अज्ञात वाहनाच्या धडकेत दोनवर्षीय नर जातीचे तरस जागीच ठार

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तरस नामक प्राण्याचा वावर वाढू लागल्याच्या घटना ऐकण्यात आल्या आहेत. या प्राण्याकडून काही जणांवर हल्ला झाल्याच्या घटना देखील घडल्या होत्या. दरम्यान एका तरसाच्या पिल्लाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन वर्षीय … Read more

हेलिकॉप्टरमुळं माझं तिकीट कापलं गेलं होतं; सुजय विखेंनी सांगितला किस्सा

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-गेल्या वर्षीच्या झेडपीच्या कॉंग्रेसमध्ये असलेल्या डॉ.सुजय विखे यांनी हेलिकॉप्टरने फिरत आपल्या उमेदवारांचा प्रचार केला होता. दरम्यान प्रचारासाठी हेलिकॉप्टरचा वापर हा त्यावेळी चांगलाच चर्चेचा विषय बनला होता . तसेच या हेलिकॉप्टर वारीवरून विखें देखील चांगलेच चर्चेत राहिलते होते. एका कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने त्यांना हेलिकॉप्टर किस्स्यांविषयी आठवण करून दिली. विखेंनी काँग्रेसच्या उमेदवाराचा … Read more

कोरोना गो… गो कोरोना म्हणाऱ्या रामदास आठवले यांना कोरोनाचा लागण

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असता कोरोना व्हायरस विरोधात गो कोरोना, कोरोना गो अशी घोषणा देऊन सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हेच कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. नुकतीच त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान आठवलेंना सध्या कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस खासगी रुग्णालयात … Read more

अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया व पारनेरचे नगरसेवक सय्यद यांच्या पुढाकाराने वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींनां 1 लाख रुपयाच्या कोरोना पॉलीसीचे वाटप

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-आमचा एक सहकारी पांडुरंग रायकर यांचा कोरोनाने निधन झाले, त्यांना उपचार वेळेवर मिळाले नाही आणी म्हणून मीडियाचे काम करतांना 100% सेवाभाव म्हणजे ज्या गोष्टी कधी समाजापुढे आल्या नाही अश्या गोष्टीनां समाजापुढे आणण्याचा काम वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी करत असतात आणी म्हणून त्यांना स्वतःला एक कवच पाहिजे त्यामुळे आज करण्यात आलेल्या कोरोना … Read more

या सरकारला काम करता येत नसेल तर बाजूला व्हावे आम्ही प्रश्‍न सोडवू – खा. सुजय विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- राज्याचे सरकार हे तीन पक्ष एकत्र येऊन षडयंत्र रचून स्थापन झालेले सरकार आहे. या सरकारला काम करता येत नसेल तर बाजूला व्हावे. आम्ही या राज्याचे प्रश्‍न सोडवू. आजही जिल्ह्यामध्ये भाजपचे आमदार असताना मंजूर केलेल्या विकास कामांचे उद्घाटने हे लोक करीत आहेत. नगर जिल्ह्याध्ये कोरोनाची परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने ६0 … Read more

भाजप सरकार मुठभर भांडवलदारांच्या पाठीशी, तर काँग्रेस सामान्यांच्या पाठीशी

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- केंद्रातील भाजप सरकार हे या देशातील म मुठभर भांडवलदारांच्या पाठीशी आहे. तर काँग्रेस पक्ष हा समाजातील सर्वसामान्य घटकांच्या पाठीशी आहे. कामगार विरोधी कायद्याच्या माध्यमातून कामगारांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष करत आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे आ.डॉ.सुधीर तांबे यांनी केले आहे. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या … Read more

मोदींच्या ‘ह्या’ योजनेस सुरुवात ; आता बँक गरिबांच्या दारात

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील सर्व नगरपालिकांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. आज देशभरातील साथीच्या काळात लॉकडाऊनने बाधित झालेल्या पथ विक्रेत्यांना मदत करण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केली. 1 लाख 70 हजार कोटी रुपयांनी गरीब कल्याण योजना सुरू :- पीएम मोदी म्हणाले, आमच्या पथ … Read more

आतापर्यंत ५२ हजार ९४५ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २९० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ९४५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०४ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १३४० इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४६, अकोले … Read more

जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करणार्‍यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- जागेवरुन जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करणार्‍या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वांबोरी (ता. राहुरी) येथील रवीना सारवन व साहिल सारवन या दांम्पत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जवळील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण केले. या उपोषणाला अ.भा. मेहतर समाज संघटना व बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. या उपोषणात … Read more

महिलांच्या प्रश्‍नासह सामाजिक विषय हाताळण्यास यशस्विनीच्या महिला कटिबध्द -रेखा जरे पाटील

