पेट्रोलची चिंता सोडा…बॅटरीवरील ई दुचाकी आता नगरमध्येच दाखल… एकदा चार्ज केल्यावर १२० किमीची राईड !

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- पेट्रोलचे वाढणारे दर पाहता आता बॅटरीवर चालणाऱ्या ई स्कूटर, ई बाईक्सकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. सरकारकडूनही ई दुचाकी वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. नगरमध्ये आनंदधाम परिसरातील महात्मा फुले चौकात महावीर ई बाईक्स हे इलेक्ट्रिक दुचाकींचे नवीन शोरुम खुले होत आहे. हैदराबाद येथील प्युअर ईव्ही या कंपनीच्या ई स्कूटर, … Read more

चुकीची माहिती देऊन दिशाभूल करू नका : आमदार राजळे

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर असून आतापर्यंत तीन दुर्दैवी घटना घडून बळी गेले. सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. चौथा बळी जाऊ नये यासाठी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत असून जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी तालुक्यात आठ दिवसांपासून तळ ठोकून आहेत. नागरिकांनी स्वतःसह कुटुंबीयाची काळजी घ्यावी, तसेच … Read more

१८१ पॉझिटिव्ह आढळले. दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात सोमवारी आणखी १८१ पॉझिटिव्ह आढळले. दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला. २५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५४ हजार ४०६ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९५ टक्के आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १४२९ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९, खासगी प्रयोगशाळेत ६२ … Read more

कोरोना रुग्णांसाठी महापालिकेने आतापर्यंत खर्च केले ‘इतके’ कोटी !

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर शहरातील कोरोना रुग्णांसाठी महापालिकेने आतापर्यंत २ कोटी ६४ लाख रुपये खर्च केले आहेत. हा आकडा मागील अहवालातील असून त्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे, अशी माहिती आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिली. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ५३ हजारांवर पोहोचली आहे. नगर शहरातही हा आकडा कमालीचा वाढला होता. सरकारने … Read more

येत आहे ‘खरेदिवाला’नावाचे मराठमोळे स्टार्टअप; फ्रांचाईसीसाठी संपर्क करण्याचे प्रवर्तकांचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- बहुराष्ट्रीय कंपन्या आणि काही देशी भांडवलदार यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या ऑनलाईन शॉपिंग बिजनेसमध्ये आता आणखी एक नवे नाव जोडले जाणार आहे. होय, हे नाव अजिबात इंग्रजी नाही. आपल्या मातीत रुजलेले आणि मराठमोळ्या स्वदेशी तरुणांचे हे स्टार्टअप आहे. त्याचे नाव आहे ‘खरेदिवाला’. नावातूनच खरेदीदारांच्या हितासाठी प्राधान्य देण्याचा उद्देश या स्टार्टअपचा … Read more

तालुक्याचे आजी – माजी आमदार बारावी फेल आहे; माजी उपनगरध्यक्षांची आमदारांवर टीका

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-तरूणांना राजकारण समजलं पाहिजे. गाव समजलं पाहिजे. गावाला नाव ठेवणारा माणूस आपल्या गावात नाही आला पाहिजे. आपले तरूण असतील, आपल्यात राजकारण असेेल,   आपल्यात संघर्ष असेल. तरूणांनो, तुम्ही कोणालीही निवडून द्या, तो कोणत्याही पक्षाचा, गटाचा, तटाचा असू द्या. कर्तबगार, सुशिक्षित उमेदवार निवडून द्या. तरच तुमच्या घराचा, गावाचा तसेच संपूर्ण … Read more

जनता दरबारात मंत्री तनपुरेंनी सोडविल्या नागरिकांच्या समस्या

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- नागरिकांच्या समस्यां सोडविण्यासाठी मंत्री प्राजक्त तनपुरेंनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. यात त्यांनी जनता दरबार मध्ये पाथर्डी तालुक्यातील नागरिकांच्या समस्यां जाणून घेतल्या तसेच या समस्या सोडविण्याबाबत त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या आहेत. मंत्री प्राजक्त तनपुरेंच्या उपस्थितीत पाथर्डी तालुक्यातील मिरी व शिंगवे येथे जनता दरबारामध्ये ग्रामस्थांच्या समस्यांची सोडवणूक … Read more

महाविकास आ‍घाडी सरकारने मदतीचे फसवे पॅकेज जाहीर केले

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- शेतक-यांचा दबाव आल्‍यामुळे महाविकास आ‍घाडी सरकारने मदतीचे फसवे पॅकेज जाहीर केले आहे. तीन तीन मंत्री असूनही जिल्‍ह्यातील शेतक-यांना नुकसानीची भरपाई मिळण्‍याची कोणतीही शाश्‍वत नाही. सरकारी यंत्रनेकडून पंचनाम्‍यात झालेल्‍या हलगर्जीपणामुळे सरकारची बेफीकीरीच समोर आली असल्‍याची टिका भाजपाचे जेष्‍ठनेते माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली. अतिवृष्‍टीने नुकसान झालेल्‍या परिस्थितीचा … Read more

