अबब! कांदा वाढला ; जाणून घ्या दर

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- कांदा चांगलाच तेजीत आला असून,काल सोमवारी नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये प्रतिक्विंटल भावात कांद्याने 6 हजारांचा टप्पा पार केला आहे. अतिवृष्टीमुळे यंदा अन्य राज्यातील कांदा पीक वाया गेल्याने कांद्याला भावात तेजी आली आहे. आज येथील बाजार समितीत सुमारे 27 हजार 613 गोण्याची आवक झाली होती. काही … Read more

नागरिकांच्या सहकार्याने कोविड विरुद्धची लढाई आपण जिंकू

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-‘जिल्हा रुग्णालयाच्या वतीने कोरोना बाधित रुग्णांना अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून दिल्याने अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनाच्या या संकटात जिल्हा प्रशासनास अनेकांनी सहकार्य केल्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येत … Read more

मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कायम विकासाला प्राधान्य

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर तालुक्यात विकास कामांचा वेग कायम असून कोरोना संकटातही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायम गावच्या वाडी-वस्तीच्या विकासाला प्राधान्य दिले असल्याचे प्रतिपादन थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहे. जिल्हा परिषदेच्या ३०५४ निधीतून चिकणी-निमगाव भोजापूर-राजापूर … Read more

मोठी बातमी : भाजपचे ‘ते’ नगरसेवक अपात्र !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- जानेवारी २०१९ मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग ६ मधून ७६ मतांनी निवडून आलेले नगरसेवक आसाराम ऊर्फ अशोक गुलाब खेंडके यांचे पद नगरपालिका अधिनियम १९६५ कलम ४४(१)(ई) नुसार जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द ठरवले. भाजपने खेंडके यांना एक वर्ष उपनगराध्यक्षपदी संधी दिली. उपनगराध्यक्ष झाल्यानंतर खेंडके यांनी गट क्रमांक २१८८(३)(अ) मध्ये नगरपालिकेची परवानगी न … Read more

अहमदनगर जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी’त आढळले ‘इतके’ पॉझिटिव्ह रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ८ लाख ७४ हजार घरांमधील ३९ लाख २४ हजार ८९ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, २९ हजार ५६९ जणांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले होते. त्यात ५ हजार ७८४ जण पॉझिटिव्ह आढळले. सर्वेक्षण पूर्ण झाल्याने ही मोहीम थांबवण्यात आली आहे, असे आरोग्य … Read more

मदतीसाठी त्यांनी खिळवली नजर रोहित दादा काही क्षणांत तिथे हजर

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-समस्येचे उत्तर हवे असले कि एकच नाव सध्या चर्चेत आहे, ते म्हणजे आमदार रोहित पवार होय. आपल्या कर्यतत्परतेमुळे जनमानसात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार हे समाजसेवेसाठी व मदतीसाठी नेहमीच अग्रेसर असतात. असाच काहीसा अनुभव राशीनकरांना नुकताच आला. पुरामुळे करपडी (ता.कर्जत) येथील मुख्य रस्त्यावरील ओढ्यावर … Read more

स्व.अनिलभैय्या राठोड विचार मंचाची स्थापना

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- नगर शिवसेनेचा वाघ दिवंगत नेते अनिल भैय्या राठोड यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. नगरकरांचा आवाज म्हणून ओळखले जाणारे अनिल भैय्या यांच्या स्मृती नगर शहरामध्ये कायम राहाव्यात, यासाठी जननायक स्व.अनिलभैय्या राठोड विचार मंचाची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान याबाबतची माहिती मंचाचे संस्थापक … Read more

बँक निवडणूकीच्या आडून विधानसभेची तयारी सुरु

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आद्यपही कायम आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान तालुक्यातील पक्षीय समीकरणे पुन्हा बदलल्याने जिल्हा बँक निवडणूकीच्या आडून विधानसभा निवडणूकीची गणितेही आखली जावू लागल्याची चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. जिल्हा बँक निवडणूक ही कारखानदारांसाठी प्रतिष्ठेची राहते. कारण कारखान्यांचे आर्थिक गणित … Read more

महापालिकेने केली सर्व कोविड सेंटर बंद; जाणून घ्या काय आहे कारण

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. शहरातील कोरोनाबाधितांची आकडेवारी घटत आहे. यामुळे महापालिकेने शासकीय तंत्रनिकेतनमधील रोटरी कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे बंद झालेले हे दुसरे कोविड सेंटर आहे. शहरातील कोविड सेंटरमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्याने महापालिकेने आनंद लॉननंतर आता शासकीय तंत्रनिकेतनमधील रोटरी कोविड सेंटरही बंद … Read more