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- महिलांच्या प्रश्‍नासह विविध सामाजिक विषयावर कार्य करणार्‍या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या भिंगार समन्वयकपदी रोहिणी मच्छिंद्र वाघीरे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांनी सदर नियुक्तीची घोषणा केली. महिला व बाल कल्याण अधिकारी विजयामाला माने व जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अनिता काळे यांच्या हस्ते वाघीरे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा … Read more

मनपा कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी सोडू : आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- गेल्या अनेक दिवसापासून अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहे. अनेक वेळा प्रशासनाशी चर्चा करूनही अद्यापर्यंत कर्मचाऱ्यांचा एकही प्रशन मार्गी लागला नाही. सध्या जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. नगर शहरातही मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कोरोनाच्या संख्येतही वाढ होत होती. हा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेचे अधिकारी … Read more

‘आमच्या पक्षात सर्वांचा सन्मान’ ; मंत्री तनपुरे यांचा ‘त्यांना’ टोला

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. नुकतेच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने भाजपाला धक्का बसला आहे. परंतु यावरुन दोन्ही पक्षात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. नुकतेच प्रा. राम शिंदे यांनी खडसे यांना ज्येष्ठ नेते म्हणून भाजपमध्ये जी किंमत होती, ती कधीही राष्ट्रवादीत मिळणार … Read more

खा. सुजय विखेंच्या पवारांबाबतच्या ‘त्या’ विधानावरून राजकारण तापले

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यातील के के रेंज प्रश्न हा अगदी शेतकऱ्यांच्या जीव्हारीचा प्रश्न आहे. या प्रश्नासंदर्भात स्थानिक सर्वच लोकप्रतिनिधींनी आपापल्यापरीने आवाज उठविला आहे. याबाबत स्वतः शरद पवार यांनी मध्यस्ती करत दिल्लीपर्यंत जाऊन आपली भूमिका मांडली. परंतु नुकतेच खा. सुजय विखे यांनी खा. शरद पवारांबाबत जे विधान केले त्यावरून राजकीय वाद सुरु होण्याची … Read more

प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत ऊस तोडणी कामगार मेळाव्याच्या आयोजकांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-भगवान गडाच्या पायथ्याशी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत ऊस तोडणी कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याचे नियोजन आधीच झालेले होते.या मेळाव्यास येण्या आधीच उसतोडणी कामगारांना कारखानदारांना गरज असल्याचे सांगितले. भगवान गड हे क्रांतीचे प्रतिक मानले जाते, ऊसतोडणी कामगारांनो गरज कारखानदारांना आहे, लक्षात घ्या, त्यामुळे आणखी 10 … Read more

अहमदनगरच्या केमिस्ट्ची पंतप्रधानांकडे ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- सध्या देशभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सर्वांचे लक्ष कोरोनाच्या लशीकडे लागलेले आहे. पुढील वर्षाच्या सुरवातीस कोरोना लस येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आता खरे आवाहन ती लस व्यवस्थित सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने (एआयओसीडी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन … Read more

कांद्याचा रिव्हर्स गिअर ; ‘इतके’ भाव घसरले

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- या महिन्याच्या सुरुवातीपासूनच कांद्याचे दर वाढायला लागले. २० ते २५ रुपये किलो असलेला कांदा ७० रुपये किलोपर्यंत पोहचला. परतीच्या पावसाचा फटका कांद्यालाही बसला असल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. अती पावसामुळे वाया गेलेले कांदा पीक व रोपे त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर झाले. राज्यातील कांद्याची स्थिती पाहता येत्या काही दिवसांत … Read more

मी निवृत्त होत आहे, मी थांबतो ; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-आपल्या आंदोलनाने आणि अहिसंक मार्गाने शासनास घाम फोडणारे आणि सर्वसामान्यांना अनेक गोष्टींमध्ये न्याय मिळवून देणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता निवृत्तीचे सूतोवाच केले आहे. विजयादशमीचे औचित्य साधत रविवारी हजारे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. अण्णा यावेळी म्हणाले की, गावात 1975मध्ये कामाला सुरवात केली. जवळपास 45 वर्षांचा … Read more

धक्कादायक ! मामाकडे गेलेल्या भावंडांचा शिळी बिर्याणी खाल्ल्याने मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- राहाता तालुक्यात एका धक्कादायक घटनेत दोन सख्या बहिण भावंडांचा मृत्यू झाला आहे. त्या दोघांनी मामाकडे शिळी बिर्याणी खाल्ल्याने त्यातून विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे.अरहान (वय 5 वर्षे ) व आयेशा (वय 4 वर्षे) अशी या चिमुरड्यांची नावे आहेत. या दुर्दैवी मृत्यूची वार्ता मामा शाविद यांना समजल्याने त्यांना मानसिक … Read more