अहमदनगर ब्रेकिंग : ओढ्यात आढळला तरुणाचा मृतदेह !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- नेवासा येथील मध्यमेश्वर बंधारा नजीक असलेल्या ओढ्यात आज सकाळी १० च्या सुमारास शहरातील हेमंत नंदकुमार कुसळकर (२०) या तरुणांचा पाण्यात फुगलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. यावेळी नेवासा पोलिस स्टेशनचे सह्ययक पोलीस निरीक्षक विजय ठाकुर, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी गर्जे, पोलीस हवालदार तुळशीराम गिते यांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण,कोरोना बाधितांचा आकडा 55 !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- अहमदनगर शहरातील सारसनगर येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५५ झाला आहे. या व्यक्तीला दोन दिवसापूर्वी सर्दी, खोकला याचा त्रास होऊ लागल्याने त्याला सुरुवातीला खाजगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी … Read more

लॉकडाऊनमधील लग्नाची गोष्ट …आणि ते वधू-वर तोंडाला मास्क लाऊन चढले बोहल्यावर !

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- जगासह देशात कोरोना धुमाकूळ घालत आहे. उद्योगधंदे, शाळा, कॉलेज, प्रवास, बाजारपेठा, हॉटेल, मॉल, थियेटर्स बंद पडून संपुर्ण देश ठप्प असून, लॉकडाऊनचा तीसरा टप्पा सुरु आहे. या लॉकडाऊन काळात लोक अक्षरश: घरात डांबले गेले. ऐन लग्नसराईत अचानक उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे अनेक लग्नाळूंच्या स्वप्नांवर पाणी फिरले. मात्र लॉकडाऊन वाढत असताना मोजक्या … Read more

अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्याचा प्रयत्न,नंतर झाले असे काही…

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- अल्पवयीन मुलीचे लग्न गुपचूप लावण्याचा प्रयत्न कोपरगाव पोलिसांनी हाणून पाडला. ही घटना तालुक्यातील जेऊर पाटोदा येथे मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस पाटील हरिभाऊ सयाजी केकान (जेऊर पाटोदा) यांनी फर्याद दली. यात आरोपी नारायण आगाजी अव्हाने, अल्काबाई नारायण अव्हाने, विकास सोपान चव्हाण, सोपान … Read more

‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पतीसह, सासू सासऱ्याला अटक

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- कोपरगाव तालुक्यातील मंजूर वडाचीवाडी येथील विवाहित महिला जयश्री गोरक्षनाथ गावंड (वय २९) या विहिरीत मृत अवस्थेत आढळून आल्या. त्यांना वर काढल्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात पती गोरक्षनाथ बाळासाहेब गावंड, सासरा बाळासाहेब कारभारी गावंड, सासू लहानबाई बाळासाहेब गावंड या तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मृत महिलेचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात तरुण जागीच ठार

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील वडझिरे परिसरातील कृष्णतारा पेट्रोलपंपाचे जवळील वळणावर झालेल्या टेम्पो आणि दुचाकीत झालेल्या भीषण अपघातामधे देवीभोयरे येथील तरुण जागीच ठार झाला. पारनेर-बेल्हे रस्त्यावर टाटा टेम्पो (एमएच ४२ टी-१०१३) जात होती. समोरून येणाऱ्या मोटरसायकलची (एमएच १६, एडी २७३९) आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये देवीभोयरे (माळवाडी) येथील प्रमोद किसन मुळे … Read more

‘त्या’ तरुणाच्या मृत्यूमुळे पारनेर तालुक्यात भितीचे वातावरण

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- निघोज येथील रहिवासी असलेला हा तरूण ३ मे रोजी मुंबईहून सासुरवाडी पिंपरी जलसेन येथे पत्नी व दोन मुलांसह आला होता. प्रशासनाने संपूर्ण कुटुंब जि. प. शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवले. तरूणास काही दिवसांनंतर श्वसनाचा त्रास सुरू झाला. परंतु विलगीकरण कक्षाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हा तरूण निघोज येथे डॉक्टर असलेल्या भावाकडे … Read more

बिग ब्रेकिंग : मुंबईतून आलेल्या तरुणाचा मृत्यू ! श्वसनाचा त्रास असल्याने मृत्यूचे कारण गुलदस्त्यात

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :-पारनेर तालुक्यातील पिंप्री जलसेन येथील प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करून ठेवलेल्या 39 वर्षीय तरुणाचा मंगळवार (दि. 12) सकाळी मृत्यू झाला. 3 मे रोजी हा तरुण त्याच्या पत्नीसह दोन मुलांना घेऊन मुंबई येथील घाटकोपर येथून पिंप्री जलसेनला सासुरवाडीत आला होता.तरूणाचा नगर येथे उपचारांसाठी नेताना मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. मृत्यू कोरोनामुळे किंवा अन्य … Read more