त्या नगरसेवकाला अतिक्रमण पडले महागात; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- अनधिकृतपणे जागेवर कब्जा करत संबंधित ठिकाणी अतिक्रमण करत व्यवसाय सुरु केल्यामुळे एका नगरसेवकाला आपले पद गमवावे लागले आहे. जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात ही घटना घडली आहे. श्रीगोंदे पालिका हद्दीत विनापरवाना शेड उभारुन व्यवसाय केल्याप्रकरणी भाजपचे माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक अशोक ऊर्फ आसाराम खेंडके यांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज अपात्र … Read more

पवार साहेबांच्या कृपेमुळेच अधिग्रहण होणाऱ्या जमिनी बचावल्या

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- के के रेंजच्या विस्तारासाठी जिल्ह्यातील उत्तरेकडील अनेक जमिनी अधिग्रहण केल्या जाणार होत्या. पुन्हा विस्थापित होण्याच्या भीतीने येथील गावकऱ्यांनी या प्रश्नाबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे साकडे घातले होते. पवार साहेबांनी या विषयात लक्ष घालत तात्काळ संरक्षण मंत्र्यांची भेट घेत हा विषय मार्गी लावला. शरद पवार व संरक्षण मंत्री … Read more

ग्राहकांच्या सोयीसाठी ‘ही’ बँक देणार ऑनलाईन कर्ज

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बहुतांश व्यवहार हे चलनी स्वरूपात न होता लोकांनी ऑनलाईन व्यवहारांना पसंती दिली होती. याच धर्तीवर बँकांनी देखील ऑनलाईन सुविधांवर भर दिली होती. याच अनुषंगाने आता जिल्ह्यातील लोणी येथील प्रवरा सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. एक हजार कोटींचा टप्पा ओलांडणाऱ्या या बँकेने ग्राहकांच्या हितासाठी एक नवीन … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स वाचा इथे

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात आज तब्बल १०४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार ८३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.८२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४११ ने वाढ … Read more

जिल्ह्यातील त्या साखर कारखाना विक्रीचा चौकशी अहवाल न्यायालयात

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- पारनेर तालुका सहकारी साखर कारखानेकडे 44 कोटी 50 लाख रूपयांचे कर्ज होते. त्या पैकी 25 कोटी रूपयांची परत फेड केली होती. फक्त 19 कोटी 50 लाख रूपयांचे कर्ज थकीत होते. एवढ्या कमी किंमतीसाठी पारनेर कारखाना जप्त करून त्याचा लिलाव करण्यात आला होता. या विक्रीचा चौकशी अहवाल न्यायालयात सादर करण्यात … Read more

कोतकरांच्या पाठीवर ‘त्या’ बड्या नेत्याचा हात…

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीवेळी कोतकर यांनी ऐनवेळी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रवेश करताच स्थायी समितीचे सभापतिपद देखील त्यांना मिळाले. त्यांनतर मात्र दोन्ही पक्ष कोतकर हे आपलेच असलायचा दावा करू लागले. भाजपकडून या संदर्भात कोतकरांना नोटीसही देण्यात आली. मात्र कोतकरांनी यास कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही. तसेच भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले मनोज कोतकर … Read more

आमदार जगतापांनी केली त्या धोकादायक पुलाची पाहणी

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. यंदाच्या वर्षी देखील पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे, यामुळे अनेकदा सीना नदीला पूर आला आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर शहरातील बोल्हेगाव जवळील पुलाची आमदार संग्राम जगतापांनी पाहणी केली. हा पूल सध्याच्या स्थितीला धोकादायक झाला आहे. अनेक वर्षांचा असलेल्या पूल खराब झाला आहे. त्यामुळे या पुलावरुन … Read more

जमिनीच्या वादातून महिलेचा विनयभंग… या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- महिला अत्याचाराच्या घटनांवरून संपूर्ण देशात सध्या संतापाचे वातावरण असताना जिल्ह्यात महिलांच्या छेड छाडीच्या घटना घडत आहे. अकोले तालुक्यातील केळी रुम्हणवाडी परिसरात राहणारी एक ४५ वर्षीय महिला व तिचे नातेवाईक, पती हे शेतजमीन नांगरणयासाठी गेले असता तेथे चौघा जणांनी येऊन ही शेतजमीन आमची आहे. तुमचा येथे काही संबंध नाही असे … Read more

प्रलंबित मागण्यांसंदर्भात ग्रामसेवकांनी घेतली महसूल मंत्र्यांची भेट

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी शिष्टमंडळासह राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. महसूल मंत्री, ग्रामविकास मंत्री आणि सर्व प्रधान सचिव यांची एकत्रित बैठक आयोजित करून ग्रामसेवकांच्या मागण्या मंजूर होणेबाबत आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे. त्यास प्रतिसाद देत … Read more