कांद्याचा भाव गडगडला; नागरिक खुश तर शेतकरी नाखूष

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दराने विक्रमी झेप घेतली होती. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट चांगलेच कोलमडले होते. दरम्यान दिवसेंदिवस कांद्याचे भाव वाढत चालल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं. तर नागरिकांमध्ये नाखुषीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, परिस्थिती बदलली असून आता कांद्याच्या भावामध्ये घसरण सुरु झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर … Read more

महावितरणची एक ठिणगी शेतकऱ्याला २५ लाखांना पडली

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात यंदाच्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच हतबल झालेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने आर्थिक संकटात पाडले आहे. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. यातच महावितरणची एक चूक शेतकऱ्याला तब्बल २५ लाखांना पडली आहे. नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथील खरवंडी पश्चिम शिवारात शेतातून गेलेल्या … Read more

आमदार पवारांच्या तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट; नागरिकांमध्ये भीतीचे सावट

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली असून गुन्हेगार आपल्या क्षेत्रात अपडेट होत गुन्हेगारीसाठी आता नवनवे फंडे वापरू लागला आहे. वाढती गुन्हेगारी हि पोलिसांबरोबरच आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. तसेच जिल्ह्यांतर्गत लुटीचे प्रकार देखील चांगलेच वाढीस लागलेले दिसून येत आहे. जिल्ह्यात दररोज कोठेतरी लुट झाल्याचे समोर येत आहे. यातच आमदार … Read more

निकृष्ट पद्धतीने खड्डे बुजविण्याचे काम सुरु… नागरिकांनी दिला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात सध्या सर्वत्र खड्यांचे मोठ्या प्रमाणावर साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिकांच्या संतापानंतर काही ठिकाणी कामे सुरु देखील झाले मात्र कामाचा निकृष्ट पणा यामुळे नागरिकांमधून ओरड होत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी फाटा – देवदैठण ते बेलवंडी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सध्या सुरु आहे. मात्र खड्डे बुजविण्यातही निकृष्टपणा असल्याने … Read more

पोलिसांकडून कारवाई सुरु; मात्र तरीही या तालुक्यात अवैध धंदे जोरात

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे जोरात सुरु आहे. या धंद्यांना रोख बसावा यासाठी पोलिसांकडून देखील सातत्याने कारवाई केली जात आहे. मात्र तरीही जिल्ह्यात या धंद्यांना आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील गावोगावी बंदी असलेला गुटखा राजरोस पणे विक्री होत असताना या खालोखाल अवैध दारू धंद्याने … Read more

आज अहमदनगर जिल्ह्यात वाढले फक्त ‘इतके’ कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज २५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५४ हजार ४०६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १८१ ने … Read more

पोस्ट ऑफिसच्या ‘ह्या’ 4 योजनेत करा गुंतवणूक आणि व्हा करोडपती

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- कोरोना साथीने भारतासह संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. लॉकडाउन देशाच्या बहुतेक ठिकाणी आहे. अशा परिस्थितीत भारतासह जगात आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या परिस्थितीत बाजारपेठेतील जोखीम पूर्वीपेक्षा जास्त वाढली आहे. अशा परिस्थितीत, बहुतेक गुंतवणूकदार असा पर्याय शोधत असतात जिथे त्यांना कमी धोका असू शकेल आणि चांगले परतावा देखील … Read more

जिल्हा बॅकेमुळे शेतकऱ्यांचे थांबलेले अर्थचक्र सुरू – माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- जनतेवर कोरोणा संसर्ग विषाणूचा महाभंयकर संकट असतांना शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचे संकट येऊन उभ्यापिकांच संपूर्ण नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सर्वात प्रथम शेतकऱ्यांच्या मदतीला जिल्हा बॅक धावून आली. संचालक मंडळाने विविध निर्णय घेऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम केले. थांबलेले अर्थचक्र सुरु झाले. अजुनपर्यंत राज्यशासनाचे कुठलेही अनुदान शेतकऱ्यांपर्यंत आले नाही. … Read more

सातवा वेतन आयोगाच्या मागणीसाठी शिक्षकांनी पुकारले ‘काम बंद’ आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापिठातील कर्मचाऱ्यांनी आज कृषी विद्यापिठाच्या मुख्य कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत वेतन आयोग लागू करावा अशी मागणी केली आहे. या आंदोलनात कृषी विद्यापीठातील सर्व कर्मचारी, प्राध्यापक, महिला कर्मचाऱ्यांनी मोठी उपस्थिती केली होती. पदव्युत्तर महाविद्यालयाच्या प्रांगणापासून सुरु झालेला हा मोर्चा विद्यापीठातील फुले पुतळ्यामार्गे जोरदार घोषणाबाजी करीत … Read more

दारूसाठी पैसे न दिल्याने बेवड्याने कारमधून चोरले दोन लाख

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- व्यसनाधीश व्यक्ती आपल्या व्यसनाची हौस भागविण्यासाठी कोणत्याही ठरला जायला पुढे मागे बघत नाही. कारण आमच्या पोटात दारू आम्ही काहीही करू. असाच एका बेवड्याने दारूसाठी पैसे न मिळाल्याच्या रागातून चक्क गाडीची काच फोडून गाडीतील रक्कम चोरल्याची घटना पारनेरमध्ये घडली आहे. या घटनेविरोधात फिर्यादी गाडीमालक सतीश कारखेले ( रा. राळेगण … Read more