आज राज्यात सापडले ‘इतके’ कोरोनाबाधित रुग्ण, वाचा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ४२७ झाली आहे. आज १०२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज  ३३९ कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  ५१२५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २१ हजार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाण्यात बुडून दहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- पोहण्यास गेलेला दहा वर्षे वयाच्या मुलाचा श्रीरामपूर शहरालगत बेलापूर-पढेगाव रोडवर असणाऱ्या खटकाळी गावठाण येथील खाणीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. आज सायंकाळी हा मृतदेह सापडला. खटकाळी गावठाण येथील आदित्य विकास जगताप (वय १०) हा मित्रांसमवेत दुपारी अडीच वाजता पोहोण्यास गेला होता. पोहत असताना दम तुटल्यामुळे तो खोल पाण्यात बुडाला. ही … Read more

परराज्यातील मजुरांसाठी ‘या’ चार बसस्थानकात एक खिडकी कक्ष

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- अहमदनगर जिल्हयात अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या मूळगावी जाण्याकामी तारकपूर बसस्थानक अहमदनगर, पारनेर बसस्थानक, श्रीरामपूर बसस्थानक, आणि कोपरगांव बसस्थानक या चार ठिकाणी एक खिडकी कक्ष कार्यन्वित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. त्यासाठी, महसुल, मोटार वाहन, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणारी समिती … Read more

‘त्या’ महिलेच्या संपर्कातील 56 जणांची तपासणी

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- शहरात एका ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून , या महिलेच्या संपकार्तील ५६ जणांची तपासणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात येणार आहे. तसेच सुभेदार गल्ली परिसर प्रशासनाच्यावतीने लॉक करण्यात आला आहे. नगर शहरातील झेंडीगेट परिसरातील सुभेदारी गल्ली येथील महिलेला सर्दी, खोकला, ताप आदी त्रास झाला होता. म्हणून ही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करणाऱ्या सरपंचांनाच बेदम मारहाण !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुमशेत गावात जनजागृती व त्या अनुषंगाने सांगितले म्हणून त्याचा राग मनात धरून सहा ते सात लोकांनी कुमशेतचे सरपंच सयाजी तुकाराम अस्वले यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अकोल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांना संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी अकोले पंचायत … Read more

कोरोनाला हरवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सेवाव्रती परिचारिकांचा सत्कार

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- कोरोना बाधितांवर उपचार करुन त्यांना बरे करण्यासाठी अथक आणि अहोरात्र सेवा बजावणार्‍या बूथ हॉस्पिटलमधील परिचारिकांचा आज जागतिक परिचारिका दिनी सत्कार करण्यात आला. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असताना यामधील महत्वाचा दुवा असणार्‍या परिचारिकां प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शहरातील इव्हेंजलीन बूथ हॉस्पिटल येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार … Read more

अहमदनगर शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर, नगरसेवक म्हणाले ‘या’ कारणामुळे झाला अनिल राठोडांचा पराभव !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- अहमदनगर शहर शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी आज एका पत्रकाद्वारे  माजी आमदार अनिल राठोड यांच्यावर जोरदार टीका करत राठोड यांच्या विधानसभेतील पराभवाचे कारणही या प्रत्रकातून सांगितले आहे. नगरसेवक नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी सांगितले आहे कि, आज भारतात आणि महाराष्ट्रात कोरोनासारख्या आजाराने थैमान घातले आहे. … Read more

ऐकलत का…..मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आहे अहमदनगरमध्ये प्लॉट !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती याविषयी अनेकांना उत्सुकता होती. विधान परिषदेचा अर्ज भरताना आज ते शपथपत्र सादर करतील. आणि त्यातून आपल्याला त्यांची संपत्ती कळेल असे वाटत होते. आज त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रात अहमदनगरमध्ये प्लॉट असल्याचे लिहून दिले आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात उद्धव ठाकरे यांनी आपल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ वाईन शॉप केले सील

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केल्याने आज दुपारी श्रीगोंदा शहरातील सत्यम वाईन शॉप सील करण्यात आले. श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र महाजन यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सत्यम वाईन शॉपसमोर ही कारवाई करण्यात आली. आज दुपारी श्रीगोंदा शहरातील सत्यम वाईनसमोर मोठी रांग लागली होती. सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नव्हते. मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांची नोंद नव्हती. … Read more

‘या’ तालुक्यात गारपिटीने शेतकऱ्यांची मोठे नुकसान

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- रविवारी सायंकाळी झालेल्या गारपिटीने कर्जतसह तालुक्यातील कुळधरण, राशीन परिसरात शेतकऱ्यांच्या फळबागा व पिकांचे यात मोठे नुकसान झाले आहे.आमदार रोहित पवार यांनी परिसराची पाहणी केली आहे. कुळधरण परिसरातील पिंपळवाडी, राक्षसवाडीसह तालुक्यातील सोनाळवाडी, तोरकडवाडीत फळबागा व पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी नुकसान झालेल्या पिकांची सोमवारी (११ … Read more