपर्यंत आम्ही काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करणार आहोत. सरकारच्या स्तुतीची काही आरत्या, भजन नव्याने गावी लागतील. जसं आणीबाणी मध्ये लाखो … Read more

पाथर्डी तालुक्यातील घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तातडीने उपायोजना कराव्या

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील विविध भागात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असताना मनुष्य वस्तीत येणार्‍या बिबट्यांना प्रतिबंध करण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्या व बिबट्यांना रेडिओ कॉलर बसविण्याची मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन वन विभाग कार्यालय अधीक्षक डी.एन. शिरसाठ यांना देण्यात आले. यावेळी यशस्विनीच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील, … Read more

सरकारी कर्मचारी व शिक्षकांची 26 नोव्हेंबरला देशव्यापी संपाची हाक

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- टाळेबंदी काळात कामगार विरोधी घेतलेले निर्णय, खाजगीकरण व कंत्राटीकरणाने राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षकांच्या आर्थिक सेवा व हक्क विषयक अस्वस्थता निर्माण झाली असल्याने या हक्काचे व अधिकार अबाधित ठेऊन विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील करुले शिवारात घरानजीकच्या विहिरीत उडी घेत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. दिलीप अर्जुन कोल्हे ( वय ४८ वर्षे ) असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करुले येथील … Read more

बलात्कारात ‘त्या’ संशयितास ‘असे’ घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- जुलै २०१८ मध्ये नगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला मोहसीन बादशहा सय्यद (रा. माळी चिंचोरे, ता. नेवासे) हा संशयित आरोपी दोन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्या राहत्या घरातच मुसक्या आवळण्यात नेवासे पोलिस ठाण्याचे प्रभारी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अभिनव त्यागी व … Read more

जास्तीचे बील आकारुन बील न भरल्याने रुग्णास दोन दिवस ठेवले बसवून

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- जास्तीचे बील आकारुन बील न भरल्याने कोरोना रुग्णास दोन दिवस हॉस्पिटलमध्ये बसवून ठेवणार्‍या नेवासा तालुक्यातील भेंडा येथील खाजगी हॉस्पिटलची मान्यता व सनद रद्द करुन संबंधीत डॉक्टरांवर साथरोग नियंत्रण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले. या … Read more

गॅलॅक्सी स्कूलच्या फी प्रकरणी चौकशीचे आदेश शिक्षणाधिकारींनी काढले पत्र

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- वडगाव गुप्ता येथील गॅलॅक्सी नॅशनल स्कूलच्या प्रकरणी त्रिस्तरीय समिती स्थापन करून त्याच्या चौकशीचा अहवाल सादर करण्यात यावा, असा आदेश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी रमाकांत काठमोरे यांनी गटशिक्षण अधिकार्‍यांना दिला आहे. शाळेतील विद्यार्थिनींचे पालक वैभव भोराडे व इतर पालकांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरुन चौकशी होणार आहे. वडगाव … Read more

युवक कल्याण योजनेअंतर्गत टाळेबंदीमुळे प्रलंबीत पडलेले प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-सामाजिक संस्थांनी समाजजागृतीचे कार्य प्रभावीपणे राबवावे. शासन व लाभार्थी यांच्यामधील दुवा म्हणून संस्थांनी काम केले पाहिजे. या कोरोना विरोधी मोहिमेत युवकांनी पुढाकार घेऊन कार्य करण्याची अपेक्षा आहे. जिल्हा क्रिडा कार्यालय व जिल्हा प्रशासन सामाजिक संस्थांना नेहमी सहकार्य करेल, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले. जय असोसिएशन … Read more

भयानक ! जसा माणसांना कोरोना तसा जनावरांना पछाडतोय ‘हा’ आजार

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- गेल्या फेब्रुवारी व मार्चपासून कोरोनाने भारताला ग्रासलं आहे. महाराष्ट्रातही ही आकडेवारी मोठी आहे. परंतु या आजाराबरोबरच जनावरांमध्येही साथीचा आजार आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. दोन्ही आजारांमध्ये मृत्यूचे प्रमाण फारच कमी असले तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. काय आहे हा आजार :- लंपी स्किन … Read more

अहमदनगर शहरातील ‘ह्या’ प्रसिद्ध दुकानावर अन्न व औषध प्रशासनाचा छापा; होत होते ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर शहरातील विविध पदार्थांसाठी विशेषतः दिवाळी फराळसाठी प्रसिद्ध असलेले मे. हेमराज फुड्स, केटर्सचे दुकान व गोदामावर अन्न औषध प्रशासनाने छापा टाकला. सदर कारवाई मंगळवारी सायंकाळी केली गेली. याठिकाणी मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळून आले आहेत. अन्नपदार्थ तपासणी दरम्यान विश्वजीत हेमराज बोरा व त्याचा लहान बंधू यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या … Read more

कामगार व ऊस उत्पादकांची दिवाळी गोड

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-सहकार चळवळीसाठी मार्गदर्शक ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सन २०१९-२० मध्ये गळितास आलेल्या ऊस उत्पादकांचे दीपावलीनिमित्त १०० रुपये प्रतिटनाप्रमाणे पेमेंट बँकेत वर्ग केल्याची माहिती अध्यक्ष प्रतापराव ओहोळ यांनी दिली. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर चालणाऱ्या या कारखान्याने कायम शेतकरी, … Read more

भजन व कीर्तनासह मंदिरे खुली करावीत

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे देशासह महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने मंदिरासह भजन-कीर्तन सेवा देखील बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यात आता हळूहळू सर्वत्र सर्व व्यवहार सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याने भजन-कीर्तनासह मंदिरे देखील खुली करावी, अशी मागणी अखिल … Read more

नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम मिळावी’

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- महाआघाडी सरकारने सत्तेवर आल्यावर क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना राबवून थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. त्यांचा सातबारा कोरा केला. योजना जाहीर करतानाच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना अद्याप प्रोत्साहनपर रक्कम मिळालेली नाही. ही रक्कम त्वरित मिळावी, … Read more