सुजित झावरे पाटलांचे आमदार निलेश लंके यांच्यावर टीकास्त्र

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- अतिवृष्टी झालेल्या नगर जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईचे पैसे जमा झाले मात्र,पारनेर तालुक्यात अद्याप छदामही मिळाला नसल्याची खंत व्यक्त करताना अशा संकटाच्या काळात लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे असते असे सांगत तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी चमकोगिरी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन मदत करावी.

तुम्ही कोणाच्या विमानात बसता यापेक्षा जनतेला तुम्ही किती मदत करता हे महत्त्वाचे असल्याची टीका जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी आमदार निलेश लंके यांचे नाव न घेता केली .

तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील सुमारे एक कोटी रुपयांच्या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन आज झावरे पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी दूध संघाचे अध्यक्ष राहुल पाटील शिंदे होते सरपंच पंकज कारखिले व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुजित पाटील झावरे म्हणाले की या वर्षी झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. ऊस, कांदा ,डाळिंब, सीताफळ ही पिके देखील वाया गेली आहे.शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे धोरण घेतले आहे.

मात्र, तालुक्यातील पळशी मंडल वगळता इतर ठिकाणीच्या कोणत्याही मंडलामध्ये पंचनामेच झाले नाहीत,तर मदत काय मिळणार?असा सवालही सुजित झावरे यांनी केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment